सुजय विखेंचा बंदोबस्त आपण करू – आ.संग्राम जगताप

अहमदनगर :- मी जर प्रत्येक घडामोडीकडे बारकाईने लक्ष दिलेे असते, तर गाडी राहुरीच्या पुढेच आली नसती. बरं आता आलीच आहे, तर परत पाठवून दण्याचे काम संग्राम जगताप करणार आहे. गाडी कोणत्याही बॅगा घेऊन येऊ द्या, त्याचाही बंदोबस्त आपण करू, असा टोला राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी भाजपचे डॉ. सुजय विखे यांचे नाव न घेता … Read more

खासदार.दिलीप गांधी उद्या भूमिका जाहीर करणार.

नगर | विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून भाजपने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिली. या पार्श्वभूमीवर खासदार गांधी रविवारी (२४ मार्च) मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत. दरम्यान, गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र हे सध्या ग्रामीण भागातील जनावरांच्या चारा छावण्यांना भेटी देण्यात मग्न आहेत. खासदार गांधी यांनी शेवटपर्यंत … Read more

गडाखांच्या घराची झाडाझडती निषेधासाठी एकवटले नगरकर

अहमदनगर – नगरच्या साहित्य चळवळीला दिशा देणारे प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व माजी खासदार तथा ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या घराची झाडाझडती घेताना प्रशासनाने त्यांच्याशी केलेल्या अशोभनिय वर्तनाचा निषेध करण्यासाठी नगरकर एकवटले. विविध क्षेत्रातील प्रतिष्ठितांनी एकत्र येत निषेध करणारे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देत चौकशीची मागणी केली. तसेच भविष्यात असे प्रकार यापुढे घडणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी मागणीही यावेळी … Read more

मतदारसंघाबाहेरील सुजय विखेंचे ‘पार्सल’ परत पाठवा

कर्जत : मतदारसंघाबाहेरील डाॅ. सुजय विखेंचे पार्सल परत पाठवा. आरोग्य शिबिराच्या नावाखाली विखे खर्च करत असलेले पैसे जनतेचे व सरकारचे आहेत, त्यांचे स्वतचे नाहीत, असे काँग्रेसच्या बैठकीत सांगण्यात आले.  डाॅ. विखेंच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर येथील भाग्यतारा मंगल कार्यालयात तालुकाध्यक्ष किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तालुका काँग्रेसची बैठक झाली. या वेळी बाळासाहेब साळुंके, प्रवीण घुले, अ‍ॅड. कैलास शेवाळे, … Read more

सुजय विखे VS संग्राम जगताप होणार फाईट!

अहमदनगरमधून लोकसभेसाठी भाजपच्या सुजय विखेंविरुद्ध संग्राम जगपात यांचं नाव निश्चित करण्यात आलंय. संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे नगर शहरमधून सध्याचे आमदार आहेत. शिवाय त्यांचे वडील अरुण जगताप हे राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. तर भारतीय जनता पक्षाकडून डॉ. सुजय विखे यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याने नगरमध्ये आता संग्राम विरूद्ध सुजय असा दोन युवा नेत्यांमध्ये सामना रंगणार आहे. … Read more

अखेर राष्ट्रवादी कडून आ. संग्राम जगताप यांना उमेदवारी

अहमदनगर : आ संग्राम जगताप यांना नगर दक्षिण साठी उमेदवारी मिळाल्याचे संकेत आ संग्राम जगताप यांनी स्वतः कार्यकर्त्यांना दिले आहेत. नगर दक्षिण उमेदवारी साठी आ. जगताप पिता पुत्रांमध्ये घोळ सुरु होता. पण आ. संग्राम जगताप यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ठ संकेत दिले आहेत.  त्या नुसार शहरातील राष्ट्रवादी चे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. या नुसार आज राष्ट्रवादी युवक … Read more

डोक्यात लोखंडी सळई खालून शेतकऱ्याचा खून

नगर : छप्पन गुंठे जमिनीच्या वादातून दत्तात्रय सुखदेव ठुबे (५६ वर्षे) या शेतकऱ्याचा डोक्यात लोखंडी सळईने वार करून खून करण्यात आला.  ही घटना पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथील शेतजमिनीत शनिवारी रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. दत्तात्रय सुखदेव ठुबे (नारायण गव्हाण, ता. पारनेर) हे राहत असलेल्या घरासमोरील विकलेल्या ५६ गुंठे जमिनीच्या … Read more

दक्षिणेचा घोळ दोन दिवसात मिटणार

नगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात उमेदवारीचा घोळ अजूनही संपण्याची चिन्हे नाहीत. होळीनंतरच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा घोळ मिटणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.  आचारसंहिता जारी होऊन दहा दिवस उलटले असले, तरी या मतदारसंघातून कुठल्याच पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर न झाल्याने संभ्रम वाढला आहे. भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर होण्यास विलंब लागत असल्यामुळे उमेदवारांसह … Read more

अनैतिक संबधातून पत्नीला मारहाण करणाऱ्या पती आणि मैत्रिणीला अटक

राहुरी : अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीला माहेरी जाऊन लाथाबुक्क्याने मारहाण करणारा शहाजी गाडेकर व त्याच्या मैत्रिणीला पोलिसांनी गजाआड केले.  शहाजी पत्नी संगीताचा छळ करत असे. त्याला कंटाळून ती मुलांना घेऊन माहेरी गेली. शहाजी व त्याच्या मैत्रिणीने संगीताच्या माहेरी जाऊन लाथाबुक्क्याने मारहाण केली. महिन्याभरापूर्वी संगीताने पोलिस ठाण्याच्या आवारात अंगावर पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. 

…तर जगताप यांच्या विरोधात आ. कर्डिले करणार प्रचार

राहुरी : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसव काँग्रेस आघाडीने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आमदार अरुण जगताप किंवा आमदार संग्राम जगताप यांना दिली तरी आपल्यासमोर कोणतेही धर्मसंकट नाही. आपण भारतीय जनता पक्षाबरोबरच आहोत. नातेसंबधांना प्राधान्य देण्याचा प्रश्नच नाही असे आमदार शिवाजी कर्डिले यांनी आज स्पष्ट केले. काँग्रेस चे युवानेते डॉ. सुजय विखेंचा नुकताच भारतीय जनता पक्षात … Read more

श्रीगोंदा येथे तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथे मजुरी करणारा तरुण सुनील लक्ष्मण म्हसकर (वय ३३) याने सोमवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.  मढेवडगाव येथे तरुणाची आत्महत्या गळफास घेतल्याचा प्रकार घरातील मंडळींच्या लक्षात आल्यावर त्याला तातडीने दौडच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे तपासणीनंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. दौंड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदवून … Read more

आमदार संग्राम जगताप अजित पवारांच्या भेटीला

 नगर : राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांना अचानक भेटीसाठी बोलावल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी भवन येथे सोमवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेली बैठक रद्द करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार जगताप यांनी ही बैठक बोलावली होती. जगताप यांना अचानक भेटीसाठी बोलावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले … Read more

नगर दक्षिणेतील उमेदवारांचा तिढा संपेना

नगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात उमेदवारीचा घोळ अजूनही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागून सात दिवस उलटले असले, तरी या मतदारसंघातून कुठल्याच पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर न झाल्याने संभ्रम वाढला आहे. दरम्यान भाजपची पहिली यादी रविवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. या पहिल्या यादीकडे जिल्ह्याचेही लक्ष लागले आहे.  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली … Read more

खून प्रकरणातील फरार आरोपीस अटक

नगर : मोक्का व खून प्रकणातील फरार आरोपी कोतवाली पोलिसांनी पाठलाग करून गजाआड केला. लोकेश परशुराम माने (२७, रा. कैकाडी गल्ली, ता. बारामती, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये ११ गुन्हे दाखल आहेत.  बारामती शहर पोलिसांनी त्याच्या विरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली होती, तेव्हापासून आरोपी लोकेश फरार होता.  पुणे … Read more

खा. गांधींसह त्या ६४ जणांचे शस्त्र परवाने रद्द

नगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खासदार दिलीप गांधी यांच्यासह ६४ जणांचे शस्त्र जमा करून त्यांची परवाने रद्द केले आहेत.  जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वीच नेत्यांसह अनेकांचे शस्त्र जमा करून घेण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन नये त्या पार्श्वभूमीवर ही कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तब्बल जिल्ह्यातील ६४ जणांचे शस्त्र परवाने … Read more

वडील प्रचाराला येणार नाहीत याचे दु:ख – सुजय विखे पाटील.

मुंबई – भाजप प्रवेशानंतर वडिलांशी फोनवर बोलणे झाल्याचे सुजय विखे यांनी स्पष्ट करतानाच, जे काही करशील ते सांभाळून कर असा वडील म्हणून त्यांनी मला सल्ला दिला. ते माझ्या प्रचाराला येणार नाहीत याचे दु:ख असल्याचेही सुजय विखे म्हणाले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाने त्यांना नगरमधून खासदारकीचे आश्वासनही दिले … Read more

प्रशांत गडाखांची लोकसभा निवडणुकीतून एक्झीट !

अहमदनगर :- ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत गडाख यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट  केली.  ‘लोकसभेची निवडणूक लढविण्याचा अनेकांनी आपल्याला आग्रह केला असला तरी आपण ही निवडणूक लढवणार नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. नगर लोकसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित असून, त्यांच्याविरोधात प्रशांत गडाख उमेदवारी करणार असल्याची जोरदार चर्चा होती.  … Read more

अहमदनगर मध्ये पुन्हा १९९१ ची पुनरावृत्ती होणार !

अहमदनगर :- नगर दक्षिण मतदारसंघात डॉ. सुजय विखे यांनी भाजपच्या माध्यमातून एन्ट्री केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.  त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर लोकसभा मतदारसंघात पूर्वीसारखीच संघर्षाची स्थिती असून १९९१ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होईल, असे भाकीत वर्तवले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी बुधवारी नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लक्ष्मीनारायण मंगल … Read more