शेवगाव तापलं ! आ. राजळेंसह साखर सम्राटांवर टीकेची झोड, हर्षदा काकडेंनी सगळंच बाहेर काढलं..

kakade

Ahmednagar Politics : प्रस्थापित साखरसम्राटांनी शेतकरी हिताची एखादी चळवळ केलेली तुम्ही कधी पाहिली का ? मात्र सत्ता आपल्यालाच व आपल्या ठराविक बगलबच्चांनाच मिळाली पाहिजे म्हणून ग्रा.पं. निवडणुकीतदेखील हे प्रस्थापित नेते सक्रिय होतात. सत्तेचे सर्व केंद्र यांच्याच ताब्यात यांना लागतात. दोन्ही तालुक्यांत प्यायला पाणी नाही, तर काही गावांत जायला रस्ते नाहीत. वर्षानुवर्षी सत्ता भोगून मग यांनी … Read more

‘राजकीय संस्कृती बिघडवली, आता आक्रमक भूमिका घ्या’, खा. लंकेंच्या मतदार संघातच मोठा एल्गार

lanke

Ahmednagar Politics : पारनेर येथे महायुतीचा बैठक मेळावा पार पडला. या बैठकीत महायुतीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका स्पष्ट केली. पारनेरात वेगळा पायंडा पडत असून, तालुक्याची राजकीय संस्कृती बिघडली असल्याचे व त्यास बिघडवणारे लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा घणाघात यावेळी माजी सभापती काशिनाथ दाते सर यांनी केला. तसेच ते पुढे म्हणाले, पुढील काळात तालुक्यात काम करत असताना सर्वांनी आक्रमक … Read more

नगर उबाठाला तर श्रीगोंदे काँग्रेसला? स्वतः शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर इच्छुकांत खळबळ

politics

Ahmednagar Politics : निवडणुका आता तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. सध्या अनेक इच्छुक आमदारकीची तयारी करत आहेत. सध्या महाविकास आघाडीचा विचार जर केला तर नगर व श्रीगोंदे येथे शरद पवार गट दावा करेल किंवा ती जागा त्यांनाच मिळेल अशी अपेक्षा होती. त्यामुळे राष्ट्रवादीतील अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी करत होते. परंतु आता नगर उबाठाला तर … Read more

‘पक्षात निष्ठावंतांना स्थान नाही’, अहमदनगरमधील भाजपच्या ‘त्या’ बड्या नेत्याचा विधानसभेला स्वबळाचा नारा

politics

Ahmednagar Politics : ऐन विधानसभेच्या तोंडावर भाजपला मोठा फटका बसण्याचीशक्यता आहे. पक्षात निष्ठावंतांना स्थान नाही, गळचेपी होते अशी खंत व्यक्त करत एका भाजपच्या बड्या नेत्याने स्वबळाचा नारा दिला आहे. कर्जत तालुक्यातील भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर यांनी समर्थकांचा मेळावा घेत स्वबळाची घोषणा केली. यामुळे एकप्रकारे भाजपला हा धक्का समजला जात आहे. कर्जत तालुक्यात भाजपाचे … Read more

माझा नाद केला तर रोहित पवारांना गारेगारचा गाडा लावून देईन.., ‘त्या’ आमदारांने पवारांचं सगळंच बाहेर काढलं

rohit pawar

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आ. रोहित पवार हे सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाची धुरा सांभाळत आहेत. त्यामुळे सध्या त्यांचे राज्यभर विविध जिल्ह्यात दौरे सुरु असतात. दरम्यान सभा बैठकांत आरोप प्रत्यारोपही सुरु असतात. दरम्यान त्यांच्यावर आता एका आमदाराने मोठा घणाघात केला आहे. माझा नाद केला तर रोहित पवारांना गारेगारचा गाडा लावून देईन असा इशाराच … Read more

कधी होणार विधानसभेची निवडणूक? आचारसंहिता कधी? निकाल कधी? पहा सविस्तर

vidhansabha

राज्यातील विधानसभा निवडणूक कधी लागेल याकडे आता राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. विधानसभेच्या निवडणुका साधारण नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होतील अशी माहिती अंतर्गत सूत्रांकडून कळाली आहे. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी नवीन विधानसभा येईल असे म्हटले जात असल्याची माहिती समजली आहे. दरम्यान विधानसभेची निवडणूक महायुती एकत्रितपणे व महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. त्यासाठी २० तारखेपासूनच महायुतीच्या संयुक्त … Read more

ब्रेकिंग ! विधानसभेच्या निवडणुका दिवाळीनंतरच, ‘या’ तारखेला जाहीर होणार निकाल ?

Maharashtra Vidhan Sabha Nivdnuk

Maharashtra Vidhan Sabha Nivdnuk : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राला वेध लागले आहे ते विधानसभेच्या निवडणुकीचे. आतापासूनच विधानसभा निवडणुकीचे पडघम सुद्धा वाजू लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी आगामी निवडणुकीसाठी आत्तापासूनच कंबर कसली आहे. अशातच, आता विधानसभा निवडणुकी संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. आतापर्यंत अनेक प्रतिष्ठित वृत्तसंस्थांनी विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर … Read more

मिसळ, ताक आणि जिलेबी समवेत मंत्री विखेनी कार्यकर्त्याना दिला राजकीय कानमंत्र!

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी तालुक्यावर चांगलेच लक्ष कैंद्रीत केले असून आता कार्यकर्ते आणि नागरीकां समवेत मिसळ पे चर्चा करीत त्यांनी शहरामध्ये सकाळीच येवून साधलेल्या संवादाची खमंग चर्चा सुरू झाली आहे. मागील आठड्यात मंत्री विखे पाटील यांनी सलग तीनवेळा तालुक्याचा दौरा करून तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्याना सक्रीय होण्याच संदेश देतानाच विखे कुटुबियांशी अनेक … Read more

‘भल्या पहाटे आ.आशुतोष काळे भेटीला..’, अजित दादांनी भांडाफोड करत तिकीट देण्याबाबत केले सूचक वक्तव्य

ajitpawar

Ahmednagar Politics :  राज्यात केंद्रातील विचाराचे सरकार आले, तर निधीत झुकते माप मिळते. लोकसभेला संविधान बदलणार नाही, आरक्षण जाणार नाही, समान नागरी कायदा येणार नाही, असे आम्ही सांगत होतो. मात्र, आमच्यावर विश्वास ठेवला नाही. अल्पसंख्याक बाजूला गेले. आम्ही पाठीशी उभे राहणारे आहोत. तुम्ही काळजी करू नका. विश्वास बाळगा, आलतू-फालतू राजकारण करणारे आम्ही नाही, शब्द दिला … Read more

मला आमदार व्हायचेच, पक्ष कोणताही असेल..! भाजपचा अहमदनगरमधील दिग्गज नेता फुटण्याच्या मार्गावर

pichad

Ahmednagar Politics : अकोले तालुक्यातील पाणी, आरोग्य यासारख्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी मी आमदारकी मागतोय. मला तुमच्या सर्वांची साथ हवी आहे. जनतेच्या पाठबळावर आमदारकीसाठी तुमच्यासमोर येतोय. मला तुम्ही साथ द्या, पक्षाकडून उमेदवारी मिळो, अगर न मिळो, प्रसंगी पक्ष कोणताही असो आपण माझ्यासोबत राहाल, अशी खात्री आहे म्हणून मी आमदारकीसाठी पुन्हा येतोय, असे सांगत माजी आमदार वैभवराव … Read more

विधानसभा निवडणुकीपूर्वी श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी जेलभरो आंदोलन !

jailbharo

अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी श्रीरामपूर जिल्हा करावा, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय, सिव्हिल हॉस्पिटल, सबजेलसाठी जागा आरक्षित करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (९ ऑगस्ट) दुपारी १२ वाजता स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने जेल भरो आंदोलन करण्यात आले. गांधी पुतळ्यासमोर सर्वपक्षीय नेत्यांनी श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे या घोषणेने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. श्रीरामपूर … Read more

पत्रकार चौक, लालटाकी, कापड बाजार रस्ता काँक्रिटीकरणाला प्रारंभ, शहर खड्डेमुक्त करणार : आमदार जगताप !

sangram jagatap

नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने कापड बाजार, महात्मा गांधी रोड हा महत्त्वाचा असून व्यापारीकरणामुळे नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत असतात. त्यांना चांगल्या सुविधा देण्याचे काम केले जात आहे. जिल्हाभरातून येणाऱ्या ग्राहकांच्या माध्यमातून शहराचा नावलौकिक निर्माण होऊन विकसित शहर म्हणून ओळखले जाईल, शहरालगतची डीपी रस्त्यांची कामे मार्गी लागल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने येतील व व्यवसायीकरण वाढेल … Read more

आमदार ‘त्या’ दिग्गजाची भेट घ्यायला थेट बँकेत ! मागितली राजकीय मदत, अहमदनगरमध्ये चर्चांना उधाण

politics

Ahmednagar Politics : निवडणुका आता तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. परंतु जिल्ह्यातील अनेक भागात अनेक मतदार संघात महाविकास आघाडी व महायुतीमधील घटक पक्षांच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यामध्ये अद्यापही नाराजी नाट्य, तर काही पक्षांतर्गत नाराजी नाट्य रंगलेलेच दिसते. आता याच पार्श्वभूमीवर अनके नेत्यांनी बेरजेचे राजकारण सुरु केले आहे. नाराज मंडळींना आपल्याकडे ओढून घेण्याकडे फिल्डिंग लावली जात आहे. … Read more

क्रेनमध्ये बिघाड ! जयंत पाटील, रोहिणी खडसे, अमोल कोल्हे बसलेल्या ट्रॉलीला वर हवेतच अपघात..

apghat

शिवस्वराज्य यात्रा किल्ले शिवनेरीवरून लेण्याद्रीकडे जात असताना जुन्नर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ शिल्पास क्रेनमधून पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर क्रेन खाली येत असताना क्रेनमध्ये बिघाड होऊन क्रेनचा पाळणा तिरका झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, युवक अध्यक्ष मेहबूब शेख, खासदार अमोल कोल्हे हे थोडक्यात अपघातातून बचावले. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शरद् पवार … Read more

पाण्‍याचा लाभ शेतक-यांना मिळवून देण्‍यासाठी महायुती सरकार कटीबध्‍द – ना.राधाकृष्‍ण विखे पाटील

भोजापूर चारीचे पाणी येण्‍यास ३५ वर्षे लागले. परंतू शेतक-यांना पाणी देण्‍यासाठी महायुतीचे सरकार सत्‍तेवर यावे लागले. भोजापूर चारीच्‍या  कामासाठी निधीची उपलब्‍धता करुन दिल्‍यामुळेच या कामातील अडचणी दुर झाल्‍या आहेत. चिंता करु नका, उर्वरित कामातील अडथळे सुध्‍दा दुर करुन भोजापूर चारीच्‍या पाण्‍याचा लाभ शेतक-यांना मिळवून देण्‍यासाठी महायुती सरकार कटीबध्‍द राहील अशी ग्‍वाही महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील … Read more

दादा, आण्णा, भैय्या, वहिनी… श्रीगोंदेत विधानभेला डझनभर इच्छुक, कुणाची लागेल लॉटरी? पहा..

pachapute

Ahmednagar Politics : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये बबनराव पाचपुते यांनी पहिल्यांदा कमळ फुलविले. लोकसभा निवडणुकीत मात्र या मतदारसंघातून महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले. त्यामुळे येथील भाजपचे नेते चांगलेच सतर्क झाले आहेत. मतदारसंघातील राजकीय समीकरणे पाहता अगामी विधानसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच पाहावयास मिळणार आहे. यंदा श्रीगोंदेचा विचार केला तर दोन … Read more

‘माजी सरपंचाइतकीच माझी ताकद राहिलीये..’, भर सभेत सुजय विखेंचे वक्तव्य, अजित पवार गटाचाही बहिष्कार..

vikhe

Ahmednagar Politics :  आता मी माजी खासदार झालो आहे. माजी सरपंचाएवढीच माझी राजकीय ताकद राहिली आहे. त्यामुळे निवेदने देण्यापलीकडे आपण मोठी कामे करू शकत नाही. त्यामुळे फारतर पोलिस हवालदार, तलाठी यांच्याकडील कामे करू शकतो, असे माजी खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप पदाधिकारी व विखे समर्थकही काहीसे गोंधळून गेले. एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला … Read more

महायुती सरकारच्या साथीने श्रीगोंद्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध : अनुराधा नागवडे !

anuradha nagavade

श्रीगोंद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष तथा जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. अनुराधा नागवडे यांनी केले. श्रीगोंदा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन सौ. अनुराधा नागवडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व नागवडे सहकारी साखर कारखान्याचे … Read more