Ahmednagar Crime : तू माझ्याशी का बोलल नाहीस? असे म्हणून अल्पवयीन मुलीची छेड काढून तिला मारहाण करत, भुसावळ येथील एका तरुणाने पीडित अल्पवयीन मुलीच्या हातावर कटर ब्लेडच्या सहाय्याने वार करून जखमी जीवे मारण्याची धमकी दिली.
ही घटना काष्टी येथे शुक्रवारी (दि.१) संध्याकाळी घडली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादी वरून बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास श्रीगोंदा पोलिस करत आहेत.
या बाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पीडित मुलगी ही काष्टी येथील रहिवासी असून, माध्यमिक शाळेत शिक्षण घेत आहे. शाळेचा दिलेला अभ्यास करण्यासाठी मैत्रिणीच्या घरी जात असताना
काष्टी येथे एका दुकानामध्ये कामावर असलेल्या भुसावळ येथील तरुणाने पीडित मुलीला रस्त्यात अडवून तिला तु माझ्याशी का बोलत नाहीस? असे म्हणुन तिचा हात धरुन तिस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत.
तिला मारहाण करत तिचा हात पकडून कटर ब्लेडच्या सहाय्याने वार करून तिला जखमी करत जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने काकाच्या घरी धाव घेतली असता,
त्या तरुणाने तिला पुन्हा दमदाटी केल्याची घटना घडली. दरम्यान याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.