नागरिकांच्या जीवाशी खेळणे अधिकाऱ्यांना महागात पडेल – आ.संग्राम जगताप

नगर: महापालिका अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना रस्त्याने फिरणेही अवघड झाले आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणे अधिकाऱ्यांना महागात पडेल. अधिकाऱ्यांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही. नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उपाययोजना कराव्यात, अन्यथा येत्या मंगळवारी (२६ नोव्हेंबर) नागरिकांसह आंदोलन करू, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला. शहरातील नागरी प्रश्नांबाबत आमदार जगताप यांनी … Read more

श्रीगोंदे तालुक्यातील तरुणांनी चोरले पंचायत समिती सदस्य पतीचे ५५ लाख !

पारनेर : उद्योजक सुरेश धुरपते यांच्या आलिशान मोटारीतील ५५ लाखांच्या रोकड चोरीप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे चार लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक जालन्याकडे रवाना झाले आहे.   बुधवारी पहाटे २.३० च्या सुमारास धुरपते यांच्या आलिशान मोटारीची (एम एच ४३ बी. एन. ४५४५) काच फोडून रोकड … Read more

श्रीगोंदे साखर कारखाना परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा

श्रीगोंदे : श्रीगोंदे साखर कारखाना परिसरातील मारुती मंदिरासमोरील खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बुधवारी दुपारी छापा टाकत पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले. जुगाराचे साहित्य व रोख ५ हजार ५३० रुपये पोलिसांनी जप्त केले.  कॉन्स्टेबल संतोष कोपनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. काहीजण तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच पोलिस पथकाने छापा टाकून … Read more

हुंडेकरी अपहरण प्रकरण : आरोपींकडून धक्कादायक खुलासे

अहमदनगर :- शहरातील उद्योजक,व्यावसायिक करीमभाई हुंडेकरी यांच्या अपहरणप्रकरणी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोघांना परतूर (जालना) येथे अटक केली. दोघांकडून मिळालेल्या माहितीनुसार हुंडेकरी यांचे अपहरण २५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी करण्यात आले होते. मात्र या कटाचा सुत्रधार शहरातील कुख्यात गुन्हेगार अजहर मंजूर शेख व त्याचा जोडीदार मात्र पोलिसांच्या सापळ्यातून पसार झाले. अजहर शेख याच्याविरुद्ध अनेक … Read more

पंचायत समितीच्या सदस्य पतीच्या कारमधून ५५ लाख रुपये चोरीला !

पारनेर :- उद्योजक व पंचायत समितीच्या सदस्य सुनंदा धुरपते यांचे पती सुरेश धुरपते यांनी आपल्या गाडीतून तब्बल ५५ लाख रुपये चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे केली. पोलिसांनी या घटनेबाबत संशय व्यक्त करत सुरूवातीला गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. मात्र, मातब्बरांच्या मध्यस्थीनंतर कथित घटना घडल्यानंतर तब्बल १६ तासांनी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. याबाबत उद्योजक … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या संतप्त शेतकऱ्याने राज्यपालांना पाठवला ८ हजारांचा चेक

शेवगाव :- राज्यपालांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्टरी मदत जाहीर केली, मात्र ही मदत अतिशय तुटपुंजी असून त्यात मशागतीचा खर्चसुद्धा निघणार नाही. त्यामुळे मदतीत हेक्टरी एक लाख रुपयांपर्यंत भरीव वाढ करावी, अशी मागणी करत एका तरुण शेतकऱ्याने आपल्या खात्यावर प्रत्यक्षात मदत मिळण्याआधीच आठ हजार रुपयांचा धनादेश बोधेगाव येथील पोस्ट कार्यालयामार्फत स्पीड पोस्टद्वारे राज्यपालांना पाठवला आहे. अवकाळी पावसाने … Read more

आ. रोहित पवार म्हणतात लवकरच सरकार अस्तित्वात येईल

दरम्यान, लग्नानंतर भांडणे करण्यापेक्षा लग्नाअगोदर एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे असल्यामुळे कॉमन चर्चा होणे आवश्यक असून, आमचे वरिष्ठ नेते अंतिम टप्प्यावर पोहचले आहेत. आमचं ठरलं असून, लवकरच सरकार अस्तित्वात येईल

या कारणासाठी झाले उद्योजक हुंडेकरी यांचे अपहरण !

अहमदनगर : येथील प्रसिद्ध उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांच्या अपहरणप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि.१९) जालना जिल्ह्यातील परतूर येथून दोघा आरोपींना ताब्यात घेतले असून, नगर येथील सराईत गुन्हेगार अजहर मंजूर शेख हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील शेखसह आणखी एका आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत. याबाबत सविस्तर माहिती … Read more

बुडालेल्या मित्राला शोधताना मित्राचाही मृत्यू…

शेवगाव :- बंधाऱ्यात बुडालेल्या मित्राला शोधण्यासाठी तो पाण्यात उतरला, परंतु त्याचाही बुडून मृत्यू झाला. दोन तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे वडुले बुद्रूकवर शोककळा पसरली. ही घटना नंदिनी नदीवर असलेल्या बंधाऱ्यात घडली. रजनिकांत ऊर्फ गुड्डू नंदू काते (३०) व अमृत रघुनाथ चोपडे (३८) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. रजनिकांत रविवारपासून घरातून बेपत्ता होता. सोमवारी शेवगाव-मिरी रस्त्यावरील वडुले … Read more

ही व्यक्ती होवू शकते आता अहमदनगर जिल्हापरिषदेची अध्यक्ष !

अहमदनगर :- जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षांची मुदत संपुष्टात येत असल्यामुळे नव्या अध्यक्षपदाची सोडत आज मंगळवारी झाली. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कुठल्या प्रवर्गाकडे जाणार? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लागले लक्ष लागले होते. आज सकाळी ११ वाजता ग्रामविकास मंत्रालयात लकी ड्राॅ पध्दतीने अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढली गेली. राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदांसाठीचे आरक्षणाची सोडत : * अनुसूचित जाती … Read more

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कुठल्या प्रवर्गाकडे जाणार?

अहमदनगर :- नगर जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षांची मुदत संपुष्टात येत असल्यामुळे नव्या अध्यक्षपदाची सोडत मंगळवारी (१९ नोव्हेंबर) होणार आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कुठल्या प्रवर्गाकडे जाणार? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लागले लक्ष लागले आहे. २००१ पासून जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अनुसूचित जातीसाठी एकदा, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकदा, याच प्रवर्ग महिलासाठी एकदा व सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी एकदा असे … Read more

उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांची अशी झाली सुटका, जालन्यातून थेट बस द्वारे असे पोहोचले अहमदनगर मध्ये !

अहमदनगर :- आज पहाटे अपहरण झालेले प्रसिद्ध उद्योजक करीमभाई हुंडेकरी पोलिसांना जालन्यात सापडले, अपहरणकर्त्यांनी हुंडेकरी यांना नगरमधून पळवून जालन्यात सोडून दिलं.  उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे सोमवारी सकाळी पिस्तुलाचा धाक दाखवून कोठला परिसरातून सिनेस्टाईलने अपहरण करण्यात आले होते. दरम्यान, अपहरकर्ते त्यांना जालना येथे सोडून फरार झाले. त्यानंतर दुपारी हुंडेकरी हे नगरला सुखरुप पोहचले. त्यांना नगरच्या पोलिसांनी … Read more

विकासकामांत राजकारण करणार नाही – आ. रोहित पवार

कर्जत: तालुक्यातील गावे बूथ कमिटीव्दारे ज़ोडण्यात येतील, अशी माहिती आ. रोहित पवार यांनी दिली. कर्जत तालुक्यात गावनिहाय बूथ कगिटची स्थापना करण्याच्या उद्देशाने काँग्रेस -राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत आ. पवार बोलत होते. तालुक्याच्या विकासाचा आराखडा मांडताना, आगामी काळात जनतेच्या हिताचीच कामे होतील. विकासकामांत राजकारण करणार नाही, कर्जत तालुक्यातील प्रत्येक गावाचे प्रश्न सोडविण्यासाठी गावागावांत बूथ कमिटीची स्थापना करणार … Read more

..तर शेतकऱ्याच्या मुलगा करणार आत्मदहन !

