अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत जिल्हा प्रशासनास राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
योजनेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांच्या हस्ते केंद्रीय कृषिराज्यमंत्री चौधरी, राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हा पुरस्कार स्विकारला.
यावेळी योजनेचे नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवाजीराव जगताप उपस्थित होते. या पुरस्कारामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात सन्मानाचा तुरा खोवला गेला आहे.
फेब्रुवारी २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी ही महत्वाकांक्षी योजना कार्यान्वित केली. या योजनेअंतर्गत निर्धारीत निकषानुसार प्रात्र लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रूपये सन्मान निधी देण्यात येतो.
योजनेच्या द्विवर्षपूर्ती निमीत्त उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या देशभरातील राज्य व जिल्हयांना केंद्रीय कृषिमंत्रालयाच्या वतीने पुरस्कार घोषित करण्यात आले होते.
नगर जिल्हा प्रशासनास भौतिक तपासणी संवर्गात देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित झाला होता.नुकताच हा पुरस्काराचे दिल्लीत वितरण करण्यात आले. या पुरस्कारामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात सन्मानाचा तुरा खोवला गेला आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|