नदीपात्रात उडी मारून तरुणाची आत्महत्या

राहुरी :- मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या पाथरे खुर्द येथील गणेश मोतिराम हापसे (३०) या तरूणाने प्रवरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता ही घटना घडली. स्थानिक शेतकऱ्यांनी नदीपात्रात गणेशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आत्महत्या केलेल्या नदीपात्राच्या ठिकाणाची खोली २० फुटांच्या पुढे होती. सायंकाळी अंधार पडल्याने शोधकार्यावर … Read more

पीकविमा कंपन्या हा महाराष्ट्राला लागलेला सर्वात मोठा शाप !

पारनेर :- पीकविमा कंपन्या हा महाराष्ट्राला लागलेला सर्वात मोठा शाप आहे. या कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न भंग होत असल्याची खरमरीत टीका खासदार सुजय विखे यांनी बुधवारी केली. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची विखे यांनी भाळवणी, वासुंदे, कर्जुलेहर्या येथे भेट देऊन पाहणी केली. सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळेल … Read more

ना. विजय औटी यांच्यासह पदाधिकार्यांच्या शेतीचे जास्त नुकसान झाले नसावे ‘त्या’ वादावर खा.विखे यांचा चिमटा !

पारनेर- ना. विजय औटी यांच्यासह पदाधिकारी यांना बुधवारी माझ्या तालुका दौऱ्यासंदर्भात निरोप दिले असताना ते या दौऱ्यात का सहभागी झाले नाही ते कळाले नाही. यामुळे एकतर त्यांच्या शेतीचे जास्त नुकसान झाले नसावे किंवा त्यांचे पंचनामे राहिले असावेत, असा चिमटा खा. डॉ. सुजय विखे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तर दुसरीकडे सध्या राजकीय परिस्थिती पाहता यावर … Read more

आमदार रोहित पवारांच्या विजयी मिरवणुकीमुळे छगन भुजबळ यांच्या स्वीय साहाय्यकास जेलची हवा !

जामखेड :- मतदारसंघात एकीकडे पिकांचे नुकसान आणि दुसरीकडे आमदार रोहित पवार यांच्या मिरवणुकीवरील उधळपट्टी हा चर्चेचा विषय झाला होता मात्र आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विजयी मिरवणुकीत गालबोटही लागल्याचेही समोर आले आहे. हृदयविकाराचा झटका बसलेल्या आईला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या लेकरास तुरुंगात जावे लागले आहे. रस्ता मोकळा करून देण्याचे सोडून पोलिसांनी रुग्णवाहिकाच अडविण्याचे … Read more

खा. सुजय विखेंच्या ताफ्यातील वाहन दरीत कोसळले

पारनेर : खा. सुजय विखेंच्या ताफ्यातील पोलिसांचे वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात पोलीस उपनिरीक्षकांसह दोन पोलीस जखमी झाले आहेत. ही घटना पिंपळगाव-अळकुटी रोडवरील गारखिंडी घाटात बुधवारी दुपारी घडली. या अपघातात चालक पो. कॉ. पोपट मोकाते यांचा पाय मोडला असून त्यांना पुढील उपचारासाठी विळद येथील विखे पाटील रूग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले आहे.  तर या अपघातात … Read more

पिकांचे सरसकट पंचनामे करून महिनाभरातच मदत देणार – खा. डॉ. सुज़य विखे

राशीन : कर्जत तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून, या नुकसानग्रस्त भागास भेट देऊन खा. डॉ. सुज़य विखे यांनी पाहणी केली. या वेळी नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करून त्यांना महिनाभरात मदत मिळवून देण्याचे आश्­वासन खा. विखे यांनी दिले. कर्जत तालुक्यातील भांबोरा येथून आज सकाळी खा. विखे यांच्या दौऱ्यास प्रारंभ … Read more

पूर्ववैमनस्यातून बिर्याणी हाऊस व त्यालगत असलेले घरही पेटवले

श्रीगोंदा : काही महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दि.४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथील बेलवंडी फाट्यावरील काळे मामा बिर्याणी हाऊस हे हॉटेल व त्यालगत असणारे घर पेटवून दिल्याची घटना घडली.  सदर घटनेबाबत रेखा संजय काळे यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दत्ता रामदास जाधव रा.(गव्हाणेवाडी) बेलवंडी फाटा, ज्ञानेश्वर शंकर … Read more

जिल्ह्याच्या भूजल पातळीत समाधानकारक वाढ,भूजल सर्वेक्षणचा अहवाल

अहमदनगर : जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांत भूजल पातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. जिल्ह्यातील १ हजार ६०२ गावांना येत्या ३१ मार्चअखेर टंचाईची झळ बसणार नाही.  या संदर्भात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून जिल्ह्यातील पंधराशे सत्तावीस निरीक्षण विहिरींच्या १५ ऑक्टॉबर दरम्यान नोंदी घेण्यात आल्या होत्या.  यासाठी प्रशिक्षित जलसुरक्षक नियुक्त करण्यात आले होते. आता यासंदर्भातील भूजल सर्वेक्षणचा अहवाल प्राप्त … Read more

खा.डॉ.सुजय विखेंकडून ‘त्या’ अधिकारी व ठेकेदाराची कानउघाडणी

पाथर्डी –कल्याण-निर्मल राष्ट्रीय महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामांबाबत संसदेच्या अधिवेशनानंतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत अंतिम बैठक घेऊ, असे सांगत खासदार डॉ. सुजय विखे यांनी अधिकारी व ठेकेदाराची कानउघाडणी केली.  डिसेंबरअखेर काम मार्गी लावा; अन्यथा माझ्या मर्जीतील ठेकेदारांकडून काम पूर्ण करून घ्या, त्याची जबाबदारी मी घेतो, असेही ते म्हणाले. तहसील कार्यालयात सोमवारी महामार्गाचे अधिकारी, पदाधिकारी, ठेकेदार प्रतिनिधी … Read more

पारनेर तालुक्यातील जनतेसाठी जनता दरबार घेण्याचा संकल्प – आ. निलेश लंके

पारनेर : अतिवृष्टीमुळे पारनेर तालुक्यातील खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. महसूल व कृषी अधिकाऱ्यांनी शासनाच्या नियमांवर बोट न ठेवता सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी आ. नीलेश लंके यांनी केली आहे.  शासनमान्य दुकाने, शिधापत्रिका व इतर सोयीसुविधांविषयी माहिती घेत सर्वसामान्य लोकांचे हेलपाटे कमी करावेत, अशीही मागणी … Read more

रोहित पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघास सक्षम आमदार लाभला

जामखेड : अनेक वर्षांपासून आम्ही राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या २० वर्षीपासून एक निष्ठेने काम केले. देशात व राज्यात पुरोगामी आघाडी सरकारची सत्ता होती आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी हे भारतीय जनता पक्षाचे होते. २५ वर्षे सतत सत्तेच्या विरोधातील आमदार असायाचा त्यामुळे या मतदारसंघातील कोणत्याही प्रकारचे उद्योगधंदे व सुविधा उपलब्ध झाल्या … Read more

एकही शेतकरी वंचित राहणार नाही – खा. डॉ. सुजय विखे

शेवगाव :- अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान १०० टक्के असून, शेतीचे पंचनामे करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आकडेवारीचा खेळ न करता सरसकट पंचनामे करून शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, या जाणिवेतून काम करावे, अशा सूचना खा. डॉ. सुजय विखे यांनी दिल्या. खा. विखे यांनी आज मुंगी, हातगाव व गदेवाडी या गावांत समक्ष भेटी देऊन शेतात जाऊन अतिवृष्टीमुळे … Read more

