अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी पवारांचे निकटवर्तीय आणि नातेवाईक असलेल्या माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांनी त्यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता.
त्याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना घरवापसीसाठी काही निकष आहेत. मात्र, उस्मानाबाद मधील नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची दार बंद झाली असल्याचं म्हणत ‘दिल्या घरी सुखी राहा,’ अशा शब्दांत पवारांनी पाटील कुटूंबाला आता राष्ट्रवादीत एन्ट्री नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी खा. पवार सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौºयावर होते. तुळजापूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पक्षातून बाहेर गेलेले अनेकजण परत येऊ इच्छित आहे. त्याविषयी आम्ही चर्चा करून निर्णय घेतोय. परंतु, काहींच्या बाबतीत आम्ही पक्का निर्णय घेतलाय.
आता त्यांना पुन्हा घेणे नाही. उस्मानाबादच्या बाबतीत हाच निर्णय घेतल्याचे सांगून पद्मसिंह यांच्या कुटूंबास आता राष्ट्रवादीत एन्ट्री नसल्याचे पवार यांनी त्यांचे नाव न घेता सांगितले. शिवाय डॉ. पाटील यांचे नाव निघताच त्यांनी कोपरापासून हात जोडले! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून उस्मानाबादचे नेते पद्मसिंह पाटील हे पवारांसोबत आहेत.
शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांनी आजवर ओळख होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून पवार आणि पाटील यांच्या संबंधात एक मोठी दरी निर्माण झाली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved