मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ दोन जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन घोषित

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-  राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक बनली आहे.

याच पार्शवभूमीवर राज्यामध्ये लॉकडाऊन होणार का असा सवाल उपस्थित होत असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील दोन महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

यामध्ये कोल्हापूर व सांगली हे दोन जिल्हे आहे. कोल्हापुरात 10 दिवसांचा लॉकडाऊन कोल्हापूर जिल्ह्यात वाढती रूग्णसंख्या पाहता उद्यापासून पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

आज सकाळी झालेल्या बैठकीत घेण्यात हा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, जिल्ह्यामध्ये सद्या ऑक्सिजनची गरज वाढत चालली आहे.

रूग्णसंख्या आणखी वाढत राहिली तर ऑक्सिजनची अधिक गरज लागेल. वाढती रूग्णसंख्येची साखळी तोडण्यासाठी उद्या 11 वाजल्यापासून जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे.

सांगलीत 8 दिवसांचा लॉकडाऊन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात 5 मे रोजीच्या मध्यरात्रीपासून 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

प्रशासनाची चर्चा करून जिल्ह्यात 5 मे रोजी मध्यरात्रीपासून 5 दिवसांचा कडक संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|