कांद्यास सहा हजार रूपये भाव

राहुरी : बाजार समितीच्या वांबोरी येथील कांदा मोंढ्यावर काल गावरान कांद्याची २,९५० गोणीची आवक होऊन चांगल्या प्रतिच्या कांद्यास सहा हजार रूपये क्विंटल भाव मिळाला असून लाल कांद्याची १२२७ कांदा गोणीची आवक होऊन चांगल्या प्रतिच्या कांद्यास तीन हजार रूपये क्विंटल भाव मिळाला. बाजार समितीच्या वांबोरी येथील कांदा मोंढ्यावर लिलावास आलेल्या कांद्याचे प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे (गावराण … Read more

पोटनिवडणुकीचा खर्च ‘त्या’ उमेदवारांकडून वसूल करावा

जामखेड : सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेले आमदार, खासदार नगरसेवक व ग्रामपंचायत सदस्यांनी स्वत: राजीनामा दिल्यास दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या उमेदवारास विज़यी घोषित करावे तसेच अशा मतदारसंघात सरकारी खर्चातून पुन्हा निवडणूक घेऊ नये, यदा कदाचित पोटनिवडणूक घेण्याची वेळ आल्यास राज़ीनामा दिलेल्या उमेदवाराकडून पोटनिवडणुकीचा खर्च वसूल केला ज़ावा अशी मागणी महाराष्ट्र धडाका आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. महारुद्र … Read more

बनावट सातबारा तयार करुन फसवणूक

अहमदनगर :- बनावट कागपत्र तयार करुन भूविकास बँक व महसुल कर्मचार्‍यांनी संगनमतीने वडिलोपार्जित साडे नऊ एकर शेतजमीन बनावट सातबारा तयार करुन फसवणूक केल्याचा आरोप शेतकरी नंदू विधाते यांनी केला आहे. चार वर्षापासून वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील न्याय मिळत नसल्याने उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. नंदू विधाते यांचे वडिल नाना उर्फ वसंत विधाते यांच्या मालकीची … Read more

राजकारण कळत नाही, असे मी म्हणायचो, पण विधानसभेनंतर मला कळले आहे की येथे…..

अहमदनगर :- शहरातील उड्डाणपुलासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या पुलात बाधीत होणाऱ्या खासगी मालमत्ताधारकांना २५ नोव्हेंबरपर्यंत हमीपत्र भरून देण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. हमीपत्र भरून दिल्यामुळे मालमत्ताधारकांना सुमारे २५ टक्के आर्थिक नुकसान टाळता येणार आहे, अशी माहिती खासदार सुजय विखे यांनी सोमवारी दिली. उड्डाणपुलाच्या भूसंपादन प्रक्रियेतील मालमत्ताधारकांची बैठक खासदार विखे यांनी बोलावली होती. … Read more

त्या तरुणाची दोन दिवसांनंतरही ओळख पटली नाही

राहुरी :- मुळा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या तरुणाची ओळख दोन दिवसांनंतरही पटू शकलेली नाही. हा तरुण शनिवारी दुपारी मुळा धरणाच्या प्रवेशद्वाराशेजारच्या दत्त मंदिराजवळ थांबला होता. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास या तरुणाचा मृतदेह उजवा कालव्याच्या पंपहाऊसलगत पाण्यावर तरंगताना आढळला. गावकऱ्यांनी पाण्यातून मृतदेह बाहेर काढला. ओळख पटवण्यासाठी मृतदेह राहुरी येथील शवविच्छेदन केंद्रात ठेवण्यात आला आहे. पोलिस … Read more

पोलिसांच्या दुर्लक्षाने पती-पत्नीचा खून !

श्रीगोंदे :- एक महिन्यापूर्वी गोरख भदे व त्यांची पत्नी सुरेखा भदे यांना जाळून मारण्यात आले. याबाबात खुनाचा गुन्हा दाखल झाला. या दोघांच्या जबाबात पोलिस यंत्रणेने वेळेवर दखल घेतली नसल्याने त्यांची हत्या आरोपीने केली. या खुनाचा निःपक्षपातीपणे तपास व्हावा, यासाठी तहसील कार्यालयासमोर प्रहार संघटनेचे साहेबराव रासकर यांच्यासह नातेवाईक, तर दुसऱ्या घटनेत पोलिसांनी मारहाण केली असल्याने कोकणगावमधील … Read more

आम्ही प्रसंगी रस्त्यावरही उतरू !

अहमदनगर :- राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी २५ ते ३० हजार रुपयांची मदत द्यावी या मागणीसाठी आम्ही प्रसंगी रस्त्यावरही उतरू, असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिला. उड्डाणपुलासह मनपातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी खासदार विखे शहरात आले होते. आढाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी महापौर बाबासाहेब … Read more

महा’शिव’आघाडी बद्दल खा. सुजय विखे म्हणतात…

अहमदनगर : ”शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाशिवआघाडी करून सत्तास्थापन करत आहेत. मात्र युतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेचा फॉर्म्युला ठरवून दिला आहे. तो शिवसेनेने आठवायला पाहिजे. त्यानुसार ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, असे युती असताना दिलेला हा फॉर्म्युला आहे. तो शिवसेनेने जपला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. खा. डॉ. सुजय … Read more

श्रीगोंद्यात बांधकाम व्यावसायिकाचा अपघातात मृत्यू

नगर: दौंड – अहमदनगर रस्त्यावर काष्टी येथील शिवनेरी हॉटेलसमोर दोन चारचाकी वाहनांचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात श्रीगोंदा येथील बांधकाम व्यावसायिक जय मरकड यांचा मृत्यू झाला तर स्कॉर्पिओ गाडीतील प्रवासी किरकोळ जखमी झाले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी नागेश होलम यांनी सांगितली. एमएच १६ बीएच ४७१० आणि एमएच ४२ के ८६२२ या दोन चारचाकी वाहनांचा समोरासमोर धडकून … Read more

…तर आ.शंकरराव गडाख, बाळासाहेब थोरात,रोहीत पवार,संग्राम जगताप होणार मंत्री !

