अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- जगभरात प्रत्येक वर्षी 21 डिसेंबर रोजी विविध देशांकडून ‘आंतरराष्ट्रीय चहा दिवस’ साजरा केला जातो. चहाचं उत्पादन आणि वितरण विकसनशील देशांतील लाखो परिवारांसाठी जगण्याचं मुख्य साधन आहे.
दैनदिन जीवनात चहाचं महत्व, चहाचा व्यापार आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जगभर 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जातो.
ह्या जगात असे लोक क्वचितच आढळतील, ज्यांना चहा पिणे आवडत नाही. चहा पिणे प्रत्येकालाच आवडते. जगभरात दिवसाची सुरुवात एका कप चहाने होते.
अनेक लोक दिवसभर चहाचे बरेच कप रिचवतात. भारतातही प्रत्येक भागात आणि अगदी प्रत्येक नाक्यावर, चहा विक्रेते आणि चहाचे शौकीन दोघेही सहज दिसून येतात.
बर्याच लोकांना बेडवरुण उठल्या उठल्या चहा पिण्याची अर्थात बेड टीची सवय देखील असते. भारतीय लोकांना चहाची तलप मोठ्या प्रमाणावर असते.
मात्र, एका दिवसात जास्तीतजास्त 2 ते 3 कप चहा आपल्यासाठी योग्य असतो. एक कप चहामध्ये जवळपास 20 ते 60 ग्रॅम कॅफिनचे प्रमाण सापडतं, जे आपल्या चहाच्या कपाच्या आकारावर अवलंबून असतं.
चहाचे फायदे ;-
- चहा मध्ये कैफिन आणि टैनिन असतो, जो शरीराला स्फुर्ती प्रदान करतो.
- चहा मध्ये एंटीजन असतात, जे एंटी-बॅक्टेरियल क्षमता प्रदान करतात.
- चहा मध्ये असलेला अमिनो-एसिड डोक्याला शांत व चपळ ठेवण्यास मदत करतो.
- चहा मध्ये असलेला फ्लोराईड हाडांना मजबूत करतो व दातांना कीड लागण्यापासून थांबवतो.
- चहा हे म्हातारपण वाढण्याचा वेग कमी करतो, तसेच शरीर वाढी चे नुकसाना पासून वाचवतो.
- चहा शरीरातील एंटी- ऑक्सिडेन्स इम्युन सिस्टिम व्यवस्थित ठेवतो. आणि खूप साऱ्या आजारांना दूर ठेवतो.
आज चहाचे अनेक प्रकार पडले आहेत. ग्रीन टी तर खूपच प्रसिद्ध होत आहे. ग्रीन टी नियमित पिल्याने वजन कमी झाल्याचा अनेकांचा अनुभव आहे.
चहा पावडरचा प्रसार होण्यापूर्वी गुळाचा चहा सर्वत्र पिला जायचा. गुळाच्या चहामुळे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढते. चयापचय संस्था व्यवस्थित काम करते तसेच गुळाचा चहा हा कफनाशक देखील आहे.
संपूर्ण भारतात दुधाचा चहा सर्रास पिला जातो. दुधामुळे चहात पौष्टिक मूल्यांची वाढ होते. कॅल्शिअम, प्रथिने चांगल्या प्रमाणात शरीराला मिळून शरीराची वाढ होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम