अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- हॉटेल चालकाला मारहाण केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक मनोज दुल्लमसह सहा जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री दोन गटामध्ये हाणामारीच्या घटना घडल्या होत्या.
याप्रकरणी परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याबाबत थोडक्यात माहिती अशी कि, आरोपींनी शहरातील पाईपलाईन रोडवरील रूचिरा हॉटेलमध्ये येत उधार जेवण दिले नाही म्हणून वाघमारे यांना पाणी पिण्याचा जग, काचेचा ग्लास व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हॉटेलचे चालक रवींद्र विश्वनाथ वाघमारे (वय 46 रा. गुलमोहर रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनोज दुल्लम, महेश म्याना, दीपक विलास सगम, राकेश व्यंकटेश पासकंठी व दोन अनोळखी इसम (सर्व रा. श्रमिकनगर, सावेडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहे. दुल्लम गटाचे राजेश व्यकंटेश पासकंठी (वय 33 रा. श्रमिकनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रवींद्र वाघमारे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मावस भावाचे हॉटेलचे बिल भरण्याच्या कारणावरून वाघमारे याने काचेची दारूची बाटली माझ्या डोक्यात मारून जखमी केले असल्याचे पासकंठी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस नाईक अमोल आव्हाड करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम