मुलींची सतत छेड काढतो, पाठलाग करतो म्हणून आरएसएसच्या कार्यकर्त्याचा खून !

लखनऊ | मुलींची सतत छेड काढतो, पाठलाग करतो म्हणून आरएसएसच्या कार्यकर्त्याचा शनिवारी उत्तर प्रदेशातील करवाडा गावात खून करण्यात आला. मुजफ्फरनगरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अभिषेक यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी पंकज यांचा खून केल्याचे कबूल केले आहे. पंकज शनिवारी घरातून मोटारसायकलने त्याचा मित्र सोनूसोबत जात असताना त्याला मध्येच कॉल आला. पंकज घरी आला नाही म्हणून त्यांच्या … Read more

‘दूरदर्शन’ ला ६० वर्षे पूर्ण

दिल्ली : एकावेळी देशातील घराघरामध्ये आपली जागा निर्माण करणाऱ्या दूरदर्शनला रविवारी ६० वर्षे पूर्ण झाली. या औचित्यावर अनेकांनी सोशल माध्यमांवर दूरदर्शनच्या सुवर्णकाळातील विविध आठवणींना उजाळा दिला. महाभारत, हम लोग, फौजी आणि मालगुडी डेजसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांद्वारे दूरदर्शनने लोकांच्या मनात आपला वेगळा कप्पा तयार केला होता. तर बदलत्या काळानुसार दूरदर्शननेदेखील आपली कात टाकत नवीन युगाशी जुळवून घेतले … Read more

…तर पाकचे तुकडे!

सूरत : ‘पाकने दहशतवादाला प्रोत्साहन देणे बंद केले नाही, तर त्याचे तुकडे होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही,’ असा निर्वाणीचा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी भारताविरोधात कुरापती करणाऱ्या पाकला दिला. ‘पाकच्या लोकांनी नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला, तर भारतीय लष्कर सज्ज आहे. आम्ही त्यांना परत जाऊ देणार नाही,’ असे ते म्हणालेत. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या … Read more

मान्सूनच्या वेळापत्रकात बदल?

दिल्ली : हवामानाचे देशातील बदलते स्वरूप पाहून सरकारने मान्सून सक्रिय होण्याच्या (१ जून) व तो परत जाण्याच्या (१ सप्टेंबर) तारखांत बदल करण्याच्या मुद्यावर गांभीर्याने विचार सुरू केला आहे. नैऋत्य मोसमी वारे सक्रिय होण्याच्या व ते परत जाण्याच्या तारखांची समिक्षा करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या गाडगीळ समितीने यासंबंधी सकारात्मक शिफारस केल्यास पुढील वर्षापासून मान्सूनच्या वेळापत्रकांत योग्य तो … Read more

अन्यथा पी. चिदंबरम यांच्यासारखी तुमचीही अवस्था होईल

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या नेत्यांत आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर देशात सुपर इमर्जन्सीसारखी स्थिती लादल्याचा आरोप केला आहे. त्यावर भाजपने पलटवार करताना म्हटले की, सुपर इमर्जन्सी तर पश्चिम बंगालमध्ये आहे. तेथे ‘जय श्रीराम’ ही घोषणा दिल्यानंतर तुरुंगात डांबले जाते. दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील बलिया येथील … Read more

एकाच दुकानातून दूध आणि चिकन विकण्यास भाजपचा विरोध

भोपाळ: मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारने एकाच दुकानातून गाईचे दूध व कडकनाथ कोंबड्याचे मांस व अंडी विकण्याची योजना सुरू केली आहे. सरकारी पार्लरमधून मिळणारे चिकन व गाईचे दूध यांच्या शुद्धतेची १०० टक्के हमी आहे, असा सरकारचा दावा आहे. सरकारच्या वतीने पहिले दुकान भोपाळमधील नेहरूनगर भागात सुरू करण्यात आले आहे. परंतु या योजनेवर भाजपने आक्षेप घेतला आहे. … Read more

सरकारी नोकरीत ८२ टक्के आरक्षण !

छत्तीसगड :- राज्यातील सत्ताधारी काँग्रेस सरकारने नोकरीतील आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून ८२ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, कोर्टाने सरकारला १० दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. राज्य सरकारने चार सप्टेंबर रोजी एक वटहुकूम जारी केला. ‘छत्तीसगड लोकसेवा (अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय आरक्षण) दुरुस्ती वटहुकूम २०१९’नुसार … Read more

सोशल मीडिया प्रोफाईल ‘आधार’शी जोडण आवश्यक

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी एका प्रकरणात सुनावणी करताना फेसबुक, व्हॉट्सॲप, गुगल, यू-ट्यूब आदी समाज माध्यमांवरील सर्वच व्यक्तींचे प्रोफाईल ‘आधार’शी संलग्नित करण्याच्या मुद्यावर तातडीने निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली. या प्रकरणी मद्रास, मुंबई व मध्य प्रदेश हायकोर्टांत ४ वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. तामिळनाडू सरकारने बोगस बातम्या व दहशतवादाशी संबंधित सामग्रीचा प्रसार रोखण्यासाठी सोशल … Read more

मुख्यमंत्र्यासह मंत्र्यांचा आयकर सरकारी खजिन्यातून !

लखनौ : उत्तर प्रदेशात मागील ४० वर्षांपासून मंत्र्यांचा प्राप्तिकर सरकारी तिजोरीतून भरला जात असल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह त्यांचे सर्वच मंत्री या कायद्याचा लाभ घेताहेत; पण कोणताच मंत्री पुढे येऊन हे मान्य करायला तयार नाही. विरोधी बाकावरील सप व बसपनेही या कायद्याविषयी कानावर हात ठेवलेत, हे विशेष. तत्कालीन मुख्यमंत्री विश्वनाथ … Read more

पाऊस थांबावा म्हणून चक्क बेडकांचा घटस्फोट!

भोपाळ : चांगल्या पावसासाठी दुष्काळग्रस्त भागात बेडकांचा विवाह लावल्याचे तुम्ही ऐकले, पाहिले असेलच; परंतु अतिवृष्टीमुळे हवालदिल झाल्याने बेडकांचा कायदेशीर घटस्फोट करण्यात आल्याची विचित्र घटना बहुधा प्रथमच घडली आहे.   मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये सुमारे दोन महिन्यांपूर्वी बेडकांचा विवाह करण्यात आला होता. इंद्रपुरी परिसरातील तुरंत महादेव मंदिरात ओम शिवशक्ती मंडळाच्या सदस्यांनी वरुणदेवतेला प्रसन्न करण्यासाठी मातीच्या बेडकाची जोडी … Read more

तरुणाच्या मृत्यूनंतर लावले सलाईन!

झासरगुडा : विष पिऊन आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या मृत्यूनंतर त्याला परिचारीकेने सलाईन लावल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. रुग्णालय प्रशासनाने सलाईन लावेपर्यंत तरुण जिवंत होता अशी सारवासारव केली आहे. आरोग्य मंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. झासरगुडा जिल्ह्यातील लाईखेरा ब्लॉकमध्ये मोडणाऱ्या जलीबहाल गावात रहाणारा खेत्रामणि किशन (३०) याने विष प्राशन केले. त्याला कुटुंबियांनी तातडीने … Read more

तेजस नौदलात सामील होण्यासाठी सज्ज

नवी दिल्ली : संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान तेजसच्या नौदलासाठीच्या आवृत्तीने अरेस्ट लँडिंगची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली. अरेस्ट लँडिंगची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण करणे, हे तेजसचे नौदलात सामील होण्याच्या दिशेने मोठे यश आहे.  जमिनीच्या तुलनेत विमानवाहू जहाजांवरील रनवे म्हणजेच धावपट्टी छोटी असते. या छोट्या धावपट्टीवर उतरल्यानंतर झटका टाळून विमानाचा वेग तत्काळ कमी करण्यासाठी विमानाच्या मागील … Read more

पेटीएमला सहन करावा लागला इतक्या कोटींचा तोटा!

