लोकसभा निवडणुकीत फायदा घेण्यासाठीच मोदींनी बालाकोटवर एअर स्ट्राईक केली !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-  पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सॲप ‘चॅटलिक’वरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ‘जागतिक समुदायाला भारताच्या विवेकहीन लष्करी अजेंड्याला रोखावे लागेल,

अन्यथा मोदींच्या नेतृत्वातील सरकार संपूर्ण क्षेत्राला नियंत्रण मिळवणे अशक्य होईल अशा संघर्षात लोटेल’, असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत फायदा घेण्यासाठीच मोदींनी बालाकोटवर एअर स्ट्राईक केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

मुंबई पोलिसांनी टीव्ही रेटिंग घोटाळ्याप्रकरणी ‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांचे व्हॉट्सॲपवरील संभाषण जारी केले आहे. या संभाषणात २०१९ च्या निवडणुकीत कथित लाभ मिळवण्यासाठी बालाकोटवर एअर स्ट्राईक करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बालाकोटवरील प्रत्यक्ष हल्ल्यापूर्वीच गोस्वामींना या कारवाईची माहिती मिळाल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

इम्रान खान यांनी सोमवारी एका ट्विटद्वारे याप्रकरणी मोदींवर निशाणा साधला. ‘भारतीय पत्रकाराच्या संभाषणाविषयी झालेल्या खुलाशामुळे मोदी सरकार व भारतीय माध्यमांतील अपवित्र आघाडी उजेडात आली आहे. या आघाडीचा वापर निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी तथा संपूर्ण क्षेत्राला अस्थिर करण्यासाठी करण्यात आला’, असे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe