अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढला आहे. याला अटकाव करण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे.
मात्र तरीही कोरोनाची आकडेवारी आटोक्यात येत नसल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे.
दरम्यान नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, आतापर्यंत किमान वीस ग्रामस्थांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या गावात किमान दोनशे ते तीनशे कोरोनाचे संशयित रुग्ण आहेत.
परंतु ग्रामस्थ याबाबत कोरोना चाचणी न करताच खासगी उपचार घेत आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तुटत नाही. गावात प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात कोरोना विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे; परंतु याकडे ग्रामस्थांनी कानाडोळा केला आहे.
फक्त दोनच रुग्ण या ठिकाणी आहेत. त्यामुळे कोरोना ग्राम सुरक्षा समितीची नुकतीच बैठक झाली व त्यामध्ये एकमताने पिंपळगाव माळवीत चार मे पासून बारा मे पर्यंत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.
या काळात फक्त अत्यावश्यक वैद्यकीय सेवा, मेडिकल, दूध संस्था चालू राहतील व इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|