नवी दिल्ली : गेल्या आर्थिक वर्षामध्ये पेटीएमला मोठा तोटा सहन करावा लागला. त्यांचा तोटा वाढून १६५ टक्के झाला होता. याचा अर्थ दररोज कंपनीला ११ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा स्वीकारावा लागला. या काळात कंपनीच्या उत्पन्नात वाढही झाली.डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात पेटीएमला गुगलपे व फोनपे यांच्याशी मोठा तीव्र संघर्ष करावा लागला. पेटीएमची पालक कंपनी असलेल्या वन ९७ कम्युनिकेशन्सला … Read more

आयफोन झाला २७ हजारांनी स्वस्त !

नवी दिल्ली : जगविख्यात स्मार्टफोन उत्पादक ॲपल कंपनीने बहुप्रतीक्षित आयफोन ११ सीरिजमधील आयफोन ११, आयफोन११प्रो आणि आयफोन ११ प्रो मॅक्स हे तीन फोन मंगळवारी सादर केले. नवीन आयफोन लाँच केल्यानंतर कंपनी त्यांच्या जुन्या आयफोनच्या किमतीत कपात करत असते. त्यानुसार गेल्या वर्षी लाँच झालेल्या आयफोन एक्सआरची किंमत तब्बल २७ हजारांनी घटवण्यात आली आहे. आयफोन११ सीरिज लाँच … Read more

भारत दहशतवादाच्या समस्येचा कणखरपणे सामना करतोय – पंतप्रधान मोदी

मथुरा : दहशतवाद एक वैश्विक समस्या बनली असून तिने जणूकाही विचारसरणीचे रूप धारण केले आहे. अशातच आमचा शेजारी देश (पाकिस्तान) दहशतवादाला पोसत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली आहे. भारत दहशतवादाच्या समस्येचा कणखरपणे सामना करीत असून, भविष्यातही करणार असल्याचे त्यांनी ठणकाविले आहे. उत्तरप्रदेशातील पशुधन रोग निर्मूलन कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, … Read more

मुलाने गाडी चालवल्यास २५ हजाराचा दंड भरावा लागेल म्हणून दांम्पत्याने केले हे कृत्य

आग्रा: नवीन मोटार वाहन नियमाच्या दंडाच्या रक्कमेची नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. आग्रा शहरातील एका दांम्पत्याने अल्पवयीन मुलाने गाडी चालवल्यास २५ हजाराचा दंड भरावा लागेल म्हणून त्याला चक्क खोलीत कोंडल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी घरी येऊन मुलाची सुटका केली आहे. आग्य्रातील एतमादुद्दौलाच्या शाहदरा परिसरातील धरम सिंह यांनी १२ ऑगस्टला एक नवीन गाडी खरेदी केली … Read more

तिसऱ्या लग्नासाठी मुलगी शोधणाऱ्या पतीला दोन्ही बायकांनी शिकविली अद्दल !

कोईम्बतूर : तिसऱ्या लग्नासाठी मुलीचा शोध घेणाऱ्या पत्नीला दोन्ही पत्नींनी चांगलाच चोप दिल्याची घटना समोर आली आहे. ही घटना तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये घडली आहे. दरम्यान, तो व्यक्ती लग्नानंतर पत्नीला हुड्यांची मागणी करून त्रास देत होता आणि न दिल्यास त्यांना मारहाण करत असे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत. सूलूरमधील नेहरू नगरमध्ये राहणारा एस. अरंगन उर्फ दिनेश राहतो … Read more

सर्वोच्च न्यायालयाने धर्मांतर करणाऱ्या तरुणाला आयुष्यभरासाठी दिली हि सजा…

नवी दिल्ली : हिंदू तरुणीशी विवाह केल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी कुटुंबात स्विकार करावा यासाठी धर्मांतर करणाऱ्या तरुणाविषयी शंका घेत पित्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने समाज व्यवस्था आंतरजातीय किंवा आंतरधर्मिय विवाहाविरोधात नाही परंतू तरुणाने मनापासून तरुणीचा स्विकार केला असेल तर तरुणीच्या कुटुंबियांनीही त्याला स्विकारायला हवे असा सल्ला देत धर्मांतर करणाऱ्या तरुणाला आयुष्याभरासाठी सुयोग्य पती बन … Read more