अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-शीख समाजाचे नववे गुरु श्री तेग बहादूरजी यांची चारशेवी जयंती व महाराष्ट्र दिनानिमित्त घर घर लंगर सेवेच्या वतीने शहरातील कोविड सेंटरमधील रुग्ण, त्यांचे नातेवाईक व गरजूंना मिष्टान्न भोजनचे वाटप करण्यात आले.
घर घर लंगर सेवेच्या सेवादारांनी शहरातील हॉटेल नटराज व जैन पितळे वसतीगृह येथील गुरु अर्जुन देव कोविड केअर सेंटर, डॉन बॉस्को ग्रामीण विकास केंद्र, विविध हॉस्पिटलचे कोविड सेंटर व अमरधाम मधील कर्मचार्यांना प्रसाद रुपात मिष्टान्न भोजन देण्यात आले.
चारशे वर्षांपूर्वी धर्माच्या रक्षणाकरिता आणि काश्मिरी पंडितांचे धर्मांतर होऊ नये, यासाठी गुरू तेग बहादूरजी यांचे दिल्लीच्या चांदणी चौकात मोघल सम्राट औरंगजेबने त्यांना शहीद केले होते. गुरुजींच्या धर्मांतर करण्यास अपयश आल्याने औरंगजेबने कश्मिरी पंडितांचे धर्मांतरण थांबवले.
आज गुरु तेग बहादुर यांना हिंदी चादर या नावाने संबोधले जाते. त्यांच्या शहिद दिनानिमित्त गोड रव्याचा हलवा बनवून वाटप केले जाते. तसेच महाराष्ट्र दिनाचे औचित्यसाधून कोरोना रुग्णांना व गरजूंना मिष्टान्न भोजनचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा यांनी दिली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रितपालसिंह धुप्पाड, किशोर मुनोत, राजेंद्र कंत्रोड, सतीश गंभीर, करण धुप्पड, राजा नारंग, गोविंद खुराणा, नारायण अरोरा, राहुल शर्मा, कैलाश नवलानी, प्रमोद पंतम, पुरुषोत्तम बेट्टी, सनी वधवा,
राहुल शर्मा, राहुल बजाज, प्रशांत मुनोत, राजबीरसिंग संधू, आदित्य छाजेड, सुनील थोरात, सिमर वधवा, मनोज मदान, गोविंद खुराणा, कैलाश ललवानी, टोनी कुकरेजा, मन्नू कुकरेजा आदी लंगर सेवेच्या सर्व सेवेदारांनी परिश्रम घेतले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|