परदेशी तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या अभिनेत्यास अटक

वृत्तसंस्था :- परदेशी तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी मुंबईतून एका अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. मीरा रोडचा रहिवासी असलेल्या राज सिंग याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने तरुणीकडून तब्बल सात लाख रुपये उकळले आहेत. न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय तक्रारदार तरुणीसोबत सोशल मीडियावर राज सिंगची फेब्रुवारी महिन्यात ओळख झाली होती. दोघांमधील संवाद … Read more

हृतिक रोशनवरील प्रेमामुळे पत्नीचा गळा आवळून खून !

न्यूयॉर्क : न्यूयॉर्कमध्ये हृतिकची चाहती असल्याने एका महिलेचा तिच्याच पतीने गळा आवळून खून केला, 33 वर्षाच्या दिनेश्वर बुद्धिदत याने त्याच्या 27 वर्षीय पत्नी डोन डॉजॉएची गळा आवळून हत्या केली. ही घटना शुक्रवारी (8 नोव्हेंबर) घडली. डॉजॉएची हत्या केल्यानंतर दिनेश्वरनेही झाडाला लटकून आत्महत्या केली. दिनेश्वर बुद्धिदत ही त्याच्या अपमानास्पद आणि कंट्रोलिंग वागणुकीसाठी ओळखला जायचा. त्याची पत्नी डॉजॉए … Read more

पंतप्रधान – राष्ट्रपतींच्या फोटोचा गैरवापर केल्यास सहा महिन्यांची शिक्षा होणार

नवी दिल्ली : पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या फोटोचा दुरुपयोग केल्यास आता सहा महिन्यांपर्यंत शिक्षा होऊ शकते. खाजगी कंपन्यांच्या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा वापर करण्यात आल्यानंतर  केंद्र सरकार सावध झाले आहे.  यामुळे  केंद्र सरकारने बोधचिन्ह आणि नावे अधिनियमन कायदा १९५० मध्ये पहिल्यांदाच शिक्षेची तरतूद आणण्यावर विचार केला आहे, तसेच दंडाची रक्कम देखील एक हजार पटीने … Read more

भारतासोबत व्यापार बंद केल्यानंतर पाकिस्तान संकटात!

नवी दिल्ली : भारतासोबतचे सर्व प्रकारचे व्यापार संबंध तडकाफडकी तोडणे पाकिस्तानला चांगलेच भोवले आहे. भारताने जम्मू-काश्मीरसंबंधित ३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला होता. मात्र आधीच महागाई आणि आर्थिक कमजोरीच्या समस्यांमध्ये होरपळत असलेल्या पाकिस्तानसमोरील अडचणी अधिक वाढल्या आहेत. भारतासोबत व्यापार बंद केल्यामुळे कापसाची आयात करण्यासाठी पाकिस्तानला आता अधिक पैसे मोजावे लागत आहेत. याशिवाय पाकिस्तानमध्ये … Read more

भाजपाला देणगी देणारा टाटा ट्रस्ट सर्वात मोठा देणगीदार, तब्बल ‘इतक्या’ कोटींचा दिला निधी

नवी दिल्ली : भाजपाला २०१८ -१९ सालादरम्यान धनादेश व ऑनलाईनच्या माध्यमातून तब्बल ७०० कोटींचा निधी मिळाला. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापैकी सर्वाधिक ३५० कोटीची देणगी टाटा ट्रस्टकडून देण्यात आली आहे. सत्ताधारी भाजपाने निवडणूक आयोगाकडे जमा केलेल्या दस्तावेजामध्ये ही माहिती दिलेली आहे. भाजपाकडून निवडणूक आयोगाला ३१ ऑक्टोबर रोजी पक्षाला मिळालेल्या देणगीची माहिती देण्यात आली आहे. त्यानूसार आर्थिक … Read more

सावधान! चुकीचा आधार नंबर दिल्यास होणार १० हजारांचा दंड

नवी दिल्ली : आधार कार्डच्या वापराबाबतची आपल्याला माहिती असायलाच हवी. अनेक सरकारी कामात आधार कार्डच्या नंबरची आवश्यकता असते. काही महिन्यांपूर्वी करदात्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आयकर विभागाने दिलेल्या परमनंट अकाऊंट नंबरच्या ऐवजी आधार नंबर वापरण्याची परवानगी दिली आहे. परंतु जर या नियमांचा चुकीच्या पद्धतीने वापर झाल्यास किंवा आपल्याकडून चुकीचा आधार नंबर दिला गेलाच तर आपल्याला १० … Read more