अहमदनगर :- मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून झालेल्या तीव्र मतभेद झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपामधील महायुती जवळपास मोडली आहे. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाआघाडी बनण्याचे संकेत मिळू लागले आहेत.  राज्यात शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष यांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे महाशिवआघाडी … Read more

आता देशात मंदिर-मशिदीवरून राजकारण होणार नाही : अण्णा हजारे

पारनेर – अयोध्येतील राममंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय संवैधानिक व लोकतांत्रिक दृष्टीने ऐतिहासिक असल्याचे सांगतानाच या निर्णयानंतर आता आजपर्यंत अनेक वर्षे मंदिर, मशिदीवरून जे लोक राजकारण करत होते, ते आता होणार नाही, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला. राममंदिरावरून अनेक वर्षे वाद विवाद चालले होते. त्यावर आता पडदा पडला आहे. न्यायव्यवस्था सर्वोच्च … Read more

पंचनामा झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

अहमदनगर :- अवकाळी पावसाने नगर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना डोळ्यासमोर शेती पिके उद्ध्वस्त होताना बघावी लागत आहेत. शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहे. त्यांचे अश्रूपुसण्यासाठी पुढाऱ्यांचे निव्वळ दौरेच सुरू आहेत. प्रशासन पंचनामे करीत आहे. याद्वारे शेतकऱ्याला भरीव मदत मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नगर जिल्ह्यातील हजारो एकर सोयाबीन, मका, कपाशी, बाजरी, डाळिंबासह … Read more

गावांना विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही: आ. तनपुरे

नगर: तालुक्यातील जेऊर व परिसरातील गावांना विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. आ. तनपुरे हे शनिवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी जेऊर येथे आले असता, ते बोलत होते. आ. तनपुरे यांनी पोपटराव गवारे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या वेळी जेऊर ग्रामस्थांच्या वतीने तनपुरे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी … Read more

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची राष्ट्रवादीची मागणी

अहमदनगर – जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यापासून परतीच्या पाऊसाने प्रचंड हानी झाली असून, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले.  यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रदेश चिटणीस अंबादास गारुडकर, उपाध्यक्ष किसनराव लोटके, पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, दिपक पवार, सरचिटणीस … Read more

नगरमध्ये सव्वा लाखाची घरफोडी

अहमदनगर : निर्मलनगरमधील सुरभी हौसींग सोसायटीतील डिझायनरचे घर फोडून चोरट्याने १ लाख ३७ हजाराचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निर्मलनगरमध्ये सुरभी हौसींग सोसायटीत विशाल धर्मराज मुसळे (वय ३९) या डिझायनरचे घर आहे. सोमवार (दि.४) ते शुक्रवार (दि.८) या कालावधीत घरी कोणी नसताना अज्ञात चोरट्याने घराचा … Read more

विहिरीतून पाणी काढताना तोल गेल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

पाथर्डी : विहिरीतून पिण्यासाठी पाणी काढत असताना तोल गेल्याने वैभव भागवत फुंदे (वय १४ वर्षे) या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी -कोरडगाव रोडवरील फुंदेटाकळी येथे घडली. वैभव हा शनिवारी शेतात कापूस वेचणीसाठी गेला होता.  त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला होता. विहिरीतून पाणी काढत असताना त्याचा तोल गेल्याने विहिरीत पडला. … Read more

‘त्यांच्या’ बरोबर उघड फिरणारे आतून माझे काम करत होते – आ. लंके

पारनेर: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असलो पारनेर व नगर तालुक्यातील बाळासाहेबांची शिवसेना, काँग्रेस, भाजपासह सर्वच पक्षांतील कार्यकर्ते पक्षनिष्ठा सोडून एक व्यक्ती म्हणून माझ्या पाठीशी ठाम राहिल्याने मोठया मताधिक्याने माझा विज़य झाला, असे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले.  रविवारी टाकळी ढोकेश्वर येथे झालेल्या नागरी सत्काराच्या कार्यक्रमात आ. लंके बोलत होते. निवडणुकीच्या … Read more

तीन वर्षांपासून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नगर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणात आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायधीश ए. एस. खडसे यांनी १२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. लग्नाचे आमिष दाखवून आरोपी राहुल पंडित मगरे (१६, फकीरवाडी) याने गेल्या तीन वर्षांपासून १६ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची तक्रार देण्यात आली.  आरोपी हा बकऱ्या चारण्याचे काम करतो. १२ जुलै २०१६ रोजीपासून आरोपी अत्याचार करत … Read more