अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर शहरातील शिवसेनेतील गटबाजी संपली असे वाटत असतानाच ती पुन्हा नव्याने उफाळून आली आहे.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद लहामगे यांना शिवसेना युवा सेनेचे प्रमुख रवी वाकळे यांनी खुर्ची फेकून मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जीवे मारण्याची धमकी दिल्याने वाकळे यांच्याविरोधात लहामगे यांनी तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. सावेडी उपनगरात कोहीनूर मंगल कार्यालयात सदस्य नोंदणी अभियानाच्या निमित्ताने आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही घटना घडली.
सावेडी उपनगरात झालेल्या या बैठकीत नगरसेवक योगीराज गाडे, मदन आढाव, भाऊ बोरुडे, शिक्षक सेनेचे शिंदेसर, वाहतूक सेनेचे संजय आव्हाड व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved