शहरातील त्या टोळीवर पोलिसांनी केली मोक्काची कारवाई

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- नगर शहरातील भिस्तबाग चौकातील नयन राजेंद्र तांदळेसह त्याच्या टोळीवर पोलिसांनी मोक्काची कारवाई केली आहे. एलसीबीचे पीआय अनिल कटके यांनी ही माहिती दिली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, 25 डिसेंबर 2020 रोजी या टोळीने संघटितपणे गुन्हा केल्याचे समोर आल्यानंतर या टोळीविरोधात मोक्काचा प्रस्ताव तयार करून तो नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविण्यात आला होता.

एसपी मनोज पाटील यांनी पाठविलेल्या या प्रस्तावाला मंजुरी देत टोळीविरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. सुपा पोलीस ठाणे अंतर्गत 8 आणि तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत तीन असे 11 गुन्हे या टोळीने केल्याचे उघडकीस आल्याचे पीआय कटके यांनी सांगितले.

नयन राजेंद्र तांदळे (रा. भिस्तबाग चौक), विठ्ठल भाऊसाहेब साळवे (रा. झापवाडी, नेवासा), अक्षय बाबासाहेब ठोंबरे (रा. प्रेमदान सावेडी), राहुल अशोक पवार (रा. सुपा, पारनेर) आणि अमोल छगन पोटे (रा. सुपा, पारनेर) अशी मोक्का लागलेल्या आरोपींची नावे आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24