निंबळकच्या पाणी प्रश्नाबाबत आमदार लंकेचे राज्यमंत्री अदिती तटकरेंना साकडं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- नगर तालुक्यातील निंबळक येथील पाणीसाठा वाढवून मिळावा, या मागणीसाठी पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी राज्यमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन चर्चा केली.

एमआयडीसीच्या अधिकार्‍यांसमवेत पुढील आठवड्यात चर्चा करून पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू, असे आश्वासन मंत्री तटकरे यांनी दिले.

निंबळक येथे जवळपास 20 हजारांच्या पुढे लोकवस्ती आहे. मात्र या ठिकाणी सध्याचा पाणीपुरवठा अतिशय कमी स्वरूपाचा आहे. त्यामुळे नागरिकांना 10 ते 15 दिवसांनी पाणी मिळते.

जलवाहिनी नादुरूस्त होणे, विजेचा प्रश्न निर्माण झाला तर 20 दिवस पाणी मिळत नाही.त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. यामुळे याठिकाणी सातत्याने पाणीटंचाई निर्माण होत असते.

दरम्यान याप्रकरणी सरपंच प्रियंका लामखडे यांनी आ. लंके यांच्याकडे पाणी वाढवून मिळण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. या पत्राचा आधार घेत आ. लंके अजय लामखडे यांनी राज्यमंत्री तटकरे यांच्याबरोबर चर्चा केली.

त्यांनी पुढील आठवड्यात एमआयडीसीच्या अधिकार्‍यांसमवेत चर्चा करून पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे येथील पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे.