बालिकाश्रम रोडवर दोन गटांमध्ये दगडफेक

अहमदनगर : शहरातील बालिकाश्रम रोडवरील पोलिस कॉलनीजवळ जुन्या भांडणाच्या कारणातून दोन गटांमध्ये हाणामाऱ्या होऊन दगडफेक झाली.    त्यात दोन्ही गटांतील सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी परस्परांविरुद्ध जीवे मारण्य़ाचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, दंगा करणे या कलमांनुसार तोफखाना पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.   विठ्ठल नंदू … Read more

बेकायदा गर्भपातप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा 

जामखेड – अकलूज येथे बेकायदेशीर गर्भलिंग निदान करून स्रीगर्भ असल्याचे समजताच जामखेड येथील दुकानातून गोळ्या घेऊन गर्भपात केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मच्छिंद्र वायफळकर, शिवाजी कपणे व पाटील (पूर्ण नाव माहीत नाही), दोन महिलांसह लिंगनिदान करण्यासाठी मदत करणारा डॉक्टर अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील आरोळेवस्ती येथील विवाहितेने अकलुजजवळील एका गावातील … Read more

कागदावरच झाडे लावणाऱ्या अधिकाऱ्याचे नगरसेवकाने धरले पाय!

नगर – शहरात तब्बल १७ हजार झाडे लावल्याचा दावा प्रशासनाने केल्यानंतर नगरसेवक गणेश भोसले यांनी यादी मागवली. ही झाडे कागदावरच लावल्याचे स्पष्ट झाले. उद्यान विभागाच्या या कारभारामुळे संतापलेले नगरसेवक गणेश भोसले यांनी या विभागाचे यु. जी. म्हसे यांचे पाय धरून दर्शन घेतले. या प्रकारामुळे मनपाचे प्रशासन किती निर्ढावले आहे, हे स्पष्ट झाले. मनपा स्थायी समितीची … Read more

अण्णा हजारे यांची बदनामी करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी

पारनेर :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविषयी अवमानकारक वृत्त प्रसिद्ध केल्याने समर्थकांनी बुधवारी संताप व्यक्त करत त्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्याकडे केली. २० नोव्हेंंबरपर्यंत कारवाई न झाल्यास पोलिस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातील एका दैनिकाने रामजन्मभूमीच्या निकालानंतर हजारेंच्या तोंडी काही आक्षेपार्ह विधाने घातली. … Read more

अहमदनगरमध्ये राज्यस्तरीय मराठा वधु-वर मेळावा

अहमदनगर – सध्या सोशल मिडीया व्हाटसअ‍ॅप हे माध्यम मोठे लोकप्रिय ठरत आहे या अ‍ॅप चे कधी चांगले तर कधी वाईट परीणाम ही समोर येतात मात्र जिल्ह्यातील काही युवकांनी व्हाटसअ‍ॅप थेट सोयरीक जमविण्यासाठी वापर करत रविवारी दि.17 नोव्हेंबर रोजी  अहमदनगर  येथे राज्यस्तरीय मराठा वधु-वर थेट भेट मेळावा आयोजित केला आहे शेतकर्यांची मुले व मुली साठी तसेच … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील बारा आमदारांसाठी झाला इतक्या कोटींचा खर्च

अहमदनगर : जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातून विधानसभा सदस्य निवडणूक निवडण्याची प्रक्रिया भारत निवडणूक आयोगामार्फत नुकतीच संपन्न झाली. हे बारा आमदार निवडण्यासाठी जिल्ह्यापुरता विचार करता आयोगाचे तब्बल २१ कोटी रुपये खर्ची पडले आहेत. थोडक्यात एका आमदाराची निवड करण्याचे काम पावणेदोन कोटीला पडल्याचे निष्पन्न होत आहे. प्रजासत्ताक प्रणालीद्वारे देश आणि राज्याचा कारभार चालतो. संसदेचे आणि राज्य विधिमंडळाचे … Read more

खासदार सुजय विखे म्हणाले सहनशीलतेचा अंत पाहू नका !

अहमदनगर : सार्वजनिक हितासाठी मी जनतेशी कटिबद्ध असून माझी बांधिलकी फक्त जनतेशी आहे. त्यामुळे नगर शहरातील व जिल्ह्यातील रस्त्यांची दुरावस्था आता सहनशीलतेच्या पलिकडे गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून ते वाहतुकीसाठी व दळणवळणासाठी सुयोग्य करावेत. संबंधित सर्व विभागांनी तातडीने कामे पूर्ण करावे व लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका अशी कानउघडणी खा.डॉ.सुजय विखे पाटील … Read more

पायरीवर नतमस्तक होत आमदार निलेश लंके विधिमंडळात !

Nilesh Lanke

पारनेर | पायरीवर नतमस्तक होत आमदार नीलेश लंके यांनी बुधवारी विधिमंडळात प्रवेश केला. दिवसभर त्यांनी विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती घेतली. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीसाठी लंके मुंबईत होते. बैठकीनंतर पक्षाच्या विविध नेत्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. विधानसभेत काम करताना आपली बाजू कशी प्रभावीपणे मांडता येईल, याचे धडेही त्यांनी ज्येष्ठांकडून घेतले. बुधवारी सकाळी सहकाऱ्यांसह प्रथमच त्यांनी विधिमंडळात प्रवेश केला. मतदारसंघातील … Read more

अहमदनगर- पुणे महामार्गावर एकाचा मृत्यू

अहमदनगर- पुणे महामार्गावरील सर्वात धोकादायक ठिकाण असलेल्या सुपा बस स्थानक चौकात सोमवारी सकाळी 9 ते 9.30 दरम्यान एक जे. सी.बी. मशीन पारनेरकडून चौक ओलांडून पुण्याकडे वळत होता. तेवढ्यात अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने एक कंटेनर क्र. MH 20 DE 1553 हा जोरात येत होता. ऐन चौकात जे. सी. बी. व कंटेनर याची जोरात धडक होऊन दोन्ही वाहने … Read more

झटपट श्रीमंत होण्यासाठी बनावट नोटा तयार करण्याचा प्लॅन !

