प्रशांत गडाखांमध्ये देशपातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- युवानेते प्रशांत गडाख हे खरेतर देशपातळीवर सामाजिक नेतृत्व करण्याची क्षमता असलेले नेतृत्व अाहे. भविष्यात देशपातळीवर नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यास त्यांनी ती दवडू नये, असे सूचक वक्तव्य महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.  पुणे येथील महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा आयोजित ज्येष्ठ स्वातंत्रसेनानी डॉ. रावसाहेब शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुरस्कारांचे वितरण महसूलमंत्री … Read more

साठवण तलावाचे काम चार महिन्यांत पूर्ण करा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील पाच नंबर साठवण तलावाचे काम चार महिन्यांत पूर्ण झाले पाहिजे, प्रसंगी खोदकाम व माती वाहतुकीसाठी वाढीव साधनसामुग्री लावावी, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी दिल्या.  नगरपालिकेकडे पैसे नसल्याने समृध्दी महामार्गाच्या ठेकेदाराच्या मदतीने तलावाचे खोदकाम केले जात आहे. आढावा घेण्यासाठी काळे यांनी सोमवारी सकाळी पालिकेचे अधिकारी व … Read more

अहमदनगर जिल्हाविभाजनाचा निर्णय नामदार बाळासाहेब थोरातांकडे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जिल्हा विभाजनाची चर्चा पुन्हा सुरू झाली असून त्याचा चेंडू पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महसूलमंत्री थोरातांच्या कोर्टात टोलावला आहे.  जिल्हा विभाजनाचा निर्णय मंत्री थोरात यांना विचारून सांगू, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते.  नगर जिल्हा विभाजनाची चर्चा गत पाच-सात वर्षांपासून सुरू आहे. मध्यतंरीच्या काळात जोर धरलेली … Read more

इंदुरीकर महाराज राजकारणही गाजवतील !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ‘राजकारण्यांनी जसा तान्हाजी सिनेमा एका थिएटरात बसून एकत्र पाहिला, तसेच तुमच्या कार्यकर्त्यांना गावात एकत्र बसायला सांगा’, असा सल्ला निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी राज्यकर्त्यांना दिला. इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार आहेत, इंदुरीकर महाराज हे त्यांच्या कीर्तनाच्या मजेदार शैलीसाठी ओळखले जातात. कालच्या कार्यक्रमात त्यांनी राजकारणाच्या स्थानिक पातळीवर होणार्‍या परिणामांवर परखड व … Read more

नागवडे साखर कारखान्याच्या प्रारूप यादीवर हरकतीचा पाऊस ; ३ फेब्रुवारीला सुनावणी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नागवडे सहकारी साखर कारखान्याने  २२ हजार ७११ सभासदांपैकी केवळ ९ हजार ५८९ सभासदांची यादी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक  ( साखर) अहमदनगर यांना पाठविली होती.११९७ मयत आणि १०५४ थकबाकीदार असे २२५१ वगळता २० हजार ४६० सभासद मतदार यादीत यावयास हवे होते. पैकी ९ हजार ५८९ सभासद मतदार यादीत … Read more

बाळासाहेब थोरात म्हणाले पक्ष सोडून गेलेल्यांनी काही दिवस तिकडेच राहा !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- निवडणुकीपूर्वी पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेले अनेक मित्र सध्या अस्वस्थ आहेत. ते पक्ष सोडून गेल्याने त्यांची जागा पक्षातील तरुणांनी घेतली आहे. त्यामुळे पक्ष सोडून गेलेल्या मित्रांनी आता तिकडेच सुखी राहावे, अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोणचेही नाव न घेता केली आहे. सरकार स्थापनेनंतर बाळासाहेब थोरात प्रथमच जामखेडमध्ये आले होते. यावेळी … Read more

तीन तिघाडी आणि काम बिघाडी – माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी : राज्‍यातील जनतेला दिलासा देण्यापेक्षा अडचणी वाढविण्याचाच  सरकारचा  प्रयत्न दिसतो. कोणत्याही आश्वासनाची पूर्तता नाही. ‘तीन तिघाडी आणि काम बिघाडी’ आशी सरकारची आवस्था झाली  आहे. मागील सरकारच्या योजना बंद करण्यावर सरकारचा भर असून, शेतक-यांपेक्षा ‘सरकारला नाईट लाईफचीच चिंता अधिक’ असल्याची खोचक टिका माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी  केली. प्रसार माध्यमांशी बोलताना आ.विखे पाटील म्हणाले की,सरकार नविन असल्याने त्यांना निर्णय घेण्यासाठी  आमच्या शुभेच्छा कायम आहेत. … Read more

प्रजासत्ताक राष्ट्राने प्रगती केली; मात्र आज संविधानाला काँग्रेस विरोधी लोक धक्का देत आहे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  26 जानेवारी 1960 रोजी प्रजासत्ताक म्हणजे लोकांचे राज्य स्वतंत्र भारतात सुरु झाले. संविधान या दिनापासून लागू झाले. जगातील सर्वात मोठे हे प्रजासत्ताक राष्ट्र आहे. गत 70 वर्षातील बदल पहात देशाने विविध क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती केली आहे, त्यात काँग्रेसचा सर्वात मोठा वाटा आहे. मात्र आज काँग्रेस विरोधी लोक संविधानाला धक्का पोहचवत … Read more

… तर संपूर्ण मराठवाडा रस्त्यावर येईल !

औरंगाबाद : “दुष्काळमुक्त मराठवाडा हे गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न होतं, जर मराठवाड्याचे पाणी थांबवण्याचा प्रयत्न केलात, तर संपूर्ण मराठवाडा रस्त्यावर उतरले”, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी दिला. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्नासाठी भाजपाच्यावतीनं माजी मंत्री पंकजा मुंडे आज, उपोषणाला बसल्या आहेत. सकाळी दहा वाजता औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंकजा मुंडेंनी उपोषणाला सुरुवात केली. या … Read more

विकास कामांसाठी १७४ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होणार – आ.राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी :- शहराची वाढती लोकसंख्या आणि देशभरातून येणा-या भाविकांची गर्दी लक्षात घेवून नगर पंचायतीला नागरी सुविधांची व्यापकता वाढवावी लागेल असे मत माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.आगामी दोन वर्षात नगर पंचायतीस विकास कामांसाठी १७४ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. प्रजासत्‍ताक दिनाचे औचित्य साधून नगर पंचायतीच्या वतीने चिल्ड्रन गार्डन,वाचनालय इमारत, कब्रस्तान … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पद्मभूषण,पद्मश्री पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन

मुंबई: केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांना व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर विविध क्षेत्रातील 12 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले. पद्मश्री पुरस्कार सुरेश वाडकर, पोपटराव पवार,श्रीमती राहीबाई पोपेरे, डॉ. रमण … Read more

मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : वाहतूक कोंडीतून वेळ वाचल्यास प्रवास सुखकर होईल व निश्चित स्थळी वेळेत पोहोचता येईल.यासाठी  मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर देणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ना.म.जोशी मार्ग जंक्शनवरील डिलाईल पुलाच्या पोहोच रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, मुंबई महानगरपालिकेचे … Read more

राज्यातील शेतकरी, कष्टकरी, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी राज्य शासन बांधिल – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे :शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून राज्यातील शेतकरी, कष्टकरी, गरीब, वंचित, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी राज्य शासन बांधिल आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजीनगर पोलीस परेड ग्राउंड येथे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्‍या हस्‍ते मुख्‍य शासकीय ध्‍वजारोहण झाले, यावेळी ते बोलत होते. देशाच्या जडणघडणीत सर्व देशवासियांचे … Read more

मुंबईत मियावाकी पद्धतीने वनीकरणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: मुंबई हरित करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाकांक्षी असलेला मियावाकी पद्धतीच्या वनीकरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वडाळ्यातील भक्‍ती पार्क येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. वृक्षारोपणानंतर वृक्ष जोपासण्याची जबाबदारी अधिक असल्याचे सांगून त्याची काळजी यंत्रणांबरोबरच नागरिकांनीही घेतली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले. मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मुंबईत हरितक्षेत्र वाढविण्‍यासाठी प्रयत्‍न … Read more

१० रुपयाच्या थाळीसोबत २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब माणूस ! ????

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ठाकरे सरकारच्या १० रुपयांत शिवथाळी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये याची सुरुवात करण्यात आली. मात्र या योजनेच्या पहिल्याच दिवशी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना टीका सहन करावी लागली आहे.jitendra-awhad गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याही हस्ते शिवभोजन उदघाटन करण्यात आले. या उदघाटनावरून मनसे नेते अमेय खोपकर यांनी आव्हाडांवर टीका … Read more

पाणीप्रश्नावर पंकजा मुंडेंची उपोषणाची हाक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / औरंगाबाद: मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्नासाठी भाजपाच्यावतीनं माजी मंत्री पंकजा मुंडे आज, सोमवारी उपोषण करणार आहेत. सकाळी दहा वाजता औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंकजा मुंडे उपोषणाला सुरुवात करतील.  या उपोषणामध्ये देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही सहभागी … Read more

पीडित आणि अन्यायग्रस्त महिलांना न्याय देण्याचे काम सखी केंद्र करेल – पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- :- वन स्टॉप सेंटर अर्थात सखी केंद्राच्या माध्यमातून पीडित आणि अन्यायग्रस्त महिलांना न्याय देण्याचे काम चांगल्या पद्धतीने होईल, असा विश्वास राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. अर्थात, समाजाने महिलांवर अन्याय होणार नाही. त्यांना अशा केंद्रांची आवश्यकता लागणार नाही, असे वातावरण आणि मानसिकता तयार करण्याची गरज असल्याचे … Read more

शेतकर्‍यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासन वचनबद्ध – पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गावांचा सर्वांगीण विकास करण्यावर राज्य शासनाचा भर असून आपला जिल्हा हा या विकासप्रक्रियेतील महत्वाचा जिल्हा आहे. त्यामुळेच जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत असून त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी वचनबद्ध असल्याचे … Read more