शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखपदी मनोहर पोटेंची निवड, श्रीगोंद्यात पक्ष बळकटीसाठी नवी जबाबदारी

Ahilyanagar Politics: श्रीगोंदा- शिवसेना (शिंदे गट) ने अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांची उपजिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी महत्त्वाची मानली जात आहे, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला बळकटी देण्याचे उद्दिष्ट आहे. मनोहर पोटे यांना मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे परिवहनमंत्री प्रतापराव सरनाईक … Read more

मी सलग आठ वेळा निवडून आलो तेच अनेकांना खुपतंय म्हणून विरोधक जुने प्रकरण उकरून काढत आहेत- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांच्या नावाने बेसल डोसचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा आरोप करत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह कारखान्याच्या तत्कालीन संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणावर बोलताना विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, हे प्रकरण २०१९ मध्येच सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढले आहे. त्यावेळी … Read more

राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर बोगस कर्ज प्रकरणी गुन्हा; नीलेश लंके यांची राजीनाम्याची मागणी

राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज उचलल्याच्या आरोपाखाली लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, खासदार नीलेश लंके यांनी विखे पाटील यांच्यावर तीव्र टीका करत त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. प्रकरण काय आहे ? प्रवरानगर येथील पद्मश्री … Read more

कर्जत नगरपंचायतीच्या सत्तासंघर्षात न्यायालयाचा मोठा झटका! जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय रद्द तर रोहित पवारांना मिळाला दिलासा

Ahilyanagar Politics: कर्जत- नगरपंचायतीच्या सत्ताकारणात गेल्या काही दिवसांपासून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यात आता एक नवा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने गटनेता बदलण्यासाठी केलेला अर्ज जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी फेटाळला होता. पण, हा निर्णय आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला आहे. न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना या अर्जावर नव्याने विचार करून निर्णय … Read more

शेतकऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्या राधाकृष्ण विखेंना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा, खासदार निलेश लंके आक्रमक

Ahilyanagar Politics: पारनेर- शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज उचलल्याच्या आरोपाखाली राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर लोणी पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, खासदार नीलेश लंके यांनी विखे पाटील यांच्यावर तीव्र टीका करत त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शेतकऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्या … Read more

बोगस कर्जमाफी प्रकरण भोवणार! राधाकृष्ण विखे पाटील यांचे मंत्रिपद जाणार? संजय राऊत आणि निलेश लंके आक्रमक

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज आणि कर्जमाफी घोटाळ्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी विखे पाटील यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी … Read more

Ahilyanagar Politics : अखेर सभापती राम शिंदे यांनी बाजी मारली ! रोहित पवारांचे वाईट दिवस सुरु…

Ahilyanagar Politics : अखेर कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आपली रणनीती यशस्वी ठरवत बाजी मारली असून, रोहित पवारांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. त्यांच्या समर्थक उमेदवार प्रतिभा भैलुमे यांनी अचानक उमेदवारी मागे घेतल्यामुळे रोहिणी घुले यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे. या घडामोडीमुळे शिंदे यांची राजकीय पकड अधिक … Read more

मोठी बातमी ! श्रीगोंदेतील आंदोलन बाराव्या दिवशी स्थगित; संत श्री शेख महंमद महाराज मंदिराबाबत काय झाला निर्णय? पहा..

श्रीगोंदा : संत श्री शेख महंमद महराज मंदिर जीर्णोद्धार आणि वक्फकडे केलेली नोंदणी रद्द व्हावी यासाठी सुरू असलेले आंदोलन प्रशासन, माजी आ. बबनराव पाचपुते, शिवसेनेचे अक्षय महाराज भोसले यांच्या आश्वसनानंतर बाराव्या दिवशी स्थगित करण्यात आले. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली असल्याचे सांगितले तर अक्षय महाराज यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या … Read more

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखाना निवडणूक बिनविरोध

संगमनेर (प्रतिनिधी)–काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशातील सहकारासाठी आदर्श ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची 2025-2030 या पंचवार्षिक कार्यकाळाची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श विचारांवर कारखान्यासह संगमनेरच्या सहकाराची वाटचाल सुरू आहे. सहकारातून ग्रामीण भागात सह … Read more

इंग्रजी शाळांपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळा लई भारी, उद्याचा भारत घडवणारी पिढी याच शाळेतून तयार होतेय!- आमदार किरण लहामटे

Ahilyanagar News: अकोले- तालुक्यातील जिल्हा परिषद (झेडपी) शाळांचे महत्त्व अधोरेखित करत आमदार डॉ. किरण लहामटे यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळांपेक्षा झेडपी शाळा अधिक चांगल्या असल्याचे ठाम मत व्यक्त केले. या शाळांमधून उद्याचा भारत घडवणारी पिढी तयार होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अकोले तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा गुणगौरव … Read more

भाजप जिल्हाध्यक्षपदासाठी पंसतीची नावे बंद पाकिटात! जिल्हाध्यक्ष निवडीचा फैसला गेला वरिष्ठांच्या हाती!

