श्रीगोंद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष तथा जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. अनुराधा नागवडे यांनी केले.
श्रीगोंदा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन सौ. अनुराधा नागवडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व नागवडे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस होते.
या वेळी सौ. नागवडे म्हणाल्या की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने जनहिताची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे विविध विकासकामे करणे शक्य होत आहे.
नगरसेविका सौ. सीमाताई गोरे व संतोष कोथिंबीरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे प्राप्त झालेल्या एक कोटी रुपयांच्या विकास निधीमधून आज विविध विकास कामांचे भूमिपूजन होत आहे, ही प्रभागाच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे.
या वेळी साळवनदेवी मंदिरासमोर सभामंडप बांधणे, वेळू रोड, प्रोफेसर कॉलनी येथे रस्ता कॉक्रिटीकरण करणे, पेडगाव रोड ते वेळू रोड रस्ता (शिवपार्वती सोसा) कॉक्रिटीकरण करणे, प्रभाग नऊमध्ये विविध ठिकाणी बाकडे बसविणे आदी कामे प्रामुख्याने घेण्यात आलेली आहेत.
या वेळी श्रीगोंदा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती पुष्पगंधा भगत, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख श्रीमती मीराताई शिंदे, उपनगराध्यक्षा सौ. ज्योती खेडकर, माजी उपनगराध्यक्ष राजू दादा गोरे, नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब नेटके, नगरसेवक तथा गटनेते गणेश भोस, नगरसेवक समीर बोरा, निसार बेपारी, सतीश मखरे सर, सौ. सोनालीताई घोडके, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष शिंदे,
नंदकुमार ताडे, शिवसेना युवा तालुकाप्रमुख निलेश गोरे, युवा शहरप्रमुख संदीप भोईटे, शिवसेना शहरप्रमुख नितीन गायकवाड, सोसायटीचे चेअरमन डॉ. चंद्रकांत कोथिबिरे, माजी नगरसेवक राज् कोथिंबीर, चेअरमन सुधीर बापू कोथिंबिरे, जय माता ग्रुपचे अध्यक्ष लक्ष्मणराव कोथिंबिरे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नानासाहेब शिंदे,
उद्योजक पांडुरंग गांजुरे, साळवनदेवी मातेचे पुजारी पाठक परिवार, सोसायटी संचालक पोपटराव कोथिबीरे, राजू शेठ शिंदे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष सोनू कोथिंबिरे, समीर कोथिंबीरे, शंकर साळुंखे, इंजि. वसिम भाई जमादार, शिवसेना तालुका संघटक गणेश गांजुरे तसेच साळवनदेवी रोड, प्रोफेसर कॉलनी, शिवपार्वती सोसायटी मधील नागरिक उपस्थित होते