बाळासाहेब नाहाटा पुन्हा कायद्याच्या कचाट्यात सापडले !

श्रीगोंदे :- बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा पुन्हा कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. धनादेश न वटल्याच्या पुण्यातील एका व्यक्तीने दिलेला तक्रारीनंतर सासवड व श्रीगोंदे पोलिसांनी मंगळवारी नाहाटा यांना लोणी व्यंकनाथ येथे ताब्यात घेतले. नाहाटा यांना सासवड न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले असल्याने त्यांना सासवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी … Read more

पुत्रप्रेमामुळे अखेर राधाकृष्ण विखे पाटील भाजपात दाखल !

अहमदनगर :- मुलाच्या भाजप प्रवेशानंतर राजकीय कोंडीत सापडलेले विरोधी पक्षनेतेे राधाकृष्ण विखे यांनी पुत्रप्रेमापोटी अखेर भाजपच्या स्थानिक नेत्यांशी मेळ बसवत जुळवून घेतले. मंगळवारी डॉ. सुजय यांच्या सावेडीतील संपर्क कार्यालयात राधाकृष्ण विखे यांनी शहर भाजप, शिवसेनेच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देखील पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली.पालकमंत्री राम शिंदे, विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांबरोबर … Read more

श्रीगोंद्यात मुलानेच केला पित्याचा खून.

श्रीगोंदे :- तालुक्यातील निमगाव खलू येथे मुलानेच पित्याचा खून केल्याची घटना  रविवारी मध्यरात्री घडली. दिलीप ऊर्फ दिल्या त्रिंबक भोसले असे मृताचे नाव आहे.  त्याचा मुलगा गोगल्या याला पोलिसांनी अटक केली आहे. दिलीपचा मुलगा गोगल्या ऊर्फ बुट्या भोसले हा थोडा वेडसर असून त्याच्यावर दौंड पोलिस ठाण्यात ड्रॉपचा गुन्हा दाखल आहे.  त्याने या अगोदरही आई-वडिलांना मारहाण केली … Read more

कॉपी करू दिली नाही म्हणून परीक्षा विभागप्रमुखास मारहाण

शेवगाव :- तालुक्यातील दहिगावने येथील मारुतराव घुले महाविद्यालयात वार्षिक परीक्षा सुरु असताना कॉपी करु दिली नाही, या कारणावरुन परीक्षा विभागप्रमुख प्रा. महेश नामदेव शेजुळ (नेवासेफाटा) यांना सात विद्यार्थ्यांनी शुक्रवारी महाविद्यालयाच्या मैदानावर फायटर, चेनने मारहाण केली. याबाबत सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. गुन्हा दाखल होऊ नये, म्हणून अनेक अधिकाऱ्यांचे फोन … Read more

पालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या छावण्यांना दंड

जामखेड :- तालुक्यातील २१ छावणीचालक संस्थांना सहा लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्यामुळे सर्वच छावणीचालकांचे धाबे दणाणले आहे. यातील अनेक छावण्या पालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या आहेत. तालुक्यात पन्नास छावण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पंचेचाळीस सुरू झाल्या आहेत. ५ एप्रिलला पाच छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे.  शासनाने छावणी चालकांवर अनेक अटी घातल्या आहेत. तथापि, छावणी … Read more

निष्ठावंत भाजप करणार संग्राम जगतापांचे काम !

श्रीगोंदा :  भाजपच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना वेगळी वागणूक देत पक्षाच्या कार्यक्रमातून कायमच बाजूला ठेवले. तालुक्यातील नेत्यांच्या या वागण्याला पालकमंत्री व खासदार यांनीही एक प्रकारे पाठबळच दिल्याने निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप करीत लोकसभा निवडणुकीप्रसंगी काँग्रेस आघाडीचे काम करण्याचा निर्णय करणार असल्याचे निष्ठावंत भाजप पदाधिकार्यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची  शहरातील बालाजी मंगल कार्यालयात बैठक झाली . त्यात … Read more

धनश्री विखेंचा अर्ज का ठरला अवैध ? २६ अर्ज ठरले वैध !

नगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी ३१ उमेदवारांनी एकूण ३८ अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी झालेल्या छाननीमध्ये २६ उमेदवार निवडणुकीसाठी वैध ठरले आहेत. यापैकी सुदर्शन लक्ष्मण शितोळे यांचा अपक्ष अर्ज वैध ठरला, तर पक्षाकडून सादर केलेला अर्ज अवैध ठरला. इतर पाच उमेदवारांचे अर्जही अवैध ठरल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी अजय मोरे यांनी दिली.  … Read more

राजकीय पक्ष आणि पार्ट्यांमुळे देशाच्या विकासाला खीळ- अण्णा हजारे

पारनेर : राजकीय पक्ष आणि पार्ट्यांमुळे खेड्यांचा विकास थांबला आहे. पर्यायाने देशाच्या विकासाला खीळ बसली प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. राळेगणसिद्धी येथे पार पडलेल्या सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या कार्यक्रमप्रसंगी हजारे बोलत होते.  या वेळी महासंघाचे अध्यक्ष नामदेव घुले, सरचिटणीस अशोक सब्बन, सहचिटणीस दत्ता आवारी, उपाध्यक्ष कैलास पटारे, उपाध्यक्ष रोहिणी गाजरे, संघटक प्रवीण साठे, खजिनदार … Read more

५ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस १० वर्षे सक्तमजुरी

अहमदनगर :- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस दोषी ठरवत जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांनी १० वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. भगवान विश्वनाथ वाघमारे (६३, ढाकणवाडी, ता. पाथर्डी) असे आरोपीचे नाव आहे. त्यान घरात एकटी असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकलीला उचलून आणून तिच्यावर अत्याचार केला होता. ही घटना १ एप्रिल … Read more

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

अहमदनगर:  लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झालेली असून विविध पक्ष संघटना यांचे लोकसभा प्रचाराचे रॅली, सभा यासारखे कार्यक्रम चालू आहेत. निवडणूकीचे अनुषंगाने सर्व राजकीय पक्षाकडून आपली राजकीय ताकत दाखविण्‍याच्‍या उद्देशाने वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामध्‍ये मोठया प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहत आहेत तसेच सध्‍या लोकसभा निवडणूक 2019 अनुषंगाने उमेदवारी अर्ज भरण्‍याची प्रक्रिया चालू असून विविध राजकीय … Read more

‘त्या’ चा बालहट्ट पुरवला नाही म्हणून काँग्रेसला धोका – आ. बाळासाहेब थोरात

 श्रीगोंदा : काँग्रेसने विखे कुटुंबाला मंत्रिपदे दिली, विरोधी पक्षनेतेपद दिले, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले. खासदारकीचे तिकीटही तुमच्या मुलालाच पाहिजे.  त्याचा बालहट्ट पुरवला नाही म्हणून तुम्ही काँग्रेसला धोका देऊन भाजपमध्ये गेला, अशी टीका आमदार बाळासाहेब थोरात यांनी येथील मेळाव्यात केली.  लोकसभेचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी आयोजित कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. अध्यक्ष बाबासाहेब … Read more

सुवेंद्र गांधींचा ‘यु टर्न’ निवडणुकीतून माघार

नगर : लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्या विरोधात उमेदवारी करण्याची घोषणा केल्यानंतर खा.दिलीप गांधी यांचे सुपूत्र सुवेंद्र गांधी यांनी आता ‘यु टर्न’ घेतला आहे. पक्षाचा आणि खा.दिलीप गांधी यांचा आदेश मानून आपण उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला असून, पक्षाच्याच उमेदवाराचे काम करणार असल्याचे सुवेंद्र गांधी यांनी निर्णय घेतला आहे. खा. दिलीप गांधी यांचे तिकीट कापल्यानंतर … Read more

भाजपच्या व्यवस्थापन समितीतून खा. गांधीना वगळले!

नगर : भारतीय जनता पक्षाच्या नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या व्यवस्थापन समितीची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा निवडणूक प्रमुख राम शिंदे यांनी केली. या समितीतून खा. गांधी यांना वगळण्यात आले. संयोजकपदी प्रसाद ढोकरीकर, निवडणूक सहप्रमुखपदी अभय आगरकर, प्रचार प्रमुखपदी नामदेव राऊत, आचारसंहिता प्रमुखपदी (कायदेशीर) अ‍ॅड.युवराज पोटे यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडून नगर दक्षिण … Read more

रेल्वेखाली उडी घेऊन तिघांची आत्महत्या.

राहुरी :- दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर वांबोरी रेल्वेस्थानकानजीक रेल्वेखाली तिघांनी आत्महत्या केली. त्यात दोन महिला व एका लहान मुलाचा समावेश आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली. माय-लेकराची ओळख पटवण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. मात्र, ५२ वर्षांच्या महिलेची ओळख अजून पटू शकलेली नाही. आत्महत्येचे कारणही समजू शकले नाही.  वर्षा गिरीराज तिवारी-ठुबे (वय ४३), मुलगा अनुप गिरीराज तिवारी (वय … Read more

अरूणकाकांनी सभागृहात कधी तोंड देखील उघडले नाही !

श्रीगोंदा :- शरद पवार हे फक्त हुल देतात. मी त्यांच्या पक्षासाठी एवढा त्याग करूनही त्यांनी मला व माझ्या कुटुबीयांना खूप त्रास दिला आहे. असल्याची टीका माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी केली. काष्टी येथे युतीच्या प्रचारमेळाव्यात ते बोलत होते. नगर दक्षिणमध्ये जगताप नावाचे तीन आमदार आहेत. मात्र, अरूणकाकांनी सभागृहात कधी तोंड देखील उघडले नाही. तर, इतर दोघांनी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील आघाडीच्या दोन्ही जागा अडचणीत !

शिर्डी : काँग्रेसचे शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे अडचणीत सापडले आहेत. कांबळेंचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या श्रीरामपूर येथील विखे समर्थक कार्यकर्त्यांनी कांबळेंना मदत न करण्याची भूमिका घेतली आहे. दक्षिण लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये झालेल्या बिघाडीनंतर शिर्डीतही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतल्याने काँग्रेसमधील दुफळी चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेस नेते राधाकृष्ण पाटील यांचे चिरंजीव आणि नगर दक्षिणचे भाजप उमेदवार सुजय … Read more

शरद पवारांचा मटका आता लागणार नाही, हे निश्चित !

अहमदनगर :- भाजप सरकार शेतकऱ्यांचे असून सत्तेचा वापर जनतेसाठी करण्यात येतो. कुकडीचे आवर्तन हे पोलिसांच्या संरक्षणात सोडण्यात येणार आहे. दक्षिण नगरमध्ये सुजय विखे यांची सुनामी लाट आली आहे.’ या वेळी पार्थ पवार यांच्या भाषणाची नक्कल करून राम शिंदे म्हणाले की, ‘जर साधे भाषण करणेही जमत नसेल तर ते आधी शिकून घ्यावे, जमत नसेलतर त्यात पडू … Read more

…म्हणून संग्राम जगताप यांचा फॉर्म भरायला जाणार नाही – राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आघाडी धर्म पाळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार संग्राम जगताप यांचा उमेदवारी फॉर्म भरायला जाणार नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. बंडाचा झेंडा फडकवत मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर नवा पेच उभा राहिला आहे.  भाजपचे नगर … Read more