सोने खरेदीची बदला पद्धत; गोल्ड ईटीएफद्वारे करा गुंतवणूक होतील ‘हे’ सारे फायदे

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  गोल्ड ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड) म्युच्यूअल फंडचा एक प्रकार आहे, जो सोन्यामध्ये गुंतवणूक करतो. या म्युच्यूअल फंड योजनेचे युनिट्स स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट केले जातात. तज्ज्ञांच्या मते गोल्ड ईटीएफमध्ये केलेली गुंतवणूक ही सोन्यामध्ये करण्यात येणाऱ्या गुंतवणुकींपैकी आधुनिक, कमी खर्चाची आणि सुरक्षित गुंतवणूक आहे. त्यामुळेच यामध्ये जुलै महिन्यात खूप मोठी गुंतवणूक करण्यात … Read more

जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणिसावर अज्ञात टोळक्यांकडून हल्ला

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व शेतकरी विकास मंडळाचे कार्यकर्ते श्रीकांत मापारी यांच्यावर संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारात प्रवरा परिसरातील काही अज्ञातांनी हल्ला केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस श्रीकांत मापारी हे संगमनेरहून लोणीकडे जात असताना मेंढवण परिसरात त्यांना एकटे पाहून प्रवरा परिसरातील 15 ते 20 गुंड प्रवृत्तीच्या … Read more

अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी देत त्याने खाकीला केली धक्काबुक्की

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- पोलीस ठाणे परिसरात दुचाकी लावू नकोस असे सांगितल्याचा राग आल्याने एका तरुणाने चक्क पोलीसास शिवीगाळ व धक्काबुकी केली. तसेच अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील पोलिसाला दिली. दरम्यान हि धक्कादायक घटना नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याप्रकरणी पोलीस नाईक राहुल बबन यादव यांनी फिर्याद दिली असून नेवासा पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध … Read more

जिल्ह्यातील या तालुक्यात सर्वाधिक रॅपिड अँटीजेन चाचण्यांची नोंद

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. तसेच जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट देखील सुधारतो आहे. यामुळे जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यातच जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या सुरुवातीला जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची वाढ होणाऱ्या तालुक्यांमध्ये अग्रेसर असलेल्या संगमनेर तालुक्यामधील अर्ध्याहून अधिक गावे आता कोरोनामुक्त … Read more

दोन तलवारीसह अंबर दिवा बाळगणारा जेरबंद

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- टाकळी खंडेश्वरी येथील घरात व गाडीत घातक शस्त्रासह अंबर दिवा बाळगणाऱ्या व्यक्तीस डीवायएसपी अण्णासाहेब जाधव यांनी जेरबंद करत मोठी कारवाई केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव रात्री गस्तीवर असताना त्यांना गुप्त बातमी दादा मार्फत माहिती मिळाली की टाकळी खंडेश्वरी येथील सपकाळ वस्ती येथे दत्तू मुरलीधर सकट हा विनापरवाना बेकायदा … Read more

‘या’ तीन तालुक्यातील पालिका निवडणुकीच्या कामाला आला वेग

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  मुदत संपुष्ठात आलेल्या जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींमधील सदस्या पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना, आरक्षण आणि सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. निवडणुकांचे बिगुल वाजले असल्याने नेतेमंडळींसह कार्यकर्ते देखील निवडणुकांच्या कामामध्ये व्यस्त झाले आहे. यातच जिल्ह्यातील शेवगाव आणि जामखेड पालिकांचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने शेेवगाव आणि … Read more

ख्रिसमसपूर्वी येऊ शकते कोरोना लस, परंतु …; व्हॅक्सीन टास्कफोर्स अध्यक्षांचे मोठे वक्तव्य

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- सध्या जग कोरोनाने हैराण झाले आहे. सर्वांचे लक्ष कोरोना लशीकडे लागलेले आहे. यासंदर्भात ब्रिटेनमधील कोरोना व्हायरस व्हॅक्सीन टास्कफोर्सचे अध्यक्ष केट बिंघम यांनी आशा व्यक्त केली की यावर्षी ख्रिसमसपर्यंत ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी विकसित केलेली कोरोना व्हायरस लस बाजारात येईल. ते म्हणाले की कोरोना विषाणूच्या अनेक लस ख्रिसमस किंवा 2021 … Read more

या तालुक्यात विषारी नागांचा वावर वाढला; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  सध्या जिल्ह्यात बिबट्याने दहशत घातली आहे.अनेकांवर बिबट्याने हल्ला चढवत त्यांना ठार केले. आधीच बिबट्याच्या दहशतीने धास्तावलेले गावकरी आता विषारी सर्प व नागांच्या वाढत्या वावरामुळे चिंताग्रस्त आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये मागील तीन ते चार महिन्यापासून बिबट्या पाठोपाठ विषारी नागासह इतर विषारी संर्प व हिस्र प्राण्याची संख्या वाढल्याने मोठी दहशत … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास न्यायालयाने ठोठावली हि शिक्षा

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना मध्ये वाढ होत आहे. तसेच यामुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. यातच जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी पीडित मुलीच्या नात्यातील आरोपीला न्यायालयाने आज शिक्षा सुनावली आहे. या बाबत माहिती अशी, सदर प्रकरणातील आरोपी याने आजोबाच्या घरी असणा-या अल्पवयीन मुलीस खोटा बनाव … Read more

