खळबळजनक ! राहुरीतील एका महिलेचा अश्‍लील फोटो सोशलवर व्हायरल

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :-एका महिलेचा अश्‍लील फोटो सोशल मीडियाच्या एका ग्रुपला व्हायरल झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान हा खळबळजनक प्रकार राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी-चेडगाव परिसरात घडला आहे. दरम्यान, ब्राम्हणी परिसरातील एका तरुणाने हा फोटो व्हायरल केल्याची कळते असून घटना घडल्यापासून सदर तरूण गावातून पसार झाला आहे.

त्यामुळे या तरूणावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, ब्राह्मणी-चेडगांव या ग्रामीण भागातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर एका महिलेचा अश्‍लील फोटो व्हायरल झाला. हा फोटो अनेकांनी पाहिल्यामुळे त्याची दिवसभर चर्चा सुरू होती.

ज्याच्याकडून फोटो व्हायरल झाला तो तरुण ब्राह्मणी परिसरातला असून त्याचे ब्राह्मणी परिसरामध्ये महिलांना मेकअपसाठी लागणारे साहित्य विक्रीचे दुकानही असल्याची चर्चा सुरू आहे. ज्या महिलेचा फोटो व्हायरल झाला, त्या महिलेला काही हितचिंतकांनी फोन करून तुमचा फोटो व्हायरल झाला असल्याचे सांगितले.

त्यामुळे तिने तात्काळ ज्याच्याकडून हा फोटो व्हायरल झाला, त्याला फोटो ताबडतोब डिलीट करण्याचे सांगितले. नंतर त्या युवकाने काही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन हा फोटो त्या ग्रुपमधून डिलीट केला. मात्र, त्यापूर्वीच अनेक तरुणांनी त्या फोटोचे मोबाईलवर स्क्रीनशॉट काढल्याचे समजते.

दरम्यान, त्या तरुणाची लेडीज शॉपी असल्याने अनेक महिला, मुली साहित्य खरेदी करण्यासाठी जातात. अनेकांना तो अश्‍लील भाषेत बोलला होता. हा फोटो व्हायरल करणार्‍या तरुणावर पोलीस काय कारवाई करणार? याकडे ब्राह्मणी-चेडगाव परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News