अहमदनगर बाजारभाव : अवकाळी पावसाचा भाज्यांना फटका

नोव्हेंबर महिना उजाडला तरी राज्याच्या अनेक भागांत अद्यापही पाऊस कमी, अधिक प्रमाणात सुरूच आहे. या बदललेल्या वातावरणाचा भाज्यांवर विपरीत परिणाम झाला आहे.  बाहेर गावाहून नगर बाजार समितीत येणाऱ्या ५० ते ७० टक्के भाज्या पावसामुळे कुजल्या आहेत. परिणामी हाती उरलेला थोडाफार माल प्रचंड चढ्या भावाने विकला जात आहे. स्वाती नक्षत्राच्या सरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणत बरसल्या. २४ … Read more

कर्जबाजारी पणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या

पारनेर :- कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून साबळेवाडी येथील शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. बाळू सुखदेव चाटे (वय ५०) यांनी शेतीसाठी बँकांकडून कर्ज घेतले होते. गेल्या वर्षी दुष्काळात त्यांचे उसाचे पीक जळाले. यावर्षी अतिवृष्टीने शेतातील पिके वाया गेल्याने बँकांचे कर्ज भरता आले नाही. त्यामुळे त्यांना नैराश्य आले होते. त्यांनी २ ऑक्टोबरला विषप्राशन केले. त्यांना पुण्यातील रूग्णालयात … Read more

शहर विकासासाठी सर्वांनीच मिळून काम करणे गरजेचे : आ. जगताप

अहमदनगर :- हे शहर माझे आणि आणि मी या शहराचा एक घटक आहे,असे मानले तरच आपण शहरचा चेहरा मोहरा बदलू शकतो. शहराचा विकास साधायचा असेल तर सर्वांनीच मिळून काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. आमदार संग्राम जगताप यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने नुकतीच महनगरपालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन शहराच्या विकासासाठी … Read more

माहेरी भाऊबीज करून सासरी निघालेली विवाहिता दोन मुलांसह बेपत्ता

राहुरी :- श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी येथे माहेरी भाऊबीज करून सासरी निघालेली राहुरी येथील विवाहित महिला व तिची दोन चिमुकली मुले राहुरी फॅक्टरी येथून गायब झाल्याने खळबळ उडाली. राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड चौकात रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. सोनम संजय झावरे (वय २७) असे या महिलेचे नाव असून ती आपली मुले यश (चार … Read more

कुटुंबीयांकडून होणार्या बायकोच्या छळाला कंटाळून धरणात उडी घेऊन पती पत्नीची आत्महत्या !

पाथर्डी :- तालुक्यातील शिरापूर येथील पती-पत्नीने पैठण येथील जायकवाडी धरणात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आल्याने शिरापूर गावावर शोककळा पसरली आहे.  पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील सचिन विठ्ठल लवांडे (वय 29) व पत्नी कीर्ती सचिन लवांडे (वय 24) हे दोघे शनिवारी भाऊबीजेनिमित गावी गेले होते, रविवारी रात्री उशिरा कुटुंबियांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला … Read more

नगरकर नागरिकांना पोलिसांचे आवाहन, चावा घेणाऱ्या व्यक्ती बद्दल अफवा नकोत…

गेल्या तीन-चार दिवसांपासून तोफखाना पोलीस स्टेशनचे हद्दीत वेगवेगळ्या भागात लोकांना चावणारा एक तरूण मनोरुग्ण हा फिरत असल्याबाबत अनेक फोन कॉल्स तोफखाना पोलीस स्टेशन येथे तसेच पोलीस कंट्रोल रूम येथे प्राप्त झालेले असुन त्या फोन कॉल्सचे आधारे तात्काळ पोलिसांनी मिळाले फोन कॉल्स ठिकाणी जाऊन स्थानिक नागरिकांचे मदतीने खात्री केली असता असा कोणताही तरुण मनोरुग्ण मिळून आलेला … Read more