तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- अन्याय झाला कि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ज्यांनी खाकी वर्दी आपल्या अंगी चढवली त्यांच्याकडूनच अत्याचार झाल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. चाळीसगाव तालुक्यातील मेहूनबार येथील तरुणीस लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी अत्याचार करण्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नेवासा येथील उपनिरीक्षकासह तीन जणांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

आरक्षणाच्या मुद्द्यावरून राधाकृष्ण विखे पाटलांचे सरकारवर टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यातच न्यायालयाने स्थगिती लावल्याने मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर चांगलीच टीका केली आहे. ‘राज्य सरकार हे मराठा आरक्षणासाठी भांडणार्‍या संघटनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतयं, हे दुर्देव आहे,’ … Read more

विहिरीतील ‘ती’ पिल्ले बिबट्याची नव्हे; गावकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सध्या बिबट्याने धहसाहत माजवली आहे. अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामुळे अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. यातच जामखेड तालुक्यात बिबट्याविषयी एक अफवा पसरली यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरलं होत. याबाबत माहिती अशी कि, जामखेड तालुक्यातील हळगाव येथील एका विहिरीत बिबट्याचे दोन पिल्ले असल्याची खबर गुरूवारी सायंकाळी सोशल … Read more

धुळ्याच्या पोलिसांकडून महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात धाड टाकत जुगाऱ्यांना केली अटक

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- शहरातील पोलिसांच्या नाकावर टिच्चून नाशिक पोलिसांनी काही दिवसांवपूर्वी संगमनेरमध्ये जुगार अड्ड्यावर धाड टाकली होती. याच गोष्टीची पुनरावृत्ती झाली आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांनी नगर जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यावर अविश्वास दाखवित थेट धुळ्याहून संगमनेरात पोहोचलेल्या त्यांच्या ‘विशेष’ पथकाने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तर तालुका पोलीस … Read more

देशात व्हॅक्सीन आल्याशिवाय शाळा, महाविद्यालय उघडू नये; शिक्षक संघटनेचे मुख्यमंत्र्याना पत्र

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- राज्यासह जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचे संक्रमण सुरूच आहे. यातच अनेक दिवसांपासून बंद असलेले शाळा कॉलेज कधी सुरु होणार याबाबत चर्चा सुरु होत्या. नुकतीच शिक्षणमंत्र्यांनी शाळा कधी सुरु होणार याबाबत माहिती जरी केली होती. मात्र आता एवढ्यातच शाळा सुरु करण्यास शिक्षक संघटटनेकडून विरोध केला जात आहे. कोरोनाची लस समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत … Read more

दीड लाखाहून अधिक जनावरांचे लाळ खुरकूत लसीकरण पूर्ण

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात लाळ खुरकूत रोग प्रतिबंध लसीकरण तसेच सर्व जनावरांचे टॅगिंग करून त्यांच्या ऑनलाईन नोंदी करण्यात येत आहेत. तालुक्यातील 171 गावांमध्ये एक लाख 67 हजार 900 जनावरांचे लाळ खुरकूत लसीकरण व बिल्ले मारण्याचे काम 31 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करावयाचे असून, अत्तपर्यंत संगमनेर तालुक्यात 64 टक्के काम पूर्ण झाले आहे. … Read more

अहमदनगर सोशल क्लब फाऊंडेशन च्यावतीने रग्णवाहिकेचे लोकार्पण

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- हजरत मोहम्मद पैगंबर यांनी मानवाच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले. त्याच सेवा भावनेतून आज त्यांच्या जन्मदिनानिमित्ताने अ‍ॅम्ब्युलन्सचे लोकार्पण करुन खरी मानवसेवा जोपासली आहे. शहरातील नावाजलेली समाजोपयोगी संस्था ‘अहमदनगर सोशल फाऊंडेशन’ ने शहरातील गरजूंसाठी अल्पदरात या रुग्णवाहिका उपलब्ध होईल. या रुग्णांवाहिकेमुळे रुग्णांना तातडीने सेवा मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हा … Read more

मंदिर बंदचा फटका .. साईबाबा पुण्यतिथी उत्सवात केवळ ३८ लाखांची देणगी

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर १७ मार्चपासून दर्शनासाठी बंद असल्याने याचा आधीच मोठा फटका येथील हाॅटेल, रेस्टारंट, हार-प्रसाद दुकानांना बसला असतानाच आता साई संस्थानच्या देणगीतही कमालीची घट झाली आहे. संस्थानच्या तिजोरीत वर्षभरातील तिन्ही उत्सवांतून दानरूपी मोठी गंगाजळी जमा होत असते. मात्र, मंदिर बंद असल्याने याचा मोठा परिणाम देणगीवर होत आहे. … Read more

जे कर्मचारी कामात हलगर्जीपणा करतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- शहरातील पथदिव्यांचा प्रश्न प्रलंबित अाहे. शहरासह राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे बंद असल्यामुळे रात्री अंधाराचे साम्रा‍ज्य असते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पथदिवे तातडीने दुरूस्त करावेत, विद्युत विभागाचे जे कर्मचारी कामात हलगर्जीपणा करतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी गुरूवारी बैठकीत बोलताना दिला. महापाैर वाकळे यांनी पथदिव्यांचा आढावा … Read more

राठोड यांच्या बदलीबद्दल उलटसुलट चर्चा

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-आठ दिवसांपूर्वीच नगर जिल्ह्याला लाभलेले अितरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांची तडकाफडकी जिल्ह्यातून बदली करण्यात आल्याने त्यांच्या पाथर्डी तालुक्यात मात्र या बदलीमुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. अतरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. राठोड नगरला बदली होऊन आल्यानंतर पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, शिरापूर, पाथर्डी शहर येथे त्यांच्या समर्थकांकडून मोठी बॅनरबाजी करत त्यांचे … Read more

कांदा पिकावर तणनाशक मारून केले नुकसान

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- श्रीगोंदे तालुक्यातील भावडी येथील सेवा संस्थेचे उपाध्यक्ष व भाजपचे कार्यकर्ते विठ्ठल भोस यांच्या गट नं १३४ या शेतामधील कांदा पिकावर अनोळखी व्यक्तीने तणनाशक मारल्याने भोस यांचे लाखो रुपये नुकसान केल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार दाखल केली. भावडी गाव ह कमी लोकसंख्या असलेले गाव आहे . या गावात अतिशय … Read more

विक्रम राठोड यांची विधान परिषदेवर नियुक्ती करा !

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- शिवसेनेचे नगर दक्षिण युवासेना अधिकारी तसेच माजी नगरसेवक विक्रम राठोड यांना राजपाल कोट्यातून विधान परिषदेत संधी द्यावी अशी मागणी, शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नगर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व नगरसेवकांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिवसेनेचे उपनेते कै. अनिल राठोड यांनी शिवसेनेच्या माध्यमातून ४० वर्षे … Read more

अहमदनगर शहर लवकरच खड्डेमुक्त ; आ. जगताप म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगरला खराब रस्त्यांचा एक अभिशापच लागलेला आहे. त्यातच आता मध्यंतरी झालेल्या अति पावसाने शहरातील अनेक महामार्ग खड्ड्यांच्या गर्तेत सापडले आहेत. त्यामुळे या दुरवस्थेची आ. संग्राम जगताप यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून हे रस्ते तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. गुरूवारी या दुरूस्तीच्या कामाला सुरुवात झाली असून त्याची … Read more

गुटखा विक्री तेजीत ; नागरिकांना पडलाय ‘हा’ प्रश्न

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून पोलीस प्रशासनाने गुटखा, तंबाखू, पानमसाला आदी तस्करी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे अनेक ठिकाणी हा व्यवसाय चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. मात्र जिल्ह्यातील एका तालुक्यात या पदार्थांवर कारवाई करण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. श्रीगोंदा तालुक्यात गावोगाव पर्यंत पाळेमुळे रुजलेला गुटख्याच्या अवैध … Read more

खोट्या अ‍ॅट्रोसिटी दाखल झाल्यास करणार ‘असे’ काही…

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- अ‍ॅट्रोसिटी कायद्याने बरीच क्रांती घडवली. त्याने अनेकांना न्यायही मिळवून दिला. परंतु अनेकदा या कायद्यान्वये अनेकांना अडकवण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचे अनेक ठिकाणी घटना घडल्या. अशा घटना पुन्हा घडल्या किंवा खोट्या अ‍ॅट्रोसिटी दाखल झाल्या तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तथा अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय … Read more

धक्कादायक बातमी … तरुणीला मुंबईत बोलावून बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- गेट-टुगेदरच्या नावाखाली राहुरीतील तरुणीला मुंबईत बोलावून तिच्यावर ११ जानेवारी ते १७ जुलै या कालावधीत वेळोवेळी बलात्कार करण्यात आला. तरूणीच्या फिर्यादीवरून विनायक तडसे (नवी मुंबई) याच्यावर राहुरी पोलिसांनी बुधवारी रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तालुक्यातील एका महाविद्यालयात ही तरुणी शिक्षण घेते. विनायकने तिला गेट-टुगेदरसाठी बोलावून घेतले. तिचे नको त्या अवस्थेत … Read more

धक्कादायक ! व्हेटिंलेटरवर असलेल्या महिलेवर रुग्णालयात बलात्कार

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- समाजात आज विविध घटना घडतात की ज्या मानवतेला काळिमा फासणाऱ्या असतात. अनेक घटनांनी शहरे हादरून जातात. महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत असतात. महिलांवरील अत्याचाराविरोधात अनेक कायदे, प्रबोधन होऊनही महिलांवरील अत्याचार कमी होत नसल्याचे वास्तव चित्र सध्या पाहायला मिळत आहे.अशीच एक धक्कादायक घटना रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेबाबत घडली आहे. श्वास घेण्यास … Read more

पोकळ घोषणा! मृत कुटुंबियांचे कर्मचारी आर्थिक मदतीविनाच

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या सहा ते सात महिन्यांपासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाने नगरकरांना चांगलाच घाम फुटला होता. यासंकटमय काळात अनेक कोरोना योध्याने जीवाची पर्वा न करता मदतकार्य सुरूच ठेवले. रुग्णांची सेवा करताना काहींना आपले प्राण देखील त्यागावे लागले. कुटुंब निराधार झाले मात्र याच कोरोना योध्यांचे कुटुंबीय आज आर्थिक मदतीविना संकटात सापडले आहे. कोरोनामुळे … Read more