 श्रीगोंदा – बनावट नोटा तयार करून त्या वितरित करणाऱ्या टोळीचा श्रीगोंदा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव व तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक गावित यांनी ही कामगिरी केली आहे.  आतापर्यंत अतुल रघुनाथ आगरकर, श्रीकांत सदाशिव माने, अमित भीमराव शिंदे, युवराज लक्ष्‍मण कांबळे, सुमित भीमराव शिंदे, शिवाजी श्रीपती शिंदे … Read more

श्रीगोंद्यात वीस हजारांत ‘एक लाख रुपये’

श्रीगोंदा तालुक्यातील बनावट नोटांप्रकरणी सलीम चांद सय्यद व अण्णा ज्ञानदेव खोमणे (दोघेही रा. घारगाव, ता. श्रीगोंदा) या दोघांना मंगळवारी अटक करण्यात आली.  या प्रकरणात आतापर्यंत एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. बनावट नोटा तयार करून त्या वितरित करणाऱ्या टोळीचा श्रीगोंदा पोलिसांनी पर्दाफाश केला. बनावट नोटाप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यात पकडण्यात आलेल्या आरोपींकडून दररोज नवनवीन माहिती उघडकीस … Read more

वृद्धाला बेदम मारहाण 

नगर: तालुक्यातील बायजाबाई जेऊर येथील वृद्धाला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सुरेश दत्तात्रय तवले, किरण सुरेश तवले, श्रीकांत सुरेश तवले, मंगल दिलीप तवले, गौरव दिलीप तवले, बाबासाहेब पंढरीनाथ ससे, संजय बाबासाहेब ससे, वैशाली संजय ससे, शांताबाई ससे (जेऊर) यांच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.   बाबासाहेब मगर शेतात गेले होतेे. पाण्याचे पाइप काढल्याचे … Read more

माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर गुन्हा दाखल

अहमदनगर : श्रीगोंद्यातील तरुणाचा दशक्रिया विधी महावितरण कार्यालयाच्या आवारात केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह ३० जणांविरुद्ध सोमवारी (दि. ११) कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी येथे शेतात गवत आणण्यासाठी गेलेल्या संदेश आढाव वय १७ याचा शेतातील विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू झाला. … Read more

निवडून आलेले ते सर्व आमदार बिनकामाचे

अहमदनगर :- राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने आता राज्यात निवडून आलेले 288 आमदारांना कोणतेच अधिकार राहिले नसून. यामुळे हे सर्व आमदार बिनकामाचे ठरणार आहेत. राष्ट्रपती राजवटीमुळे राज्यात निवडून आलेले 288 आमदार यांना कोणतेच अधिकार राहणार नाही.राज्यात नवे सरकार अस्तित्वात येईपर्यंत त्यांची अवस्था अशीच राहणार आहे. दरम्यान या आमदारांचं विधानसभा सदस्यत्व कायम राहणार असून जोपर्यंत विधानसभा … Read more

श्रीगोंद्यात कार अपघातात एक ठार

श्रीगोंदा :- स्कार्पिओची (एमएच ४२ के ८६२२) आय टेन कारला (एमएच १६ बीएच ४७१०) धडक बसून जयसिंग मरकड या तरुण इंजिनियरचा मृत्यू झाला, तर अन्य व्यक्ती जखमी झाले. १० नोव्हेंबरला सायंकाळी ५ च्या सुमारास नगर-दौंड रस्त्यावर काष्टीजवळ शिवनेरी पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला. मरकड हे काष्टीहून पाचपुतेवाडीकडे जात होते. स्कार्पिओ चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात … Read more

दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चुलत भावाकडून घरात घुसून लैंगिक अत्याचार

पारनेर :- तालुक्यातील वडगाव दर्या येथे दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्या सख्या चुलत भावाने घरात घुसून लैंगिक अत्याचार केल्याची घटना रविवारी घडली. मुलीचे आई-वडील जवळच्या गावात नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. शाळेला सुटी असल्याने मुलगी घरी एकटीच होती. दुपारी एकच्या सुमारास ती घरात टीव्ही पाहत असताना शेजारी राहणारा चुलत भाऊ घरात आला. त्याने पिण्यासाठी पाण्याची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :रक्ताच्या नात्याला काळिमा वडिलांकडून मुलीवर अत्याचार !

पारनेर :- तालुक्यातील सुपे येथे वडिलांनी मुलीवर लैंगिक अत्याचार करून रक्ताच्या नात्याला काळिमा फासलीय. या घटनेमधील पीडिता अल्पवयीन आहे. वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि,सुप्यातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या बापाने शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास स्वतःच्या मुलीस वासनेची शिकार बनवली. अत्याचारानंतर कोठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची … Read more

सरसकट पीक विमा मिळण्यासाठी प्रयत्नशील: आ.तनपुरे

अहमदनगर: योग्य पद्धतीने नियोजन करून मुळा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून शेती व पिण्यासाठी मुबलक पाणी नगर पाथर्डी तालुक्यांसाठी योजनेमार्फत पुरवले जाईल. शेतकऱ्­यांच्या जनतेच्या हिताच्या प्रश्­नासाठी कायम कटिबद्ध असून, या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्­यांना झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून सरसकट पिक विमा मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याची भावना राहुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली. नगर तालुक्यातील खोसपुरी येथे … Read more