पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळाले मास्क, विदूषकाची टोपी फुगे अन खाऊ…

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- नव्याने प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना मास्क, मुखवटा, विदूषकाची टोपी, फुगे, खाऊ आणि छान छान गोष्टीचे पुस्तक देऊन त्यांचे गोपाळवाडी (ता. राहुरी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतर्फे स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी मिळालेल्या या भेटी मुळे मुलांना आनंद झाला. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची सुरवात मंगळवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित तरी मोठ्या उत्साहात … Read more

अहमदनगर जिल्ह्यात गृहप्रवेशाने झाली तब्बल १२ हजारांहून अधिक नागरिकांची स्वप्नपूर्ती

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :-  स्वत:च घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. याच स्वप्नांना राज्य शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाने महाआवास अभियान-ग्रामीणच्या माध्यमातून बळ दिले. दिनांक २० नोव्हेंबर, २०२० ते दिनांक ०५ जून, २०२१ या कालावधीत राबविलेल्या गेलेल्या या अभियानांतर्गत जिल्ह्यातील तब्बल १२ हजार ५५६ नागरिकांचे गृहस्वप्न पूर्ण झाले. राज्यपातळीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, … Read more

अवैध वाळू उपसा विरोधात खांडगाव ग्रामस्थ उतरले नदीपात्रात

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- संगमनेर तालुक्यातील खांडगाव ग्रामस्थांनी अवैध वाळू उपसा विरोधात आक्रमक पवित्रा घेत मंगळवारी प्रवरा नदीपात्रात ठिय्या देत आंदोलन केले. दोन दिवसात वाळूतस्करांवर कारवाई न झाल्यास रास्तारोको आंदोलन करू, असा इशारा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना निवेदनाद्वारे दिला. प्रवरा नदीपात्रातून राजरोस अवैध वाळूउपसा होत असल्याने नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत. … Read more

घरातून घेऊन जाऊन मारहाण झालेल्या ‘त्या’ व्यक्तीचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :-  नगर शहरातील रामवाडी येथे बुधवारी सकाळी झालेल्या मारहाणीत रामवाडी येथे ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कचरू दत्तू कांबळे वय ४५ रा. रामवाडी नगर असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, दोघांनी कांबळे यांना त्यांच्या घरी येऊन सोबत नेले. त्यांना मारहाण करून सायंकाळी घरी … Read more

या तालुक्यात सुरु असलेल्या अवैध दारू विक्री अड्यावर पोलिसांचा छापा

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. यातच याला रोख बसावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. यातच राहुरी तालुक्यात पोलिसांनी अवैध धंदे चालकांवर कारवायांचे सत्र सुरु केले आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी शिवारात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवैध दारू विक्री अड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी २५०० रूपयांचा … Read more

शहरातील उड्डाणपुलाच्या कामामुळे झाला आहे वाहतूक मार्गात बदल

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- सध्या नगर शहरातील उड्डाण पुलाचे वेगाने सुरु असलेले काम नगरकरांना दिलासा देते आहे. शहरातील सक्कर चौक ते जीपीओ चौक दरम्यान उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान हे काम दोन टप्प्यांत पूर्ण होणार असल्याने त्या कालावधीत वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. … Read more

‘ती’ संशयित गाडी दिसली आणि तरुणांसह पोलिसांनी पाठलाग करून चोरट्यांना पकडले

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :-  जिल्ह्यात गुन्हेगारी चांगलीच फोफावत आहे. यातच जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात देखील चोऱ्यांचे सत्र वाढल्याने नागरिक जागरूक होऊ लागले आहे. नुकतेच सोनई बसस्थानक परिसरात चार संशयित आढळून आले. परिसरातील तरुणानं त्यांची शंका आली, आपले पितळ उघडे पडणार या भीतीने ते गाडी घेऊन पळू लागले. मात्र ग्रामसुरक्षा दलाचे युवक व पोलिसांनी … Read more

सलग तिसर्‍या दिवशी सोन्यामध्ये घसरण; जाणून घ्या आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :-  गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ दिसून आली होती, मात्र आज दरामध्ये काहीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मंगळवारी 22 कॅरेट सोन्याचे भाव 47,760 रुपयांवरून घसरून 47,730 रुपये प्रति ग्रॅम झाले. त्याचबरोबर आज चांदीचा भाव 71,900 रुपये प्रतिकिलो होता. दरम्यान देशातील कोरोनाची परिस्थिती आता हळूहळू सुधारू लागल्याने गुंतवणूकदारांनी … Read more

