‘ती’ शक्यता खरी ठरली पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात……

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थकांनी मंगळवारी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी गडावर मोठी गर्दी केली होती. कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली होती.

ती आता खरी ठरू पाहता आहे. पोहरादेवी येथील महंत कबिरदास महाराज यांच्यासह १९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

तीन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे जाऊन दर्शन घेतले होतेय. यावेळी राठोड यांच्या मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक पोहरादेवी येथे जमले होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व संपूर्ण प्रशासन कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करत आहेत. मात्र ठाकरे यांचे सहकारी मंत्री असलेल्या राठोड यांनी गर्दी जमवल्यामुळं त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

आता महंतांसह १९ जणांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांच्यावर आता सर्व स्तरातून टीका होत आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe