सलग चौथ्या दिवशीही शिर्डी विमानसेवा ठप्प!

काेपरगाव : ढगाळ वातावरणामुळे अपेक्षित दृश्यमानता नसल्याने गेल्या चार दिवसांपासून शिर्डी विमानतळावरील विमानांचे उड्डाण बंदच आहे.  त्यामुळे येणारी ५६ व जाणारी ५६ अशा ११२ विमानांची सेवा बंदच राहिली. त्यामुळे देश-विदेशातून साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची अडचण झाली आहे. साेमवारीही ही सेवा सुरू हाेईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त हाेत आहे. विमानतळ प्रशासनाकडूनही त्याबाबत सांगण्यात आले नाही. … Read more

तलवार हल्ला प्रकरणास वेगळे वळण … त्या तरुणावरही गुन्हा दाखल !

पारनेर :-  शहरातील बंडू ऊर्फ सौरभ मते याच्यावरील हल्ला प्रकरणाने वेगळे वळण घेतले. डोक्याला मार लागल्यामुळे गंभीर जखमी झालेला हल्लेखोर संग्राम कावरे याने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून जखमी सौरभ याच्यावरही खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. १६ नाेव्हेंबरला गणेश व संग्राम कावरे बंधूंनी सौरभवर तलवार व चॉपरने वार केल्याने त्याच्यावर नगरच्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. … Read more

पारनेर मध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

निघोज :-  पारनेर तालुक्यातील निघोज येथील जगप्रसिद्ध रांजणखळग्यात अनोळखी महिलेचा मृतदेह रविवारी दुपारी आढळला. ३५ वय असलेल्या या महिलेच्या अंगावर लाल काळा रंगाचा सलवार व कुर्ता असून पांढऱ्या रंगावर काळे ठिपके आहेत. मृतदेह कुजला असल्याने जागेवर शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी मृतदेह कुंड परिसरात पुरण्यात आला.

दोन तरुणांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची विष प्राशन करून आत्महत्या

नगर –  कॉलेज तरुणीने दोन तरुणाच्या रोजच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार नगर जिल्ह्यातील कर्जत भागात जुने कोर्ट परिसरात घडला.  सविस्तर माहिती अशी की,  नगर जिल्ह्यातील कर्जत भागात जुने कोर्ट परिसरात वैष्णवी राजेंद्र पवार, वय १८ वर्ष, रा. जळकेवाडी, ता. कर्जत हिला दोघा आरोपींनी कॉलेजला येता – जाता नेहमी त्रास … Read more

खोटे सोने पतसंस्थेत तारण ठेवून सव्वाआठ लाखांची फसवणूक !

जामखेड :  तालुक्यातील धर्मात्मा मल्टिस्टेट क्रेडिट संस्थेच्या शाखेत आठ जणांनी ५८० ग्रॅम खोटे सोने खरे असल्याचे तारण ठेवून संस्थेची सव्वाआठ लाख रुपयांची फसवणूक केली. यासाठी संस्थेच्या सोने मुल्यमापकाने त्यास मदत केली यावरून एकंदर नऊ जणांवर संस्थेच्या मुख्य व्यवस्थापकांनी जामखेड पोलिसात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली. याबाबत … Read more

‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष पूर्ववत सुरू करण्याची मागणी 

अहमदनगर : राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष बंद झाला आहे. त्यामुळे गरीब रुग्णांसमोर मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. रुग्णांना उपचार मिळणे दुरापास्त झाले आहे, तरी कक्षाचे कामकाज पूर्ववत सुरू करून गरीब रुग्णांना तातडीने मदत देण्यास सुरुवात करावी, अशी मागणी फुले ब्रिगेडने केली आहे. यासंदर्भात फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दीपक खेडकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी … Read more

पारनेर पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा!

पारनेर: न्यायालयाचा विना जामीन वॉरंट बजाण्यासाठी गेलेल्या पोलिसांना शिवीगाळ, तसेच मारहाण केल्याप्रकरणी पारनेर येथील एकाच कुटुंबातील ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये ३ महिलांचाही समावेश आहे. पारनेर पोलिस ठाण्याचे रामचंद्र पांडुरंग वैद्य व अण्णा चव्हाण हे दोघे पोलिस दीपक मार्तंड पठारे यांच्या विरोधात न्यायालयाने काढलेला विना जामीन वॉरंट बजाण्यासाठी त्यांच्या घरी गुरुवारी सायंकाळी … Read more

पेट्रोल पंप दरोडा प्रकरणातील एका आरोपीस अटक !

नेवासे :-  तपासी अधिकाऱ्यांने बारकाईने तपास करीत बारीक सारीक माहिती मिळवत बारकाईने गुन्ह्याचा तपास करून घोडेगाव पेट्रोलपंप दरोड्यातील आरोपीला अटक केली.   आरोपीने राहुरी तालुक्यातील गुहा येथील दरोड्यासह नगर-औरंगाबाद महामार्गावरील दोन जबरी चोरीच्या गुन्ह्याचीही कबुली दिली आहे. औरंगाबाद महामार्गावरील मनीषा पेट्रोलियम या पागिरे यांच्या पेट्रोल पंपावर गेल्या दरोडा पडला होता. याचा तपास सोनई ठाण्याचे सहाय्यक … Read more

अनाधिकृत स्फोटकांचे गोडाऊन पाडण्याची मागणी

अहमदनगर : इक्सप्लोसिवचे नियमांचे उल्लंघन करुन अरणगाव (ता. नगर) येथे बांधण्यात आलेल्या स्फोटकांच्या गोडाऊचा परवाना रद्द करावा.   तसेच फायर ऑडिट न करता व नगररचना विभागाकडून कोणतीही प्रकारची परवानगी न घेता बांधण्यात आलेले सदरील गोडाऊन पाडण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या रंजना पोटे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. नगर तालुक्यातील अरणगाव मधील गट नंबर 368/1 आणि 368/2 … Read more

सरकार स्थापनेबाबत आमदार रोहित पवार म्हणतात…

अहमदनगर :- राज्यात स्थीर सरकार देण्यासाठी सकारात्मक निर्णय होईल. त्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याची माहिती कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी दिली. राज्यातील राजकीय घडामोडींत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, साहेब निर्णय घेतील तो निर्णय योग्यच असेल. लोकांना बदल हवा असलेले नवे सरकार राज्यात लवकरच स्थापन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एकाच कुटुंबातील बारा जणांना अन्नातून विषबाधा

नगर :- तालुक्यातील देहरे येथील भिल्ल वस्तीमधील माळी कुटुंबातील दहा ते बारा जणांना अन्नातून विषबाधा झाली. विषबाधा झालेले सर्व जण एकाच कुटुंबातील आहेत. देहरे गावात भिल्ल वस्ती आहे. त्या वस्तीवर माळी नावाचे कुटुंब राहते. जुनी व नवी बाजरी एकत्र केल्याने हा विषबाधेचा प्रकार घडला आहे, असे प्राथमिक तपासात सांगण्यात आले. एकाच कुटुंबातील सर्वजण असल्याचे एकच … Read more

या कारणामुळे झाला त्या तरुणावर तलवारीने हल्ला !

पारनेर :- शहरातील सौरभ ऊर्फ बंडू भीमाजी मते (२२) या तरुणावर शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास दोन तरुणांनी तलवार, तसेच चॉपरने वार केले. या हल्ल्यात बंडू मते हा गंभीर जखमी झाला असून त्यास नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर बंडू यांच्यावर नगरच्या खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.शहरातील तरुणांच्या दोन गटांमध्ये … Read more

