वाढलेलं ब्लडप्रेशर कमी करण्यात इतर कुठल्याही मार्गापेक्षा योग अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो, असं नव्या संशोधनात आढळून आलं आहे.
ब्लडप्रेशर किती कमी करता येईल, याचा अभ्यास करण्याकरिता नेहमीच्या औषधांबरोबरच किंवा पर्याय म्हणून ध्यान, योग आणि गाइडेड इमेजरी या पद्धतींचा वापर करण्यात आला. यात योग सर्वांत प्रभावी असल्याचं लक्षात आलं.
या तिन्ही पद्धतींनी मिळून सिस्टॉलिक ब्लडप्रेशर सरासरी ११.५२ एमएम एचजी आणि डायस्टॉलिक ब्लडप्रेशर ६.८३ एमएम एचजीनं कमी होतं, असं आढळलं. या तिन्ही पद्धतीत योग जास्त प्रभावशाली ठरल्याचं लक्षात आलं.
योगामुळे सिस्टॉलिक ब्लडप्रेशर सरासरी १९.०७ एमएम एचजीनं कमी झालं, तर डायस्टॉलिक ब्लडप्रेशर १३.१३ एमएम एचजीनं कमी झाले. योग व ध्यान पद्धतीमुळे सिस्टॉलिक ब्लडप्रेशरमध्ये लक्षणीय घट झाल्याचं दिसून आलं आणि फक्त डायास्टॉलिक ब्लडप्रेशर कमी करण्यात योग महत्त्वाची भूमिका बजावतो, असं लक्षात आलं