एका चुकीमुळे वडील-मुलगी उकळत्या तेलात होरपळली

झाशी : मध्य प्रदेशातील झाशी येथील सिपरी बाजार भागातील अंगावर शहारे उभे करणारी घटना सीसीटीव्ही फुटेजमुळे समोर आली आहे. झाले असे की, मिठाईच्या दुकानाबाहेर स्कूटीवर पुढे बसलेल्या मुलीने अचानक गाडीचे सेल्फ बटन दाबले. त्यामुळे स्कूटी थेट दुकानात घुसली. जिलेबीचा पाक आणि उकळत्या तेलात मुलगी आणि तिचे वडील जाऊन पडले. त्यामुळे मुलगी आणि वडील गंभीररीत्या भाजले. … Read more

हातात रायफल घेऊन लग्नात !

गुवाहाटी : केंद्र सरकार एकीकडे ईशान्य भारतातील नागा बंडखोरांशी ऐतिहासिक शांतता करार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशातच नागा संघटनेचा प्रमुख किलो किलोन्सरचा पुत्र बोहोतो किबा याने आपल्या लग्नात चक्क हातात रायफल घेतल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे बोहोतो किबासोबत त्याच्या नववधूनेसुद्धा हातात बंदूक घेतल्याचे समोर आले आहे. ही दृश्ये पाहून … Read more

व्यापारी कुटुंबातील तिघांची आत्महत्या

विरुधुनगर :- दक्षिण तामिळनाडूमधील पेरियावाकुलम येथे व्यापारी कुटुंबातील व्यावसायिक त्याची पत्नी व मुलाने विषारी पदार्थ खाऊन आत्महत्या केली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एन इनबामूर्ती (६९) त्यांचा मुलगा एन कन्नन (४०) गाेदामात मृतावस्थेत आढळून आले. पत्नी आई थिलागावती (६१) बेशुद्धावस्थेत आढळून आले. घटनेच्या वेळी कन्ननची पत्नी व मुलगा घराबाहेर हाेते. कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. … Read more

महाशिवआघाडीचे स्वप्न धूसर !

मुंबई :- राज्यात महाशिवआघाडीचे स्वप्न धूसर झाले आहे. राज्यपालांनी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी दिलेली मुदत संपली असून आता पुढे काय हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्रापुढे आहे. महाराष्ट्रावर सद्य:परिस्थितीत राष्ट्रपती राजवटीचे सावट आहे, यात कोणाचेही दुमत नाही. तरीही शिवसेनेला अजूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं पाठिंब्याचं पत्र येईल आणि आपण सत्ता स्थापनेचा दावा करू अशी आशा आहे. शिवसेनेने राज्यपाला सत्ता … Read more

हिंदू विद्यार्थिनी हत्येप्रकरणी मारेकऱ्यांच्या अटकेची मागणी

लाहाेर पाकिस्तानात हिंदू विद्यार्थीनीच्या हत्ये प्रकरणातील आराेपींना अटक करण्याची मागणी रविवारी मानवी हक्क कार्यकर्त्यांनी केली आहे. या प्रकरणात निमृता कुमारीवर अत्याचार झाला हाेता. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. निमृताच्या उत्तरीय तपासणीनंतर ही बाब स्पष्ट झाली आहे. निमृताचा मृतदेह १६ सप्टेंबर राेजी लरकानामध्ये बेनझीर भुत्ताे वैद्यकीय विद्यापीठात विद्यार्थीनी वसतिगृहात आढळून आला हाेता. निमृता दंतवैद्यकीयची पदवीची अंतिम … Read more

सत्ताधारी भारतीय जनता पक्षात मतभेद !

चिक्कमंगळुरू :- कर्नाटकातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षात मतभेद निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कतील यांनी हे वृत्त फेटाळले आहे. रविवारी त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्यात आणि मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. कतील यांनी पत्रकारांना सांगितले की, माझ्यात आणि येडियुरप्पा यांच्यातील संबंध खूप चांगले आहेत. विरोधी पक्ष आमच्यात … Read more

सावधान ! भारतात साधू-संतांच्या वेशात फिरत आहेत पाकचे एजंट

दिल्ली : देशात आध्यात्मिक गुरू किंवा साधू-संतांच्या वेशात पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे एजंट मोकाट फिरत असल्याची धक्कादायक माहिती रविवारी उजेडात आली आहे. या पार्श्वभूमीवर, समाजातील या बनावट नकली साधूंपासून सावध राहण्याचा इशारा भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी दिला आहे. साध्याभोळेपणाचा आव आणत काही पाकिस्तानी गुप्तचर हेर भारतात दाखल झाल्याचे ठोस वृत्त आहे. त्यांच्याद्वारे सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांची … Read more

‘त्या’ प्रकरणी सोनी टीव्ही पाठोपाठ अमिताभ बच्चन यांनीही मागितली माफी

मुंबई : मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचलनाखाली सध्या सुरू असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ (केबीसी) सीझन ११ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनादर केल्याप्रकरणी शनिवारी बच्चन यांनी ट्विटरवर माफी मागितली.  केबीसीच्या ६ नोव्हेंबरच्या भागामध्ये शहेदा चंद्रन या स्पर्धकाला असा प्रश्न विचारण्यात आला की, यापैकी कोणते राज्यकर्ते मोगल सम्राट औरंगजेब यांच्या काळातील आहेत. पर्याय असे दिले होते … Read more

भारतात भय, कटुता, द्वेष, नकारात्मकता यांना स्थान नाही!

नवी दिल्ली : अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. आजचा दिवस जुनी कटुता विसरून एकजुटीने वाटचाल करण्याचा दिवस आहे.  नव्या भारतात भय, कटुता, द्वेष, नकारात्मकता यांना स्थान नाही. देशातील प्रत्येक नागरिकाला आता राष्ट्रनिर्माणाची जबाबदारी घेऊन पुढे जायचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. मोदी म्हणाले की, भारत जगातील सर्वात … Read more

पुरुषाच्या वेशात तिने अल्पवयीन मुलींचे सेक्स टॉय वापरत केले लैंगिक शोषण

विजयवाडा-  अल्पवयीन मुलींना पुरुषाचा वेश बनवून,  मुलींशी मैत्री करून,  मुलींना आमिष दाखवून शरीर संबंध बनवण्यासाठी बळजबरी करून लैगिक शोषण केल्याप्रकारणी ३२ वर्षीय महिलेविरोधात पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही धक्कादायक  घटना आंध्र प्रदेशातील विजयवाडामध्ये घडली आहे. अधिक माहिती अशी की,  प्रकाशममध्ये जिल्ह्यात एका १७ वर्षीय मुलीने पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. कृष्ण किशोर … Read more

भाजप माझे भगवेकरण करण्याच्या प्रयत्नात, पण मी त्यांच्या जाळ्यात अडकणार नाही !

चेन्नई : सत्तारूढ भाजप माझे भगवेकरण करण्याचा प्रयत्न  केला जात आहे, असा खळबळजनक आरोप तामिळी सुपरस्टार रजनीकांत यांनी शुक्रवारी केला आहे.  भाजपच्या जाळ्यात मी अडकणार नाही, असेही त्यांनी ठासून सांगितले.  ज्येष्ठ अभिनेते कमल हसन आणि रजनीकांत यांनी चेन्नई येथे राज कमल फिल्म्स इंटरनॅशनलच्या नव्या कार्यालयात दिवंगत दिग्दर्शक के. बालाचंदर यांच्या प्रतिमेचे अनावरण केले.  त्यानंतर रजनीकांत म्हणाले की, काही … Read more

भाजप सोडून या 5 पक्षांचा लोकसभा निवडणूक खर्च जाहीर, काँग्रेस- ८२० कोटी, राष्ट्रवादी-..

नवी दिल्ली : चालू वर्षात लोकसभा निवडणूक व त्यासोबत झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसने ८२० कोटी रुपये खर्च केले. निवडणुकीदरम्यान जमा केलेल्या ८५६ कोटींहून अधिक निधीतून हा खर्च करण्यात आल्याची माहिती काँग्रेसने निवडणूक आयोगाला दिली आहे. तसेच  राष्ट्रीय राजकीय पक्षांनी सादर केलेल्या अहवालानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने ७२.३० कोटी रुपये, तृणमूल काँग्रेसने ८३.६० कोटी रुपये, … Read more