अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नुकतेच गांधीजींच्या जन्मदिनीच म्हणजेच २ ऑक्टोबरला आपल्या आगामी ‘गोडसे’ चित्रपटाची घोषणा केली.
मांजरेकर यांनी इन्स्टाग्रामला ‘गोडसे’ चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. मात्र आता यावरून नवा वाद उफाळला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महेश मांजरेकर यांच्यावर सडकून टीका केली आहे.
महेश मांजरेकर आहे तरी कोण? भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचं काय योगदान आहे? केवळ लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी महेश मांजरेकर ही नाटकं करत आहेत, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.
त्यामुळे आता महेश मांजरेकर यांच्यावतीने आव्हाडांच्या टीकेला कोण प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, महेश मांजरेकरांच्या या नव्या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.