कोरोनाचा संभाव्य धोका पाहता ‘या’ दोन गावात जनता कर्फ्यू

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यातच आता काहीशी दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत आली असल्याने अनलॉक करण्यात आला आहे. मात्र संभाव्य कोरोनाचा धोका पाहता पारनेरमध्ये प्रशासनाने बुधवार व शनिवार दोन दिवस जनता कर्फ्युऐवजी फक्त शनिवारी पारनेर तालुका व बुधवारी सुपा येथील सर्व … Read more

पोलवर काम करत असताना कर्मचाऱ्यांना बसला विजेचा शॉक

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होत आहे. यातच सोसाट्याचा वारा – पाऊस आदींमुळे विजेचा खोळंबा होत असतो. यादरम्यान सावधानतेने काम करावे असे आवाहन देखील महावितरणकडून करण्यात येत असते. मात्र असेच विजेच्या पोलवर काम करत असताना एका खासगी कर्मचाऱ्याला शॉक बसल्याची घटना बेलापूर मध्ये घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, … Read more

प्रलंबित मागण्यासाठी आशा सेविकांचे कामबंद आंदोलन सुरु

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :-  करोना काळामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तक यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. कर्जत तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. आशा स्वयंसेविका यांना मानधन ऐवजी कायमस्वरुपी नेमणूक करावी. कोविड काळामध्ये व लसीकरण … Read more

आज ३५३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४३७ बाधितांची रुग्ण संख्येत भर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८१ टक्के

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :-  अहमदनगर: जिल्ह्यात आज ३५३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६४ हजार ७१३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४३७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

कोरोना काळात रुग्णांची सेवा करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोरोना काळात रुग्णांची सेवा करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितीन भुतारे, परेश पुरोहित, गजेंद्र राशिनकर, अनिता दिघे, गणेश शिंदे, संतोष साळवे, पोपट पात्रे, दीपक दांगट, गणेश … Read more

वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जिल्हा परिषदेमध्ये ढोल बजाव आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- शासकीय योजनेअंतर्गत 10 लाख रकमेचे पागोरी पिंपळगाव ते सोमठाणे रस्ता डांबरी दुरुस्ती करणे असे काम मंजूर होते सदरचे काम जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग पाथर्डी जिल्हा अहमदनगर यांच्या अंतर्गत करण्यात येत होते व त्यासाठी कामाचा ठेका देण्यात आलेला होता परंतु सदरचे डांबरी रस्ता दुरुस्तीचे काम न करता प्रभारी … Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये शिवसैनिक युवकांचा पक्ष प्रवेश

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणात शिवसैनिक युवकांनी पक्षप्रवेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आला जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या मार्गदर्शनाखाली तर विद्यार्थी सेनेचे परेश पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करताना राकेश जाधव, अनमोल रामनानी, ऋषिकेश खांडरे, गणेश भिंगारदिवे, आदर्श तिवारी, आशुतोष शिंदे, सार्थक साळुंखे, पुष्पक … Read more

केडगाव येथील त्या हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- केडगाव येथे बनावट प्रमाणपत्राच्या आधारे हॉस्पिटल चालवून रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी व रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार केल्याप्रकरणी संबंधित डॉक्टर व सदर हॉस्पिटल चालकांना पाठिशी घालणार्‍या तत्कालीन महापालिका आरोग्य अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे स्मरणपत्र सामाजिक कार्यकर्ते संदिप भांबरकर यांनी पोलीस अधिक्षक व महापालिका आयुक्तांना दिले. केडगाव या ठिकाणी … Read more

अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ! शहरातील ह्या मुख्य वाहतुक मार्गात होतोय बदल…

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- शहरातील सक्कर चौक ते जीपीओ चौक या दरम्यान उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असुन त्या अनुषंगाने अहमदनगर महानगरपालिकेकडुन कोठी चौक या ठिकाणी पाण्याचे पाईपलाईनचे काम करावयाचे प्रस्तावित झालेले आहे. सदर काम दोन टप्यांमध्ये पुर्ण करण्यात येणार असल्याने त्या कालावधीत वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील … Read more

नागरिकांच्या मतांवर डोळा ठेऊन राजकीय पुढारींचे लसीकरण मोहिमेत स्वारस्य

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- कोरोना काळात कायद्याचे राज्य जाऊन साम, दाम व दंडाचे राज्य असतित्वात आले असून, कायद्यासह उन्नतचेतनेचे राज्य निर्माण होण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नागरिकांना उन्नतचेतनेचा आग्रह धरण्यात येणार … Read more