सणासुदीच्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ गावावर शोककळा !

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:- अकोले तालुक्यातील विरगाव येथे सणासुदीच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे. शेततळ्याच्या कडेला असणार्‍या झाडाच्या सावलीला अभ्यास करण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय दहावीच्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर तिला वाचविण्यासाठी गेलेल्या तिच्या वडिलांना देखील मृत्युला सामोरे जावे लागले आहे. ही घटना सोमवार दि. 29 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास … Read more

राहते घर खाली करण्यासाठी लॅण्ड माफीयांची दहशत

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:- राहते घर खाली करण्यासाठी व बेकायदेशीररित्या जागेचा ताबा घेण्यासाठी जेसीबी व इतर साहित्य घरी आणून जीवे मारण्याची धमकी देणार्‍या लॅण्ड माफियावर कारवाई करावी. तसेच गुंडांना सोडून आमचे घर खाली करुन देण्यासाठी लॅण्ड माफियास तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनरीक्षक सहकार्य करीत असल्याचा आरोप दीपक ओमप्रकाश कुडिया यांनी करुन संबंधितांवर कारवाई … Read more

शौचालयात आढळला कोरोना रुग्णाचा मृतदेह !

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:- राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने आता रुग्णांलये अपूरी पडू लागली आहेत. त्यामुळे रुग्णालय प्रशासनावरही ताण येत आहे. औरंगाबादमध्ये जिल्हा रुग्णालयात एका कोरोना बाधित रुग्णाचा शौचालयात गुदमरून मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबदच्या जिल्हा रुग्णालयात एका कोरोना बाधित रुग्णाचा शौचालयात गुदमरून मृत्यू झाला आहे. … Read more

पुतणींच्या हिश्याची जागा बळकावून परस्पर विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-आई, वडिलांच्या निधनानंतर वडिलोपार्जीत चार पुतणींच्या हिश्याची जागा बळकावून परस्पर विक्री करणार्‍या चुलते व इतर नातेवाईक असलेल्या राजकोटवाला परिवारातील सहा सदस्यांवर जिल्हा न्यायालयाच्या आदेशान्वये कोतवाली पोलीस स्टेशनला रविवारी (दि.28 मार्च) गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अक्सा अन्वर राजकोटवाला (वय 22 वर्षे, रा. अहमदनगर) या मुलीच्या फिर्यादीवरुन हबीब इस्माईल राजकोटवाला, रेहान … Read more

कोरोना रुग्णाचे मृतदेह बील अभावी ताटकळत ठेवल्याप्रकरणी साईदीप हॉस्पिटलवर कारवाई करा

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-मृत झालेल्या कोरोना रुग्णाचे मृतदेह बील अभावी बारा तास ताटकळत ठेऊन त्याची अवहेलना करुन, नातेवाईकांना पैश्यासाठी मानसिक त्रास देत धमकाविल्याप्रकरणी शहरातील साईदीप हॉस्पिटलवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन चर्मकार विकास संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट घेऊन दिले. तसेच सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी … Read more

भाड्याने घेतलेली वाहने परस्पर गहाण ठेवून फसवणूक करणारा भामटा जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-टूर्स अँन्ड ट्रॅव्हल्स कंपनीकडून वाहने भाड्याने चालवण्यासाठी घेतले जात. ती वाहने परस्पर गहाण ठेवून फसवणूक करणाऱ्यास पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून २ कोटी ६९ लाख रुपयांच्या १६ आलिशान कार जप्त करण्याची ही महत्त्वपूर्ण कारवाई अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. दादा उर्फ शशिकांत मारुती सातपुते (वय 26 रा. भोयरे … Read more

विना मास्क फिरणाऱ्यांवर प्रशासनाची दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-जिल्ह्यात व लगतच्या जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक आदेशांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. मात्र तरीही जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी नुकतेच कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे झगडे फाटा चौफुलीवर पोलीस प्रशासन व चांदेकसारे ग्रामपंचायतीने विना … Read more

शेतातील झोपडी पेटविली; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-नेवासा तालुक्यात एका शेतातील झोपडीला कोणी अज्ञाताने आग लावल्याची घटना घडली आहे. दरम्यान याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी संगीता शरद गवांदे (वय वारातील शेतीमध्ये फेरफटका मारणेकरीता गेलो असता तेथे शेतात असलेली झोपडी पुर्णपणे जळुन राख झालेली होती. सदर … Read more