श्रीगोंद्यात ५ लाखासाठी विवाहितेचा छळ

श्रीगोंदा :- सौ. सोनाली शरद जगताप, वय २५ रा. साबळेवस्ती, येळपणा रोड, लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा येथे सासरी नांदत असताना सासरच्या लोकांनी माहेरुन ट्रॅक्टर घेण्यासाठी लाख रुपये घेवून असे म्हणत शारीरिक व मानसिक छळ केला. घटस्फोटाची मागणी करुन मारहाण करत दमदाटी केली. सौ. सोनाली जगताप या तरुणीने याप्रकरणी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी नवरा शरद … Read more

दर्शनासाठी गेलेल्या विवाहित महिलेचा विनयभंग करत दमदाटी

राहुरी :- दर्शनासाठी गेलेल्या विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना राहुरी तालुक्यातील टाकळीमिया परिसरात घडली याबाबत विवाहितेच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील टाकळीमिया परिसरात असलेल्या एका दर्याच्या ठिकाणी श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव परिसरातील एक विवाहित तरुणी दर्शनासाठी गेली असता ११ च्या सुमारास सदर विवाहित तरुणी तेथे असताना श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील आरोपी बाळासाहेब … Read more

भररस्त्यात सराफाची गाडी अडवून सोने-चांदीचा तीन लाखांचा ऐवज पंपास

तिसगाव –  दुकान बंद करून मोटरसायकलवरून घराकडे निघालेल्या सराफास मोटारसायकलवर आलेल्या पाच चोरट्यांनी अडवून ३ लाखांचा मुद्देमाल लुटला. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तिसगाव येथील दूध संघाजवळ घडली.  सोने-चांदीचे व्यापारी भरत चिंतामणी गुरुवारी आठवडे बाजार आटोपून सायंकाळी मोटरसायकलने पत्नीसोबत घराकडे निघाले होते. वृद्धेश्वर दूध संघाजवळ पाठीमागून दोन पल्सरवरून आलेल्या ५ जणांनी मोटारसायकल आडवी घालून … Read more

कोपर्डीतील बलात्कार खटला मुंबईत चालणार

अहमदनगर :जिल्ह्यातील कोपर्डी शाळकरी मुलीवर बलात्कार व हत्येचा खटला औरंगाबाद खंडपीठाकडून मुंबई उच्च न्यायालयात नुकताच वर्ग झाला असून आता हा खटला मुंबईत चालणार आहे. या बलात्कार व खूनप्रकरणात नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने जितेंद्र बाबूलाल शिंदे, संतोष गोरख भवाळ, नितीन गोपीनाथ भैलुमे या तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. २९ नोव्हेंबर २०१७ रोजी नगरच्या न्यायालयाने हा … Read more

पारनेरमध्ये जेसीबी पळविला !

पारनेर :- तहसिलदार व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अवैध वाळू उपसा करणारा जेसीबी टाकळी ढोकेश्वर येथील शासकीय विश्रामगृह परिसरातून वनकुटे येथील चार वाळू तस्करांनी पळवला. ही घटना गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडली. पोलिस अधीक्षक ईशू सिंंधू यांनी वाळूतस्करी बंद करण्याच्या सूचना प्रत्येक ठाण्याच्या अधिकाऱ्यास दिल्याने वाळूतस्करी थंडावली होती. विधानसभा निवडणुकीत पोलिस तसेच महसूल यंत्रणा व्यग्र झाल्याने अवैध … Read more

…तर बाळासाहेब थोरात होणार उपमुख्यमंत्री !

अहमदनगर :- राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत सरकार स्थापन करायच्या तयारीत आहेत.शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस अशी एक नवीच आघाडी महाराष्ट्रात अस्तित्वात येत आहे. हे तिन्ही पक्ष सत्तास्थापनेसाठी एकत्र येत आहेत. त्यामुळे सहाजिकच सत्तावाटपाचे सूत्र कसे अमलात येईल याबाबत उत्सुकता आहे. मात्र, ही उत्सुकता कायम असतानाच शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कोणत्या नेत्याची किंवा कोणत्या आमदाराची मंत्रिपदावर वर्णी … Read more