लाईफस्टाईल

Trending News : ह्या देशाला दारुड्यांची भलतीच काळजी ! मोफत ‘कॅब सेवा’ सुरू

Published by
Ahmednagarlive24 Office

Trending News : दारू प्यायल्यानंतर तळीरामांची सर्वात मोठी समस्या म्हणजे सुखरूप घरी जाणे. कारण दारू जरा जास्त झाली की माणूस लटपटू लागतो. त्याला आपल्या पायांवर नीट उभे राहणेही शक्य होत नाही.

मद्यपान करून वाहन चालवण्यावर अनेक देशांमध्ये मज्जाव आहे. अशा परिस्थितीत जास्त मद्यपान करणाऱ्या लोकांचे करायचे काय, यावर इटलीच्या सरकारने एक अनोखी उपाययोजना आखली आहे. इटलीच्या सरकारने अति मद्यपान करणाऱ्या तळीरामांसाठी मोफत ‘कॅब सेवा’ सुरू केली आहे.

इटलीमध्ये जेवढे नाईट क्लब आहेत, त्यांच्या परिसरात ही मोफत कॅब सेवा उपलब्ध असणार आहे. नाईट क्लबमध्ये अतिमद्यपान करून ‘टल्ली’ होणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत सुखरूप सोडण्यासाठी ही कॅब सेवा सुरू करण्यात आली आहे.

सध्या तरी ही कॅब सेवा प्रायोगिक तत्त्वावर येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंतच सुरू असणार आहे. ही अशी योजना आहे की नाईट क्लबमधून मद्यधुंद अवस्थेत बाहेर पडणाऱ्या व्यक्तींची अल्कोहोल टेस्ट जागच्या जागी करण्यात येईल. त्यांनी जर अति मद्यपान केल्याचे आढळून आल्यास त्यांना या विशेष कॅबमधून त्यांच्या घरापर्यंत मोफत सोडण्यात येईल.

‘युरोपियन ट्रान्सपोर्ट सेफ्टी काऊन्सिल’ च्या अहवालानुसार, मद्यपान करून वाहन चालवणे ही इटलीमध्ये एक गंभीर समस्या आहे. सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की इटलीमध्ये मद्यपान करून वाहन चालवण्याची स्वीकार्हता पातळी इतर देशांपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे.

Ahmednagarlive24 Office