अवैध वाळू उपशावर पोलिसांची धडक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण शिवारातील गोदावरी नदी पात्रात पोकलेनच्या सहाय्याने काहीजण वाळू उपसा करत आहेत, अशी खात्रीशीर माहिती श्रीरामपूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी छापा टाकला. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून १ कोटी ८३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान ही धडाकेबाज कारवाई श्रीरामपूरचे … Read more

खेळाच्या वादातून आठ जणांकडून दोघांना बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:-कोपरगाव तालुक्यातील वारी येथील सोमैया कारखान्याच्या क्रिकेट मैदानावर रविवारी क्रिकेट खेळताना झालेल्या किरकोळ वादातून आठ जणांनी मिळून दोघा खेळाडूंना बेदम मारहाण केली. याप्रकरणी अतुल विनायकराव लोंढे यांच्या फिर्यादीवरून संजय सुभाष जाधव, अभिजित दीपक जाधव, मंजाहारी सुभाष जाधव, भूषण दीपक जाधव, नामदेव शिंदे (पूर्ण नाव माहीत नाही), संदीप सुरेश जाधव, विठ्ठल … Read more

निमगाव वाघात अमली पदार्थांची होळी

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- निमगाव वाघा (ता.नगर) येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने स्वच्छता अभियान राबवून, आमली पदार्थाची होळी करण्यात आली. तसेच युवकांना पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांनी बिरोबा मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविले. जमा झालेल्या झाडांच्या पाला-पाचोळ्याची होळी ग्रामपंचायत सदस्य तथा … Read more

सचिन वाझेच्या अडचणी वाढल्या ; मीठी नदीत सापडला पुराव्यांचा ‘खजिना’

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- मनसुख हिरेन हत्याप्रकरणात आता एनआयएच्या हाती नवीन पुरावे लागल्याने एकच खळबळ माजली आहे. मनसुख हत्या प्रकरणामध्ये आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझेला राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली. त्यानंतर या प्रकरणात सचिन वाझेचा थेट संबंध असल्याचे बरेचसे पुरावे तपास यंत्रणेच्या हाती लागले. मनसुख … Read more

सोने – चांदी पैशांपाठोपाठ आता जनावरांची होऊ लागली चोरी

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- जिल्ह्यात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. जिल्ह्यात काही दिवसांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये पैसे, सोने चांदीचा ऐवज लुटल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र आता चक्क शेतकर्‍याच्या गोठ्यात बांधलेल्या सुमारे एक लाख रुपये किमतींच्या दोन जर्सी गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरापासून जवळच असलेल्या नेप्ती गावच्या शिवारात … Read more

कुटुंबाला मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-राहूरी तालुक्यातील चिंचविहिरे शिवारात सचिन दत्तू शिंदे या तरुणास लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी राहूरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सचिन दत्तू शिंदे या तरुणाने राहूरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शिंदे याने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, दि २७ मार्च रोजी माझा चुलत भाऊ … Read more

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; मुद्देमाल केला जप्त

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील मातापूर शिवारात काही इसम जुगार खेळत असल्याबद्दल श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथील पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव यांना माहिती मिळाली. यावरून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी छापा घेतला. यावेळी मातापूर शिवारात बनकरवस्ती परिसरातील हाडोळ्याच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली काही इसम जुगार खेळत असल्याचे आढळून आले. … Read more

माहेरहून चार लाख आणण्यासाठी विवाहितेचा छळ; सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- विवाहितेचा चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेराहून चार लाख रुपये आणण्यासाठी सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे. दरम्यान हि घटना संगमनेर तालुक्यातील पठारभागातील पोखरी बाळेश्वर येथे घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पोखरी बाळेश्वर येथील अनिता धनंजय डोळस (वय 24) हिचे धनंजय दगडू डोळस (रा.मांजरवाडी, नारायणगाव, ता.जुन्नर, … Read more

दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- भरधाव वेगातील मोटरसायकल स्वराचे दुचाकीवरील ताबा सुटल्याने मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला जाऊन रस्त्यानी जाणार्‍या अशोक सिताराम मांडगे ( वय 47 रा. माळकुप तालुका पारनेर ) यांना धडक दिली. दरम्यान या अपघातात एकजण जखमी झाला आहे. ही घटना बस स्टँडवर ओवर ब्रिजमध्ये देहरे येथे घडली होती. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, … Read more

जुन्या वादातून तरुणास टोळक्याने मारहाण केली

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- मागील भांडणाच्या कारणातून विवाहित तरुणास टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील साकूर येथे घडली आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आप्पाजी बाबाजी देवकर (वय 25, रा.जांबुत बु. धनगर वाडा) यांचे पत्नीसोबत दोन महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. तेव्हापासून पत्नी माहेरी … Read more