अखेर शिर्डी विश्वस्त मंडळाला साईबाबा संस्थानचा कारभार पाहण्यास परवानगी

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :-  शिर्डी साई मंदिर प्रशासनांबाबत एक महत्वाची महत्वाची माहिती समोर आली आहे. श्री साईबाबा देवस्थान शिर्डीच्या नुतन अध्यक्ष व विश्वस्त मंडळास अखेर उच्च न्यायालयाने कारभार पाहण्यास परवानगी दिली आहे. श्री साईबाबा देवस्थान शिर्डीच्या नुतन अध्यक्ष व विश्वस्त मंडळास कारभार पाहण्यास काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्याबाबत नूतन … Read more

१९ गावांतील शेतकऱ्यांचे उपोषण सुरू

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  सुरत, नाशिक, अहमदनगर ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गात राहुरी तालुक्यातील १९ गावांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होत आहेत. या बाबत कुठल्याही शेतकऱ्यांना विश्वासात न घेता या जमिनी संपादित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने  घेतला आहे. या शेतकरी विरोधी धोरणा विरोधात राहुरी तालुक्यातील १९ गावातील शेतकऱ्यांनी आज दिनांक ३० नोव्हेंबर रोजी राहुरी तहसील … Read more

लाईट मिटर काढण्याच्या कारणावरून तरुणास दगडाने मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  लाईट मिटर काढण्याच्या कारणावरून संदिप चव्हाण या तरूणाला लाथा बूक्क्यांनी व दगडाने मारहाण करून, मोटारसायकलची तोडफोड करण्यात आली. ही घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील हॉटेल मानसी येथे घडली असून याबाबत 30 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप रायभान चव्हाण( वय २८ वर्षे ,राहणार देवळाली प्रवरा … Read more

साईबाबा संस्थानच्या नूतन अध्यक्ष व विश्वस्त मंडळास कारभार पाहण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-   श्री साईबाबा देवस्थान शिर्डीच्या नुतन अध्यक्ष व विश्वस्त मंडळास उच्च न्यायालयाने कारभार पाहण्यास मनाई केली होती. त्याबाबत नूतन अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. त्याबाबत मंगळवार (दि.३०) रोजी सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने आ.आशुतोष काळे यांनी केलेली याचिका ग्राह्य धरून उच्च … Read more

प्रशांत गडाख यांच्या प्रकृती स्वास्थासाठी मंदिरात महाभिषेक

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  बेलपिंपळगाव येथे श्री रोकडोबा हनुमान मंदिरात मंत्री शंकरराव गडाख मित्र मंडळ व यशवंत सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष प्रशांत गडाख मित्र मंडळ यांच्या वतीने प्रशांत गडाख यांच्या प्रकृती स्वास्थासाठी सामुदायिक महाभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते. गोरगरिबांच्या सुखदुःख मध्ये धावणारे, शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारे, तरुणांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन व सामाजिक कार्याची आवड … Read more

जनता यापुढे काळे, कोल्हे सोडून कोणाला मतदान करणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  यांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीमुळे जनता यापुढे काळे, कोल्हे सोडून कोणाला मतदान करणार नाही, यांनी अनेक लोकांचे पुढे येण्याचे स्वप्न उद्ध्वस्त करून टाकले, अशी टीका संजय काळे यांनी नाव न घेता वहाडणे यांच्यावर केली. कोपरगाव बसस्थानक रस्त्याच्या च्या बाजूने दुमजली गाळे बांधावे, अशी मागणी नगराध्यक्ष वहाडणे यांनी केल्याच्या संदर्भ … Read more

युवकांनी कुस्ती क्षेत्राकडेवळावे : आमदार जगताप

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  कुस्ती क्षेत्रांमध्ये आजच्या युवकांना करिअर करण्याच्या सुविधा उपलब्ध आहे यासाठी ध्येय,चिकाटी व मेहनत करून आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून कुस्ती क्षेत्रात आपला नाव लौकिक वाढवावा कुस्ती क्षेत्रामध्ये करिअर केल्यास सरकारच्या माध्यमातून विविध नोकऱ्यांमध्ये संधी दिली जाते ऋषिकेश लांडे यांनी उत्तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये आपल्या खेळाचे प्रदर्शन करून कुस्ती … Read more

बदलत्या हवामानामुळे शेती उत्पादनात वाढ करण्याचे मोठे आव्हान

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  बदलत्या हवामानात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन शेतीच्या उत्पादनात वाढ करणे हे सर्वात मोठे आव्हान आज शेतकऱ्यांसमोर आहे. अशा आव्हानाचा सामना करण्यासाठी शाश्वत तंत्रज्ञान हा एक उपाय ठरू शकतो. त्यासाठी शाश्वत तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन विभागाचे संचालक कैलास मोते यांनी केले. राहुरी … Read more

नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांना ह्या गोष्टीचा वाटतो विशेष अभिमान !

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  केंद्र आणि राज्य आर्थिक संकटात असताना शहराच्या विकासाचा गाडा आपण येथपर्यंत आणला. वडील खासदार गोविंदराव आदिक यांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिने प्रामाणिक करण्याचे प्रयत्न करत आहे. अनेक छोटी-मोठी विकासाची कामे करून शहराला नावारूपास आणण्याचे काम आपल्या हातून झाले आहे. सर्वांच्या विश्वासास पात्र ठरेल, असे भरीव काम केल्याचा … Read more

आजपासून नगर शहरातील विकासकामे बंद !

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  दहा वर्षांपासून थकीत देयके देण्यास टाळाटाळ केल्यामुळे ठेकेदार संघटनेने मंगळवारपासून (३० नोव्हेंबर) कामबंद आंदोलन पुकारले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत मनपा हद्दीत सुरू असलेली विकासकामे बंद ठेवण्याचा निर्णय ठेकेदारांनी घेतल्यामुळे शहरातील विकासकामे ठप्प होणार आहेत. ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष आनंद पुंड, गणेश साळुंके, शहाबाज शेख, नाजीर शेख, जहीर शेख, अंबादास … Read more

भारत – बांगलादेश सद्‌भावना सायकल यात्रेचे समन्वयक विशाल अहिरे यांचा भीषण अपघातात मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  बांगलादेश सद्‌भावना सायकल यात्रेचे समन्वयक विशाल अहिरे यांचे रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. त्यांचे तीन सहकारी जखमी झाले आहेत. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दि २ ऑक्‍टोबर रोजी भुईकोट किल्ला मैदानातून राष्ट्रध्वजला सलामी देत सद्भावना यात्रेत गेले होते. अहमदनगर ते नाैखाली (बांगलादेश) सदभावना सायकल यात्रेचा शुभारंभ … Read more

अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या एकास अटक

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- बेलापूर येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत लैंगिक शोषण केले. याप्रकरणी एका जणांविरुद्ध श्रीरामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला करून आरोपीस अटक करण्यात आली. बेलापूर ऐनतपूर येथील एका अल्पवयीन मुलीस असलम मंजूर शेख याने आठ दिवसांपूर्वी फूस लावून पळवून नेले होते. त्या बाबत बेलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला … Read more

Ahmednagar Corona Update Today : 30-11-2021जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यात आज ८३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४९ हजार ६४९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.८५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने घेतला गळफास

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- माहेरी गेलेली पत्नी नांदायला येत नसल्याने, तसेच आई-वडिलांना खर्चासाठी ३० हजार रुपयांची मागणी करत असल्याने पतीने आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी रात्री सात ते रविवारी सकाळी ७ वाजेच्या कालावधीत नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा येथे घडला. गोपीचंद रोहिदास भोसले (३०, रा. पिंपळगाव कौडा, ता. नगर) असे गळफास घेतलेल्या पतीचे … Read more

nagar urban bank election 2021 result : सत्तेची चावी पुन्हा सहकार मंडळाकडे !

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून सहकार पॅनेलच्या सर्वसाधारण मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी विजयी मिळवला आहे . माजी खासदार स्व.दिलीप गांधी प्रणित सहकार मंडळाच्या दहा उमेदवारांनी १५ हजाराच्या पुढे मत घेत विजय मिळविला या विजयामुळे स्वर्गीय माजी खासदार दिलीप गांधी त्यांच्यावरचा विश्वास पुन्हा मतदारांनी दाखवला असल्याचं या … Read more

…म्हणून या तालुक्यात शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयासमोर दिला ठिय्या

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  सक्तीची वीज बिल वसुली थांबविण्यात यावी. खंडित करण्यात वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत सुरू करावा. या मागणीसाठी ढोकेश्वर अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांतील शेतकऱ्यांनी टाकळी ढोकेश्वर येथील महावितरणच्या कार्यालयावर तब्बल सहा तास ठिय्या दिला. यावेळी परिसरातील विविध गावचे चारशे ते पाचशे शेतकरी उपस्थित होते . सकाळी ११ वाजता सुरू झालेले … Read more

शेवगाव तहसील गेट समोरच युवकाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  शेवगाव येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला, कापसाचा व्यापार करणाऱ्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. भाऊसाहेब घनवट असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नावं आहे. मात्र त्याने आत्महत्या का केली याचा कारण अद्याप स्पष्ट नाही. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. सदर युवक … Read more

ओमिक्रॉन(Omicron’)किती धोकादायक आहे? याबाबत WHO ने इशारा दिला आहे.

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- ओमिक्रॉन हा कोरोना विषाणूचा नवीन प्रकार जगभरात झपाट्याने पसरत आहे. हा नवीन प्रकार डेल्टा किंवा कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याचे सांगितले जाते. WHO ने या नवीन स्ट्रेनबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मात्र, या प्रकाराबाबत अद्याप कोणताही ठोस दावा करता येणार नसल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. कोरोना विषाणूचा नवीन … Read more