इंदोरीकरांवरील गुन्हा मागे न घेतल्यास साधू, संत रस्त्यावर…

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :   घातक रूढी, परंपरांवर आसूड ओढून समाजजागृतीचे काम करणारे निवृत्ती महराज देशमुख यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा तत्काळ मागे घेण्यात यावा, अन्यथा सर्व साधु, संत, वारकरी संप्रदायातील लोक व सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा महंत योगी केशवबाबा चौधरी वीरगावकर यांनी दिला आहे. वीरगावकर यांनी तहसीलदार मुकेश … Read more

सावधानतेने वापरा हॉटेल व लॉज सुविधा!

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : कोरोनासोबत जगताना अनेक अत्यावश्यक बाबी पुढच्या काळात कराव्या लागणार आहेत. कामांसाठी, व्यवसायासाठी व शिक्षण प्रशिक्षणासाठी किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवास व अनुषंगिक हॉटेल व लॉज सुविधा वापरणे अनिवार्य ठरते. अशावेळी आता पूर्वीसारखे बिनधास्त जगणे मात्र असणार नाही. हॉटेल व्यावसायिकांना काही अटी व शर्तीवर मर्यादित स्वरूपात हॉटेल सुरू करायला परवानगी मिळाली … Read more

माजी आमदार विजय औटींची शिवसेनेतून हकालपट्टी करा

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 :  गेल्या वर्षी आमदार विजय औटींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मेळावा संपल्यानंतर ठाकरेंच्या वाहनांच्या ताफ्यावर औटी समर्थकांनीच दगडफेक केली होती, असा गौप्यस्फोट शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या व पुन्हा शिवबंधनात अडकलेल्या पाच नगरसेवकांसह महिला आघाडी तालुकाप्रमुख उमा बोरूडेंनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर औटींनी पक्षाकडे पाठ फिरवली. पक्ष संघटनेचा उपयोग … Read more

पारनेर नगरसेवकांबद्दल अजित पवारांचा गौप्यस्फोट ! म्हणाले निलेश लंके यांनी….

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : पारनेरच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत जाऊन पुन्हा शिवसेनेत घरवापसी केली,या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गौप्यस्फोट केला आहे. पक्षप्रवेशानंतर ते नगरसेवक सेनेचे असल्याचं समजलं, असे स्पष्टीकरणच अजितदादांनी दिले आहे. अजित पवार यांना आज पारनेरमधील पाच नगरसेवकांच्या प्रवेशासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला. “मी त्या दिवशी बारामतीत होतो. गर्दीत मी सगळ्यांना … Read more

ब्रेकिंग : महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचा कोरोना रिपोर्ट आला… वाचा सविस्तर बातमी

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्या परिवारासह कार्यकर्त्याचा जीव भांड्यात पडला आहे. राज्याचे महसुलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या मुंबईच्या शासकीय निवासस्थानी असलेल्या टेलिफोन ऑपरेटरला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर एक दक्षता म्हणून ना. थोरात यांनी स्वत:हून होमक्वारंटाईन करून घेतले होते. … Read more

नाशिक -पुणे रेल्वेमार्गासाठी ‘ह्या’ गावांत केले जाणार भूसंपादन

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : बहुप्रतीक्षित नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्याला जोडणार्‍या भारतीय रेल्वे मार्गास केंद्राने हिरवा कंदील दाखवला आहे. याकरिता लागणारी जमीन संपादन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाली असून यासंदर्भात महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनने अहमदनगर जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिले असून माहिती मागवली आहे. या रेल्वे मार्गासाठी जमीन संपादित करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील गावांची यादी … Read more

पारनेर मधील महाविकास आघाडीची धुरा आमदार निलेश लंके यांच्याकडेच !

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :   पारनेर नगरपंचायतीतील त्या पाच नगरसेवकांनी पुन्हा बुधवारी मातोश्रीवर शिवबंधन बांधले. विशेष म्हणजे आमदार निलेश लंके यांनी पाच जणांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नेले. यापुढे हे सर्व नगरसेवक आ. लंके यांच्याच नेतृत्वाखाली काम करतील. त्याचबरोबर पारनेर तालुक्यामधील महाविकास आघाडीची धुरा सुद्धा त्यांच्यावरच असेल अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आ. निलेश लंके … Read more

शिवसेना नगरसेवकांनी भाजपमध्ये यावे त्यांना पदे देऊ, सन्मान आणि सत्ताही देऊ !

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  राज्यात स्वार्थ पोटी झालेली आघाडी जनतेला मान्य नाही. यामुळे जनतेला मान्य नसलेल्या आघाडीमुळे येणाऱ्या निवडणुकीत त्याचे परिणाम दिसेल, असा विश्वास खासदार डॉ. सुजय विखे पा.यांनी व्यक्त केला. यावेळी पारनेर राजकीय घडामोडीवर विचारले असता, ते पुढे म्हणाले शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सेना स्वाभिमानी म्हटली जात होती. अजूनही शिवसेनावाल्याकडे … Read more

महाजॉब्स’च्या संकल्पने मागे आहे अहमदनगर मधील ‘हा’ तरुण !

