खुशखबर ! आता Whatsapp वर मिळवा लसीकरण केंद्रांची माहिती

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने संपूर्ण देशात लसीकरण मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.

मात्र अनेकांना लसीकरण कोठे सुरु आहे, याबाबत माहिती नसते. मात्र या काटकटीपासून आता तुमची सुटका होणार आहे.

कारण आता आपल्याला आपल्या जवळील परिसरातील लसीकरण सुरु असलेल्या केंद्राची माहिती घरपोच मिळणार आहे.

आता तुम्ही फेसबुकच्या इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp वर चॅटिंग करुनही जवळच्या लसीकरण केंद्राबाबतची सविस्तर माहिती मिळवू शकणार आहात. पण ही मिळवणार कशी याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

चला तर मग जाणून घेऊया काय आहे प्रक्रिया? :-

  • सर्वप्रथम आपण +919013151515 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करा.
  • त्यानंतर हॅलो किंवा हाय हा मेसेज सेंड करा
  • पुढे तुमचा पिनकोड टाका
  • त्यानंतर तुम्हाला कोड मागितला जाईल , तो सबमिट करावा
  • हे सर्व झाले कि, चॅटबॉटवर आपणास जवळच्या लसीकरण केंद्रांची माहिती उपलब्ध होणार आहे
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe