एकाच सरणावर तिघा बाप-लेकांवर अंत्यसंस्कार

३ जानेवारी २०२५ डोणगाव (बुलढाणा) : जालना जिल्ह्यातील महाकाळा फाट्याजवळ उभ्या ट्रकवर कार आदळून शेलगाव देशमुख येथील भागवत चौरे यांच्यासह मुलगा व मुलगी तसेच नात्यातील कुटे परिवारातील त्यांची मामी अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने अख्ख्या जिल्हा हळहळला असून, शेलगाववासीय शोकाकूल झाले आहेत. १ जानेवारीच्या रात्री बाराच्या सुमारास वडील भागवत यांच्यासह मुलगी सृष्टी आणि … Read more

जलद दर्शनाच्या नावाखाली त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची लूट !

३ जानेवारी २०२५ नाशिक : नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी राज्यातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातही दर्शनासाठी परराज्यातील भाविकांनी अलोट गर्दी केली असून जलद दर्शनाच्या नावाखाली त्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी … Read more

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला वर्षभरात ४७.२७ कोटींचे उत्पन्न ! भाविकांच्या संख्येतही झाली वाढ, देणगी दर्शनातून सर्वाधिक १६ कोटी ९६ लाखांचे उत्पन्न

३ जानेवारी २०२५ तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मागील वर्षभरात मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे.मंदिर संस्थानच्या तिजोरीत विविध माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मागील एक वर्षात एकूण ४७ कोटी २७ लाख ३२,२०६ रुपयांचे दान जमा झाले आहे. श्री तुळजाभवानी भक्तांच्या एकूण संख्येपैकी सर्वाधिक गर्दी ही श्रवण मास ते दीपावली या … Read more

आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी !

३ जानेवारी २०२५ मुंबई : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्यातील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी,अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरूवारी केली. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुंडे यांनी बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाबाबत आपली भूमिका मांडली. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन … Read more

सीआयडीकडून तीन फरार आरोपींचा शोध सुरू

३ जानेवारी २०२५ बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींचा घटनेच्या तीन आठवड्यांनंतरही पोलिसांना व नंतर सीआयडी पथकाला शोध लागलेला नाही.खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडची सीआयडी कोठडीत रवानगी करण्यात आल्यानंतर दोन दिवसांपासून अधिकारी त्याची चौकशी करत आहेत. असे असतानाच मस्साजोग येथे बुधवारी ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन करत फरार आरोपी तत्काळ पकडण्याची मागणी केली. … Read more

पांडूतात्यांच्या आयुष्याला मिळाला यू टर्न ; रुग्णवाहिकेच्या धक्क्यामुळे मृत पांडूतात्या पुन्हा जिवंत

३ जानेवारी २०२५ कसबा बावडा : पांडूतात्या… उलपे मळ्यातील शेतात दिवसभर राबून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे… रात्री चार घास सुखाचे खाऊन येथील ज्ञानेश्वर मंदिरात भजनात दंग होणारे एक सर्वसामान्य वारकरी व्यक्तिमत्त्व. पंधरा दिवसांपूर्वी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक पांडूतात्यांना दरदरून घाम सुटला आणि पांडूतात्या दारात असलेल्या खाटेवर निपचित पडले. अडाणी बायको अस्वस्थ झाली. तिने आरडाओरड सुरू … Read more

अबब… माळेगाव यात्रेत एक कोटीचा घोडा ! ३ लाखांची देवणी गाय, ६० हजारांचा श्वान, ९ हजारांचा कोंबडा ठरतोय आकर्षण

३ जानेवारी २०२५ नांदेड : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र माळेगाव (ता. लोहा, जि. नांदेड) येथील खंडेरायाच्या यात्रेत पशू प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनात विविध पशुंमध्ये घोडे, गाढव, उंट, कोंबडे तसेच विविध जातींचे श्वान पाहावयास मिळाले. विविध श्वानाच्या जातींमध्ये राँट, ब्रिलर, लाँबराडॉग आदी जातींनी हजेरी लावली. यात्रेत एक कोटीचा घोडा दाखल झाला आहे. … Read more

लाडक्या बहिणींना टेन्शन ! तक्रारींनुसार फेरतपासणी ; प्राप्तिकर खात्याची मदत

३ जानेवारी २०२५ मुंबई : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील काही अर्जाची फेरछाननी होणार असल्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी दिली. ज्या लाभार्थी महिलांचे उत्पन्न अडीच लाखांच्या वर आहे, ज्यांच्याकडे कार, नोकरी आहे अशा महिलांना आता या योजनेतून वगळले जाण्याची शक्यता आहे. याचा फटका राज्यातील अनेक महिलांना बसू शकतो. यामुळे लाडक्या बहिणींचे … Read more

आता आमदार मिलिंद नार्वेकर यांचा नंबर ! लवकरच ठाकरे गट सोडणार ?

२ जानेवारी २०२५ मुंबई: शिवसेना पक्षात फूट पाडून मूळ शिवसेनेवर दावा केला. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेला सुरंग काही थांबता थांबत नसून रोज नवनवी नावे समोर येत आहेत. विधानसभा निवडणुकीत पक्षाला अपयश आले.त्यानंतर पक्षातील मरगळ झटकून टाकण्यासाठी खांदेपालट करण्याच्या हालचाली ‘मातोश्री’तून सुरू झाल्या आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नार्वेकर यांच्या भूमिकेबाबत काय निर्णय येणार, … Read more

तिसरी मुंबई आता लवकरच ! मुंबईचा कायापालट… मेट्रोसह २०२५ मध्ये काय होणार ?

१ जानेवारी २०२५ मुंबई: बुधवारपासून सुरू झालेल्या नवीन वर्षात अनेक क्षेत्रात बदल होणार असतानाच पायाभूत सुविधांच्या विकासाची गाडीसुद्धा या नव्या वर्षात सुसाट सुटणार आहे.यातील सर्वात मोठा व महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून उल्लेख होणाऱ्या तिसऱ्या मुंबईच्या प्रकल्पालाही या वर्षात गती येणार असून प्रत्यक्ष जमिनी अधिग्रहणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यातच मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने सत्रू केलेली अनेक … Read more

महाराष्ट्र हवामान : पुन्हा एकदा थंडीला सुरुवात ! पहा काय आहे तुमच्या जिल्ह्यातील तापमान…

१ जानेवारी २०२५ पुणे : राज्यात पुन्हा एकदा थंडीला सुरुवात होत आहे.आकाश निरभ्र झाल्यामुळे विविध भागांत किमान तापमानात घट होत आहे. मंगळवारी राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया येथे १३.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दरम्यान, पुढील सहा दिवस राज्यात हवामान कोरडे राहणार असून, किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा … Read more

‘टग्या-टिगीच्या करामती’चे १ जानेवारीला प्रकाशन

अहिल्यानगर : लेखक सचिन मोहन चोभे यांचा पहिला बालकथासंग्रह ‘टग्या-टिगीच्या करामती’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी (दि. १ जानेवारी २०२५) होत आहे. रुईखेल (ता. श्रीगोंदा) येथे सायंकाळी ६ वाजता पुस्तकाचे प्रकाशन होणार असल्याची माहिती कृषीरंग प्रकाशनचे संचालक विशाल विधाटे यांनी दिली. याबद्दल अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, जिथे शिक्षण झाले आणि वाचायला व समाजाकडे सकारात्मक … Read more

सुट्ट्या एन्जॉय करायच्या आहेत? पुण्यातील ‘या’ नयनरम्य ठिकाणांना एकदा आवर्जून भेट द्या, भान हरपून जाल ही गॅरंटी

Pune Picnic Destination : सध्या विंटर हॉलिडेची धूम आहे. विंटर हॉलिडे सेलिब्रेट करण्यासाठी अनेक जण आपल्या कुटुंबासमवेत तसेच मित्रांसमवेत विविध पर्यटन स्थळांवर गर्दी करताना दिसत आहेत. तसेच वन डे पिकनिकसाठीही अनेकजण बाहेर जात आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्हीही सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी कुठे बाहेर फिरायला जाण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा लेख कामाचा राहणार आहे. कारण … Read more

महागाईने त्रस्त नागरिकांना आणखी एक धक्का बसणार! भारतात ‘या’ कारणांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात

Petrol And Diesel Price : गेल्या काही वर्षांपासून भारतातील सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त झाली आहे. देशातील इन्फ्लेशन रेट म्हणजेच महागाईचा दर हा विक्रमी पातळीवर पोहोचला असून याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागतोय. खाद्यतेल, डाळी, भाजीपाला, कांदा, एलपीजी गॅस सिलेंडर, सीएनजीच्या किमती गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या असून आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देखील वाढतील … Read more

भारताचा सर्वाधिक लांबीचा महामार्ग महाराष्ट्रातून ; देशातील 45 शहरे जोडणारां Expressway महाराष्ट्रातील या शहरांमधून जाणार !

India Longest Highway : मुंबई आणि नागपूर या दोन शहरांना जोडणारा समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा एक्सप्रेस वे. पण आता समृद्धी महामार्गापेक्षा मोठा महामार्ग आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहे. भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आपल्या महाराष्ट्रातून जाणार आहे. 1386 किलोमीटर लांबीचा मुंबई दिल्ली महामार्ग महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमधून जाणार असून यामुळे मुंबई ते दिल्ली हा प्रवास … Read more

चीनच्या चांगई-५ यानाने आणलेल्या नमुन्यांच्या अभ्यासानंतर, चंद्रावरील मातीत आढळला पाण्याचा अंश !

chandrayan

चंद्रावरून आणलेल्या मातीच्या नमुन्यांचा अभ्यास केला असता चिनी शास्त्रज्ञांना त्यामध्ये पाण्याचा अंश आढळला आहे. चंद्रावर बर्फाच्या स्वरुपात पाणी असल्याचे दावे यापूर्वीही करण्यात आले असून चीनच्या संशोधनामुळे या दाव्यांना दुजोरा मिळाला आहे. चीनने आपल्या चांगई-५ नामक चांद्रमोहिमेद्वारे पृथ्वीच्या या उपग्रहावर २३ नोव्हेंबर २०२० रोजी एक यान पाठवले होते. १ डिसेंबर रोजी हे यान चंद्रावर पोहोचले. या … Read more

दररोजचे तेच तेच जगणे सोडा आणि पावसाळ्यामध्ये पहा पुण्याजवळील ‘हे’ धबधबे; अनुभवा निसर्गाचे सौंदर्य आणि मिळावा मनाची शांतता !

nisarg

सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत असून या पडणाऱ्या पावसामुळे निसर्गाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसायला लागले असून निसर्गाने सगळीकडे हिरवी चादर पांघरल्याचे सध्या चित्र आहे व बऱ्याच ठिकाणी खळाळून वाहणारे नदी नाले आणि दाट धुक्यांमध्ये हरवलेली अवघी सृष्टी मनाला मोहून टाकणारी आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये अनेक व्यक्ती कुटुंब किंवा मित्रांसोबत वेगवेगळ्या निसर्गाने समृद्ध असलेल्या पर्यटन … Read more

मोबाईलच्या आहारी गेल्याने युवा पिढीचे भवितव्य धोक्यात, पालक चिंतेत !

mobile adiction

सध्या शहरी व ग्रामीण भागात एकीकडे मजूर मिळत नसतानाच दुसरीकडे अनेक तरुण कोणतेही काम न करता दिवसभर मोबाईलवर व्यस्त राहत असल्याचे चित्र दिसत असून, त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. युवा वर्ग दिवसभर मोबाईलमध्ये गुंतल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सुशिक्षित तरुणांना आपले गाव, कुटुंब, नातेवाईक सोडून नाईलाजाने नोकरीसाठी पुणे, मुंबई व इतर महानगरात जावे लागते, … Read more