आजकाल बदलत्या आहारशैलीमुळे, कामाच्या तणावामुळे आणि जागरणामुळे जाडेपणा वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. वाढलेली जाडी आपल्या सौंदर्याला बाधक ठरते.
अनेक लोक जाडी कमी करण्यासाठी अनेक उपाय योजना करतात अनेक डाएट करतात. परंतु याचा म्हणावसं परिणाम होत नाही. परंतु आता जर आपल्याला जाडी कमी करायची असेल तर मात्र पालक भाजीचा आपल्या आहारात समावेश करा.
पालकमध्ये व्हिटामिन ए,सी,ई, के आणि बी कॉम्पेलक्स मोठ्या प्रमाणात असते. स्वीडनमध्ये झालेल्या एका संशोधनातून असे समोर आले आहे कि, पालकाच्या भाजीचा रस वजन कमी करण्यास आणि जाडी रोखण्यास उपयोगी पडू शकतो.
तसेच पालकाच्या भाजीच्या रसामुळे वजन वाढविणारे अनारोग्यकारक अन्न पदार्थांविषयी नावड निर्माण होते. त्याचबरोबर या रसामुळे वजन उतरण्याचा वेग वाढतो.
स्वीडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ स्वीडन या विद्यापीठात करण्यात आलेल्या प्रयोगातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
लठ्ठ व्यक्तीला सतत काही तरी खावेसे वाटते आणि त्यातल्या त्यात आरोग्याला उपयुक्त नसलेला पण वजन वाढण्यास कारणीभूत ठरणारा आहार घेण्याकडे त्याची प्रवृत्ती असते.
मात्र रोज पालकाचा रस पिणारी व्यक्ती अनारोग्यकारक अन्न पदार्थ टाळू शकते आणि ९५ टक्के इतकी त्याची ही प्रवृत्ती वाढते.
माणसाचे वजन वाढण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आतल्या आत वजन कमी करण्याची एक प्रक्रिया जारी असते. ती वजन कमी करण्याची प्रक्रिया पालकाच्या रसामुळे ४३ टक्क्याने वाढते.