डिझेल भेसळ प्रकरणात पोलिसांकडून एका आरोपीस अटक

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात वाढते अवैध धंदे हे वाढत असताना त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मात्र पोलिसांची हि कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात सापडत आहे. यामुळे काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाईला देखील सामोरे जावे लागले आहे. यातच जिल्ह्यातील डिझेल भेसळ प्रकरण चांगलेच गाजले होते.पोलिसांनी काल रात्री आणखी एका आरोपीला याप्रकरणात अटक केली आहे. … Read more

‘हे’ आहेत ताजे सोने-चांदीचे भाव; जाणून घ्या डिटेल्स

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये चढ-उतार सुरूच आहेत. गेल्या एका महिन्यापासून सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. दररोज सोने-चांदीचे दर बदलले जात आहेत. स्पॉट मार्केटमध्ये जोरदार मागणी असल्याने सट्टेबाजांनी नवीन डील खरेदी केल्यामुळे शुक्रवारी वायदा बाजारात सोन्याचे भाव 268 रुपयांनी वाढून 50,550 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. शुक्रवारी चांदीचा भाव 211 रुपयांनी वाढून 60,383 … Read more

महावितरणचा विजेचा शेतकऱ्याला शॉक; साडेतीन एकर ऊस झाला खाक

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. यामध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यातच आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या एका शेतकऱ्याचा साडेतीन एकर ऊस महावितरणच्या चुकीमुळे जळून खाक झाला आहे. उसाच्या क्षेत्रावरून गेलेल्या वीजवाहक तारांमधील घर्षणामुळे ठिणग्या पडून हा ऊस जळून खाक झाला आहे. संगमनेर तालुक्‍यातील … Read more

बिबट्या त्याच्यावर झेपावला आणि त्याचा आवाजच बंद झाल

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याकडून मानवी वस्तीवर हल्ले वाढू लागले आहे. यामुळे नागरी वस्तीमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे. यातच शिर्डीमध्ये बिबट्याने कुत्र्यावर हल्ला चढवत त्याचा फाडशा पाडला. दरम्यान हि धक्कादायक घटना काही मुलांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली. याबाबत शेतकरी मधुकर वाणी … Read more

अबब! ‘ह्या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई ; केला 1 कोटींचा दंड

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जियो पेमेंट्स बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. मॅनेजिंग डायरेक्टर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पुन्हा नियुक्तीचा अहवाल देण्यास विलंब झाल्याबद्दल दंड आकारण्यात आला आहे. आरबीआयने एका निवेदनात ही माहिती दिली आहे. नियमांचे पालन न करण्यासाठी मध्यवर्ती बँकेची कार्यवाही :- आरबीआयने निवेदनात म्हटले आहे … Read more

कांद्याच्या भावामध्ये झाली घसरण ; दिवाळीनंतर भाववाढीची शक्यता

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात कांद्याच्या दराने उच्चांकी गाठली होती. त्यातच केंद्राकडून देशात कांदा निर्यात बंदी लावण्यात आली होती. यामुळे कांद्याच्या भावांमध्ये चांगलाच चढउतार झालेला पाहायला मिळाला होता. दरम्यान रॉकेटच्या गतीने उच्चांकी गेलेल्या कांद्याच्या भावामध्ये घसरण सुरु झाली आहे. भाव अजून वाढण्याची चिन्हे असताना दसऱ्याला अचानक कांद्याचे भाव गडगडले. भाव वाढत … Read more

हीरोच्या ‘ह्या’ बाईकवर मिळतिये भरगच्चं सूट ; जाणून घ्या संपूर्ण ऑफर

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- हीरो मोटोकॉर्पने काही काळापूर्वी एक्सट्रीम 160 आर मोटरसायकल बाजारात आणली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सणासुदीच्या काळात अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी त्यावर भारी सवलत देत आहे. पेटीएमवरून पेमेंट केल्यास जास्त कॅशबॅक :- – हिरोतर्फे बाईकवर 2 हजार रुपये कॉर्पोरेट सवलत, 3 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, 2 हजार रुपयांचा … Read more

संगमनेरात माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधींना अभिवादन

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  भारताच्या माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय इंदिराजी गांधी यांना 36 व्या पुण्यतिथीनिमित्त स्व. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संगमनेर कार्यस्थळावरील शक्तिस्थळ बाग येथे काँग्रेसपक्षाच्या महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत उद्योग समूहाच्या कडून आज 31 ऑक्टोबर 2020 रोजी 10 वाजता पुष्पांजली वाहण्याचा व अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झालाय. … Read more

रिलायन्स जिओ फायबरमध्ये 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; जाणून घ्या कोण कोठे लावणार पैसे

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिटेल व्यवसायामध्ये अनेक कंपन्या गुंतवणूक करत आहेत. अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) ने घोषणा केली की, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (एडीआयए) आणि सौदी अरेबियाच्या सार्वजनिक गुंतवणूक निधीने (पीआयएफ) एकूण 51 टक्के अधिग्रहण करण्यासाठी 3,779 करोड़ रुपये (506 मिलियन डॉलर)च्या … Read more