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. राज्यातील मराठी तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. लोकार्पणाच्या पहिल्याच चार तासात या संकेतस्थळावर  सुमारे १३ हजार ३०० पेक्षा अधिक नोकरी इच्छुकांनी तर … Read more

पारनेरचे ‘ते’ नगरसेवक पुन्हा येणार शिवसेनेत ; झाले असे काही की…  

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  पारनेरमधील ५ नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर खूप राजकीय हालचालींना वेग आला. स्वतः उद्धव ठाकरे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता या गेलेल्या शिवसेना नगरसेवकांची घरवापसी होणार आहे. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांच्या मुत्सद्देगिरीला यश आलं आहे. राष्ट्रवादीत गेलेले नगरसेवक आता … Read more

सैराटफेम नागराज मंजुळेची बायको करतेय दुसऱ्याच्या घरी धुणी-भांडी

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :मराठी चित्रपट सैराट हा चित्रपट माहित नाही असा क्वचितच सापडेल. या चित्रपटाने व त्यातील गाण्याने लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना वेड लावले. या चित्रपटाने शंभर कोटींची कमाई करून मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. नागराज मंजुळे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. सैराटसह नागराजच्या पिस्तुल्या ही शॉर्टफिल्म आणि फँड्री चित्रपटही रसिकांनी अक्षरशः … Read more

थोडंसं मनातलं : कोरोना” आणि आता ‘निसर्ग वादळ’ देव अजुन किती परीक्षा पहाणार? … ॲड शिवाजी कराळे 

नमस्कार मित्रांनो  कोरोना नावाचा व्हायरस संपूर्ण देशभर थैमान घालतोय. देशभर अनेक लोक कोरोना संसर्गित असल्याचे समोर आले आहे. तसेच आपला महाराष्ट्र सुद्धा जवळपास दोन लाखाचे आसपास गेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांसाठी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वास्तविक ती संख्या कमी होईल अशी अपेक्षा होती. कोरोना प्रदुर्भाव टाळण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन, महापालिका प्रशासन … Read more

शरद पवार म्हणाले पारनेरमध्ये नगरसेवक फोडल्याचा मुद्दा….

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :  सध्या राज्यात पारनेर मधील नगरसेवकांचा शिवसेनेतून राष्टवादी कॉंग्रेस मध्ये केलेला प्रवेश चांगलाच गाजत आहे, याबबत शरद पवार यांनी आपले मत मांडले आहे. पारनेर हा फार लहान प्रश्न आहे. तो काही राज्यस्तरावर परिणाम करणार प्रश्न नाही, असं विधान शरद पवार यांनी पुण्यात केले आहे. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री उद्धव … Read more

लागा तयारीला : राज्यात पोलीस खात्यात १० हजार जागा भरणार

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा शहरी व ग्रामीण तरुणांना होईल, त्यांना पोलीस दलात सेवेची संधी मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नागपूरमधील काटोल येथे राज्य राखीव … Read more

शरद पवारांच्या भेटीनंतर राऊत म्हणतात, राजकारणात लवकरच खळबळ उडणार

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :मध्यंतरी झालेले काँग्रेस व शिवसेनेचे वाद, तसेच राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीवेळी झालेली काँग्रेसची धुसफूस आणि आता मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी 10 पोलीस उपायुक्तांच्या केलेल्या अंतर्गत बदल्यांना राज्य शासनाने रविवारी दिलेली स्थगिती यामुळे या सरकारमध्ये धुसफूस सुरु असल्याचे चीत्र निर्माण झाले आहे. आणि आता पारनेरमध्ये शिवसेनेचे पाच नगरसेवक … Read more

विधान परिषदेवर संधी मिळाली, तर सोने करून दाखवेन

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : विधान परिषदेसाठी शरद पवार यांनी संधी दिली, तर मी त्या संधीचे सोने करून दाखवेन. माझ्या आयुष्यातील तो टर्निंग पॉइंट असेल, असे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सलगर यांनी आमदार नीलेश लंके यांच्या कार्यालयास भेट दिली. सत्कारानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विधान परिषदेत … Read more

पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक परत पाठवा, उद्धव ठाकरे यांचा अजित पवारांना निरोप !

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : पारनेर नागरपंचायतीतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेले पक्ष प्रवेश उद्धव ठाकरेंना फार रुचलेले दिसत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी वाढू नये यासाठी शिवसेनेने फुटलेल्या नगरसेवकांना परत पाठवण्याचा निरोप अजित पवार यांना दिल्याची माहिती मिळत आहे.आता राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  पारनेर तालुक्यात शिवसेनेला रामराम … Read more

‘ही’महाआघाडी सरकारची बनवेगेरी

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : पारनेर नगरपंचायतीचे शिवसेनेचे ५ नगरसेवकांसह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांना जर राष्ट्रवादीत घेतले नसते तर ते भाजपच्या वाटेवर होते. असा खुलासा आ. लंके यांनी पक्षश्रेष्ठी व माध्यमांकडे केला आहे. तो चुकीचा आहे. ही महाआघाडी सरकारची बनवेगेरी आहे. असा आरोप तालुकाध्यक्ष वसंत चेडे यांनी केला आहे. सध्या राज्यात शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस … Read more