कर्जत :कुकडी कालव्यासाठी संपादित केलेल्या ज़मिनीचा योग्य मोबला न मिळाल्याने कोरेगाव येथील मूकबधिर शेतकरी हणुमंत मारुती जाधव यांचा मुलगा अशोक हणुमंत जाधव यांनी सोमवार, दि.१८ रोजी कर्जत येथील उपविभागीय कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतची महिती अशी की, तालुक्यातील कोरेगाव येथील मूकबधिर शेतकरी हणुमंत मारुती जाधव यांची गटनंबर १५०३ मध्ये शेती असून, यातील १५०३/२ … Read more

अहमदनगरमध्ये मराठा उद्योजकांचा उद्या मेळावा

अहमदनगर : संपुर्ण भारत देशातील मराठा व्यावसायिक व उद्योजकांना एकत्र आणत सुरु करण्यात आलेल्या मराठा उद्योजक लॉबीच्यावतीने उद्या मंगळवार दि.१९ रोजी शहरातील साई मुरली लॉन्स येथे मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती एम.यु.एल.चे संस्थापक अध्यक्ष विनोद बढे यांनी पत्रकार परिषदेत दिली. रविवारी झालेल्या पत्रकार परिषद प्रसंगी राजेंद्र अवताडे, अशोक कुटे, किशोर मरकड, संदीप खरमाळे, उदय थोरात … Read more

 निकृष्ट दर्ज्यांच्या कामांचा आ. लंकेंनी केला पर्दाफाश 

पारनेर – सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेली व सध्या सुरू असलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा पर्दाफाश आमदार नीलेश लंके यांनी अधिकाऱ्यां समवेत केलेल्या पाहणीदरम्यान रविवारी केला.  लंके यांनी विविध खात्यांच्या प्रमुखांची तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्याच वेळी निकृष्ट कामांविषयी नाराजी व्यक्त करत या कामांची पाहणी करण्याचे जाहीर केले होते. सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियांता राऊत, … Read more

अपहरण झालेले उद्योजक करीम हुंडेकरी यांची सुखरूप सुटका !

अहमदनगर :-  आज सकाळी पिस्तूलाच्या धाकाने अपहरण झालेले शहरातील प्रतिष्ठित उद्योजक करीम हुंडेकरी यांना पोलिसांच्या पथकाने औरंगाबाद-जालना रोडवरुन सुखरुपपणे ताब्यात घेतले असून उद्योजक हुंडेकरी यांना सव्वातीन वाजता नगरमध्ये आणण्यात आले आहे. शहरातील उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे आज पहाटेच्या सुमारास कोठला परिसरातून सिनेस्टाईल अपहरण झाले होते. या घटनेुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. अपहरणकर्त्यांच्या माहिती काढून … Read more

नागवडे साखर कारखान्याच्या अजब फतव्याने सभासदांत तीर्व नाराजी 

File Photo

श्रीगोंदे –  सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ५ महिन्यांवर येऊन ठेपली असताना कारखाना प्रशासनाने एका वर्तमानपत्रात जाहीर नोटीस देऊन ज्या सभासदांचे शेअर्स अपूर्ण आहेत, त्यांनी डिसेंबरअखेर पूर्ण करावेत, अन्यथा मतदानास वंचित राहावे लागेल असा फतवा काढल्याने सभासदांमध्ये नाराजी पसरली आहे.  नागवडे कारखान्याची उभारणी सुमारे ४५ वर्षांपूर्वी झाली, त्यावेळी सभासदत्व शुल्क ३ … Read more