राहूरी फॅक्टरीतील हा भाग कंटेन्मेंट झोन घोषित

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- राहूरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागातील एका गल्लीत १० कोरोना बाधित रूग्ण सापडल्याने प्रशासनाने हा भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत केला आहे.

प्रसादनगर भागातील एकाच कुटुंबात गुरुवारी सहा कोरोना बाधित रूग्ण सापडले त्यानंतर नगरपालिका प्रशासनाने तातडीने सदर ठिकाणी धाव घेऊन हा भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत करून पत्रे लावून हा भाग पॅक केला.

दरम्यान प्रसादनगर येथील एका कुटुंबात ६ कोरोना रूग्ण सापडल्याने देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्राने आज सकाळी या कंटेन्मेंट झोन भागात रॅपिड कॅम्प घेऊन सुमारे ४६ व्यक्तीची रॅपिड टेस्ट केली.

यामध्ये पुन्हा ४ व्यक्ती कोरोना बाधीत निघाले.त्यामुळे आता भागात एकूण १० कोरोना बाधीत रूग्ण असून या सर्वांना विद्यापीठ येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आण्णासाहेब मासाळ यांनी सांगितले.

या कामी अनिल मुळे व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रसाद नगर भागातील कंटेन्मेंट झोन भागात प्रांताधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार एफ. आर.शेख, गटविकास अधिकारी गोविंद खामकर,

नायब तहसीलदार गणेश तळेकर, पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाघ आदींनी भेट देऊन नगरपालिका प्रशासनास आवश्यक त्या सूचना केल्या .यावेळी नगरसेवक आदिनाथ कराळे, नगरपालिका प्रशासकीय अधिकारी बन्सी वाळके कर्मचारी उपस्थित होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24