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- भाजपच्या संघटन पर्वात मंडलाध्यक्ष निवडीसाठी जी पद्धत वापरली गेली, तीच आता जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीसाठी वापरली जात आहे. पक्षाच्या प्रभारी आणि निरीक्षकांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून तीन जिल्हाध्यक्षपदांसाठी पसंतीची नावे बंद पाकिटात घेतली आहेत. ही बंद पाकिटे आता प्रदेश कार्यालयाकडे पाठवली जाणार आहेत. त्यामुळे जिल्हाध्यक्ष निवडीचा अंतिम निर्णय प्रदेश पातळीवर होणार आहे. येत्या ५ मे … Read more

कर्जत नगराध्यक्ष निवडणुकीत राम शिंदे आणि आमदार रोहित पवारांची प्रतिष्ठा पणाला, दोन्हीकडून अर्ज दाखल

Ahilyanagar Politics: कर्जत- नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी २८ एप्रिल २०२५ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपली असून, या निवडणुकीसाठी दोन उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या गटाकडून काँग्रेसच्या रोहिणी सचिन घुले आणि आमदार रोहित पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रतिभा नंदकिशोर भैलूमे यांनी प्रत्येकी दोन अर्ज … Read more

आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची रणनिती जाहीर, ‘स्वबळावर’ लढण्यासाठी तयारीला लागण्याचे आमदार दाते यांचे आवाहन

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. आमदार काशीनाथ दाते यांनी पक्ष कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे त्यांनी सांगितले. महायुतीच्या युतीत निवडणुका लढवायच्या की स्वतंत्रपणे, याबाबत स्पष्टता नसली तरी पक्षवाढीवर भर देण्याचे निर्देश त्यांनी … Read more

महसूल व पोलिसांना आ. काळे यांनी दिलेली चेतावणी विचार करायला लावणारी

सुरेगाव : संयमी, शांत स्वभावाचे व अभ्यासू आमदार म्हणून ओळख असलेल्या आशुतोष काळे यांनी महसूल व पोलीस विभागाला अवैध वाळू तस्करी व बेकायदा धंद्यांविरोधात कारवाई करण्याची सूचना केली होती; मात्र कारवाई न झाल्याने त्यांनी कायदा हातात घेण्याची चेतावणी दिली आहे, ही कोपरगावच्या प्रशासकीय यंत्रणेसाठी गंभीर इशारा मानला जात आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वाळू तस्करी थांबवण्याच्या … Read more

सोसायट्यांचे गट सचिव पुन्हा जिल्हा देखरेख संस्थेच्या अधिपत्याखाली : आ. शिवाजी कर्डिले

अहिल्यानगर : महाराष्ट्र शासनाने २३ एप्रिल २०२५ रोजीच्या राजपत्राव्दारे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये कलम ६९ अ खालील (४) अन्वये राज्यातील जिल्हा देखरेख संस्थांना पुर्नजीवित करण्याचे अध्यादेश महामहीम राज्यपाल यांच्या आदेशानुसार राज्याचे मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी जारी केला आहे. या अध्यादेशामुळे जिल्हा देखरेख सहकारी संस्था म्हणजेच केडर संस्था पुन्हा अस्तित्वात आली असल्याने … Read more

पंढरपूर मार्गाचे चौपदरीकरण लवकरच!, खासदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

Ahilyanagar News : अहिल्यानगर- पैठण ते पंढरपूर या संत एकनाथ महाराजांच्या पालखी मार्गाच्या सुधारणेसाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन महत्त्वाचा पुढाकार घेतला आहे. या मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पैठण ते खर्डा या भागातील काम जवळपास पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्प्यात धाराशिव जिल्ह्यातील कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, खर्डा शहरातील रस्त्यांचे चौपदरीकरण आणि इतर अनुषंगिक सुविधांची … Read more

कर्जतच्या नगराध्यक्षपदी घुले की शेलार? अचानक तिसऱ्या नावाचीही होऊ शकते निवड; आज होणार फैसला

Ahilyanagar Politics : कर्जत- नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी २८ एप्रिल २०२५ रोजी होणाऱ्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पदासाठी काँग्रेसच्या उपनगराध्यक्षा रोहिणी घुले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) छाया शेलार यांच्या नावाची चर्चा आहे. जर या दोन नावांवर एकमत झाले नाही, तर तिसऱ्या उमेदवाराची निवड होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यासोबतच उपनगराध्यक्षपदासाठीही नगरसेवकांमध्ये जोरदार स्पर्धा … Read more

खुशखबर ! ‘मुळा’तील गाळ काढणार, ३ टीएमसी अतिरिक्त पाणी वाढणार; उजव्या कालव्याच्या नूतनीकरणाचेही काम सुरु

महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील जुन्या असलेल्या कालव्यांच्या दुरुस्ती व नूतनीकरणाचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मुळा धरणातील गाळ काढण्याच्या कामास … Read more