घोडेगाव कांदा मार्केटमध्ये 18 हजार 376 कांदा गोण्यांची आवक

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये 18 हजार 376 कांदा गोण्याची आवक झाली आहे. उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त 3 हजार रुपयांपर्यंत तर नवीन कांद्याला 2700 रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. जाणून घ्या कांदा दर…. उन्हाळी कांद्यातील मोठ्या मालाला 2500 ते 2700 रुपये, मध्यम मोठ्या मालाला 2000 … Read more

शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महत्वाची बातमी

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा वाढता धोका लक्षात घेता साईभक्तांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी श्रींच्या दर्शनाकरता येताना ऑनलाईन दर्शनपास घेवुनच यावे, असे आवाहन संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी केले. राज्य शासनाच्या आदेशान्वये दि. 07 ऑक्टोबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे. … Read more

जिल्ह्यातील ‘या’ बँकेचे ठेवीदार महसूलमंत्र्यांना देणार बांगड्यांचा आहेर…

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांचे 2010 पासून 32 कोटी रुपये तसेच बनावट सोनेतारण 6 कोटी रुपये व शासनाच्या वर्ग-2 जमिनीवरती नऊ कोटी रुपये कर्ज देऊन मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे ठेवीदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. संपदा पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानदेव वाफारे हे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहे. महसूल मंत्री यांचा निकटवर्तीय … Read more

परदेशातून जिल्ह्यात आलेल्या 15 जणांचा अहवाल निगेटिव्ह तर 65 अहवालाची प्रतिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  जगात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरियंतने धुमाकूळ घातला आहे. यातच या नव्या व्हेरियंटचा भारतात शिरकाव देखील झाला आहे. तसेच यामुळे प्रशासन देखील अलर्ट झाले आहे. नुकतेच ऑमिक्रॉनच्या शोध मोहिमेत नगर जिल्ह्यात मंगळवार (दि.7) रोजी आणखी 55 व्यक्तींनी आंतरराष्ट्रीय प्रवास केल्याचे समोर आले आहे. यामुळे आता जिल्हा प्रशासन देखील … Read more

दिलासादायक ! जिल्ह्यातील तब्बल 41 हजाराहून अधिक विद्यार्थी कुपोषणातून बाहेर

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात15 ऑगस्ट ते 26 जानेवारीदरम्यान विशेष कुपोषण मुक्ती अभियान राबविण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 41 हजार 236 विद्यार्थी हे कुपोषणातून बाहेर आलेले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी धडक मोहिम राबविण्यात आली. यात कुपोषीत बालकांचा शोध घेणे, तसेच दुर्धर आजार व इतर आजार असणार्या बालकांवर मोफत शस्त्रक्रिया … Read more

अकोले नगरपंचायत निवडणुकीसाठी एकूण 138 उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात निवडणुकांचा धुराळा उडू लागला आहे. नुकतेच अकोले नगरपंचायत निवडणुकीसाठी एकूण 138 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी करण्याचे प्रयत्न बारगळल्यामुळे भाजप बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस हे पक्षही स्वबळावर निवडणुकीत उतरले आहेत. मनसेही सर्व जागा लढविण्याचा इरादा बोलून दाखविला आहे. न्यायालयाच्या निर्णया प्रमाणे ओबीसीं साठी राखीव … Read more

अहमदनगर ब्रेकींग: दोन गावठी कट्ट्यासह दोघांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- बेकायदेशीररित्या गावठी कट्टे व जिवंत काडतुसे घेऊन अहमदनगर शहरात फिरणाऱ्या दोन तरूणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. गणेश अरूण घोरपडे (वय ३५), राहुल श्रीरंग अडागळे (वय ३० दोघे रा. सिद्धार्थनगर, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. अहमदनगर शहरातील अहमदनगर काॅलेज जवळ मंगळवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. … Read more

अहमदनगर ब्रेकींग: अल्पवयीन मुलीस भूतबाधा झाल्याच्या नावाखाली कुटुंबाची फसवणूक, मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- अल्पवयीन मुलीच्या अंगातील भूत काढून देण्यासाठी होमा समोर कोंबडी कापून भूतबाधा काढण्यासाठीचा अंधश्रद्धेचा प्रकार घडला आहे. ही भूतबाधा काढण्यासाठी आठ हजार रुपये घेतले, तसेच आपली अंधश्रद्धेच्या नावाखाली लूट झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रादारांनी पैसे परत मागितले असता त्यांना मारहाण केली. अहमदनगर शहराच्या सावेडी उपनगरातील वैदूवाडीमध्ये १८ नोव्हेंबरच्या रात्री घडलेल्या या … Read more

श्रीरामपूरातील बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी वनरक्षकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  श्रीरामपूर येथे धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करताना जखमी झालेले वनरक्षक लक्ष्मण गणपत किनकर यांचे खासगी रुग्णालयात उपचार घेताना झाले निधन आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी श्रीरामपूर शहरात भर लोकवस्तीत बिबट्याने धुमाकून घातला होता. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले होते. बिबट्याला पकडण्यासाठी जिल्ह्यातील वनविभागाचे तसेच स्थानिक प्रशासनाच्यावतीने अथक मेहनत … Read more

हॉस्पिटलचे मेडिकल फोडून २१ लाखांची रक्कम लंपास

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-   श्रीरामपूर शहरातील मोरगे हॉस्पिटलचे मेडिकल फोडून अज्ञात दोघा चोरट्यांनी सुमारे २१ लाखाची रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. श्रीरामपूर डॉ. मोरगे हॉस्पिटलच्या ग्राऊंड फ्लोअरवर मेडिकलचे दुकान आहे. मध्यरात्री ३ च्या सुमारास तोंड बांधलेले अज्ञात दोन चोरटे मोटारसायकलवर या ठिकाणी आले. भिंतीवरुन उडी टाकून दोघांनी आत प्रवेश केला. बाहेरच … Read more

लिंबाचे झाड तोडू नको म्हणल्याच्या राग आल्याने ब्राह्मणगाव येथे वयोवृद्धास मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-   बांधावरील लिंबाचे झाड तोडू नको. असे म्हणाल्याचा राग आल्याने तिघां जणांनी मिळून एका वयोवृद्ध इसमाला लोखंडी पाईप, काठी व दगडाने मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील ब्राम्हणगाव भांड येथे घडली असून याबाबत मंगळवार 7 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भानुदास बबन माळी वय ६० वर्षे, धंदा शेती … Read more

ऊसाच्या शेताला आग लागून नुकसान, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-   शेतातील पाचरट पेटवून दिले. ती आग पसरत जाऊन पुंजाहरी मुंगसे यांच्या उसाच्या शेताला लागली. यावेळी मुंगसे यांचा दिड एकर ऊस जळून खाक झालाय. त्यामुळे त्यांचे लाखों रूपयांचे नूकसान झाले आहे. ही घटना ६ डिसेंबर रोजी घडली. याबाबत राहुरी पोलिसांत धोंडीराम बोंबले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राहुरी … Read more

खाजगी सावकारीला पोलिसांनी लगाम न घातल्यास शिवसेना धडा शिकविणार

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- कमी श्रमात जास्त नफा मिळवून देणारा सावकारी धंदा असुन कोपरगाव तालुक्यात खाजगी सावकारी सुरु आहे.या खाजगी अवैद्य सावकारीतुन अव्याच्या सव्वा दराने व्याज वसुल केले जात आहे. या सावकारशाहीच्या राक्षसी प्रथेवर कायदा असुनही तो कागदावरच दिसत आहे.ग्रामीण शहरी भागातील मजुर गोरगरीब त्याच बरोबर शेतकरी यांना प्रंचड व्याजाने कर्ज देवुन नंतर … Read more

धूमस्टाईलने चोरी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  कोपरगाव शहरातील डॉ. डी. एस. मेहता विद्यालय परिसरातून शिक्षिकेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी सप्टेंबर महिन्यात लांबविले होते. तसेच ऑक्टोबर महिन्यातही एका विवाहितेची पोत लांबविली होती. या दोन्ही दाखल घटनांचा तपास शहर पोलीस करत असताना यातील आरोपींना ताब्यात घेऊन १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन तक्रारदारांना सुपूर्द केला … Read more

१७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  आई वडीलांच्या कायदेशीर रखवालीतून त्यांच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील एका गावात घडली असून याबाबत सोमवार 6 डिसेंबर रोजी एकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुरी तालूक्यातील एका गावात सदर मुलीचे वडील आपल्या कुटूंबासह राहत आहे. ते मोल मजूरी करून आपल्या … Read more

तिसगाव ग्रामपंचायत मालकीच्या अनेक मोकळ्या जागांवर अतिक्रमण … जागा बळकावण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- पाथर्डी तालुक्यातील तिसगाव ग्रामपंचायत मालकीच्या अनेक मोकळ्या जागांवर अतिक्रमण करून त्या अगदी पद्धतशीर बळकावण्याचा प्रयत्न गावातील तसेच बाहेर गावातील लोकांकडून सुरू आहे. एका ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर विद्यमान ग्रामपंचायत सदस्याने अनधिकृतपणे अतिक्रमण केल्याने त्याची चौकशी होऊन अतिक्रमण करणाऱ्या सदस्याचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते दिलीप … Read more

मोठी बातमी ! राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे अडकले ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- राज्यातील अनेक दिग्गज मंत्र्यांना जर जर करून सोडणाऱ्या ईडीची कारवाई म्हणजे नेतेमंडळींना घाम फोडतो. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील अनेक नेत्यांवर ईडीने कारवाई केली आहे. यातच नगर जिल्ह्यातून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आता ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या मागे ईडीच्या … Read more

तहसील कार्यालयासमोर दोन गट भिडले; एकमेकांच्या डोळ्यात फेकली मिरची

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आज दोन गटांमध्ये झालेल्या वादातून तुफान दगडफेक झाली. यामध्ये दोन ते तीन जणांच्या डोक्याला मार लागुन ते जखमी झाले आहेत. या भांडणामध्ये एकमेकांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकण्यात आली. तहसील कार्यालयासारख्या एवढ्या गजबजलेल्या परिसरात अचानक झालेल्या या तुफान दगडफेकीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून लोकांमध्ये घबराट … Read more