“नागवडे’ व “कुकडी’ सहकारी साखर कारखाने उसाला उच्चांकी भाव देतील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-तालुक्‍यातील खासगी कारखान्याने पहिला हप्ता जाहीर केला आहे. नागवडे, कुकडी सहकारी साखर कारखाने यापेक्षा जास्तीचा भाव देतील.

अशी ग्वाही नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व माजी आमदार राहुल जगताप यांनी दिली. श्रीगोंदा तालुक्‍यात उसाचे क्षेत्र मोठे असल्याने यावर्षी उसाचे उच्चांकी गाळप होणार आहे.

काळजी करू नका; सर्व गाळप आम्हीच करू. शेतकऱ्यांनी घाई न करता ऊस सहकारी साखर कारखान्यांनाच द्यावा. असे आवाहन साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले आहे.

आढळगाव येथे एका कार्यक्रमात नागवडे व जगताप एकत्र होते. या वेळी राजेंद्र म्हस्के, टिळक भोस, हौसराव भोस, भगवान महाराज गिरमकर, सुभाष गांधी, सुनील भोस, देवराव वाकडे, देवराव शिंदे, कुमार लोखंडे, श्रीकांत भोस, माऊली उबाळे उपस्थित होते.

तसेच पुढे बोलताना नागवडे म्हणाले कि, तालुक्‍यात दोन वर्षे उसाचे विक्रमी गाळप होणार आहे. शेतकऱ्यांनी घाई न करता ऊस तालुक्‍यातील दोन्ही सहकारी साखर कारखान्यांनाच द्यावा.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment