मुंबई :- एका १४ वर्षीय मुलीनं सेक्सला नकार दिल्यानंतर तिचा राग आल्याने नराधम तरुणाने पिडीत तरुणीला बेदम मारहाण करून तीच डोक भिंतीवर आपटलं.
दरम्यान डोकं भिंतीवर आपटल्यानं मुलीच्या डोक्याला जबर मार लागला आहे. तिच्या पाठीवर आणि हाताला जखमा झाल्या आहेत.या घटनेनंतर तिच्याजवळील मोबाइल फोन घेऊन आरोपी फरार झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पीडित मुलगी आणि आरोपी तरूण हे दोघेही एकाच इमारतीत राहायचे, गैरफायदा घेत रविवारी रात्री तो या मुलीला इमारतीच्या टेरेसवर घेऊन गेला.
तेथे त्यानं तिचा विनयभंग करून त्यानंतर शारीरिक संबंधांची मागणी केली. त्यावर तिनं नकार दिला. पण त्यानं जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिनं प्रतिकार केला.
या गोष्टीचा त्याला राग आला. त्यानं तिचे केस पकडले आणि तिचं डोकं टेरेसवरील भिंतीवर आपटलं. घटनेनंतर त्यानं तिच्याकडील मोबाइल फोन हिसकावला आणि तेथून पसार झाला.
दरम्यान पोलिसांनी तरुणाविरोधात या नराधम तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी तरूणाचा पोलीस शोध घेत आहेत.