Union Budget 2021 Live Updates In Marathi अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्राला किती कोटी ?

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-  मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प (Budget) सादर करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण  सकाळी 11 वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत. 

  • या पेजवर तुम्हाला बजेट संदर्भातील Live अपडेट्स वाचायला मिळतील : (अपडेट्स साठी पेज रिफ्रेश करा
  •  महाराष्ट्रासाठी बजेटमधील सर्वात मोठी घोषणा :- सार्वजनिक वाहतुकीमधील बसची सुधारणा करण्यासाठी 18 हजार कोटी रुपये, नागपूर मेट्रोसाठी 5 हजार 976 कोटी तर नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटींची तरतूद
  • भारतमाला प्रोजेक्टसाठी  3.3 लाख  कोटी रुपये दिले, रस्ते इन्फ्रास्ट्रक्चरसाठी इकॉनॉमिक कॉरिडोर बनवणार, 3,500 किमी नॅशनल हाईवेझ प्रोजेक्टअंतर्गत तामिळनाडुमध्ये 1.03 लाख केटी रुपये खर्च होतील, याचं कंस्ट्रक्शन पुढील वर्षी सुरु होईल
  • 1100 किमी नॅशनल हाईवे केरळमध्ये बनेल, याअंतर्गत मुंबई-कन्याकुमारी कॉरिडोरही बनेल, केरळमध्ये यावर 65 हजार कोटी रुपये खर्च होतील, बंगालमध्ये 25 हजार कोटी रुपये देऊन हायवे तयार होईल

अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्राला किती कोटी 

+आरोग्य क्षेत्रासाठी २.२३ लाख कोटी
+ कोविड वॅक्सीनसाठी ३५ हजार कोटी
+ आत्मनिर्भर योजना ६४,१८० कोटी
+ वायु प्रदुषण : २२१७ कोटी
+ पायाभूत सुविधा २० हजार कोटी
+ स्वच्छता अभियान : ७१ हजार कोटी
+ जल जीवन : २.८७ कोटी
+ परिवहन : १.९७ कोटी रूपये
+ प.बंगाल, आसाम, तमिळनाडूत रस्ते प्रोजेक्टसाठी मोठी घोषणा
+ विमा कायद्यात बदल
+ विमा क्षेत्रात ७४ टक्के एफडीआय आणले जाणार
+ ७५ हजार हेल्थ सेंटर
+ १५ हेल्थ इमर्जन्सी सेंटर
+ २ मोबाईल रूग्णालय

  • 1.51 PM :- आयकराच्या संरचनेसंदर्भात कोणतीही मोठी घोषणा करण्यात आलेली नसून बजेटकडे लक्ष लागलेल्या सर्वसामान्य करदात्यांना दिलासा मिळालेला नाही. आयकराच्या संरचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
  •  मोबाईलवरील कस्टम ड्युटी वाढून 2.5 टक्क्यांवर
  • सोने-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी केली
  • स्टील उपकरणांवरील कस्टम ड्युटी कमी होऊन 7.5 टक्क्यांवर
  • कॉपरवरील कस्टम ड्युटी कमी होऊन 2.5 टक्क्यांवर
  • नायलॉनवरील कस्टम ड्युटी कमी होऊन 5 टक्क्यांवर
  • सोलर इन्व्हर्टरवरील कस्टम ड्युटी 20 टक्क्यांवर
  • निवडक ऑटो पार्टवरील कस्टम ड्युटी वाढवून 15 टक्क्यांवर
  • 12.48 PM :- 75 वर्षांपेक्षा अधिक वय असेलेले ज्येष्ठ नागरिक, ज्यांच्या उत्पन्नाचे साधन केवळ पेन्शन आहे, त्यांना आयकरातून सूट देण्याचा प्रस्ताव
  • 12.36 PM :- आपत्कालीन स्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने आपत्कालीन निधीत भरीव वाढ केली आहे. केंद्राने आपत्कालीन निधी 500 कोटींवरून 30 हजार कोटींपर्यंत वाढवला आहे.
  • 12.26 PM ;- देशाची आगामी जनगणना ही डिजिटल स्वरुपात होईल. पहिल्यांदाच भारताची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. तीन हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय गगनयान मोहीम डिसेंबर महिन्यात सुरु होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
  • 12.07 PM :- आयडीबीआय सोबतच अन्य दोन सरकारी बँकांचे खासगीकरण होणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे. तसेच एका विमा कंपनीचेही खासगीकरण केले जाणार
  • 12.06 PM :- बँकांच्या बुडीत कर्जावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. बँकांच्या बुडीत कर्जे वेगळ्य़ा कंपनीत वळविणार आहेत; बुडीत कर्जांची वसुली करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
  • 11.45 AM :- रेल्वे बजेटवर १.१ लाख कोटी रुपये खर्च केले जातील. त्याच वेळी, 2030 लक्षात घेऊन रेवलेसाठी योजना तयार केली जात आहे.
  • 11.42 AM :- भारत सरकारच्या आरोग्य बजेटमध्ये 137% वाढ करण्यात आली आहे आणि 2021-22 दरम्यान सरकार आरोग्य क्षेत्रात 2.23 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे.
  • 11.41 AM :- सार्वजनिक वाहतुकीवर 11,000 कोटी रुपये खर्च करण्याची घोषणा. खाजगी क्षेत्रातून 30,000 बसेस चालविल्या जातीलपश्चिम बंगालमध्ये रस्ते प्रकल्पासाठी 25 हजार कोटींच्या निधीची तरतूद
  • 11.36 AM :- स्वच्छ भारत मिशनला पुढे वाढवण्याची घोषणा केली आहे, ज्याअंतर्गत शहरांमध्ये अमृत योजनेला वाढवलं जाईल, त्यासाठी 2,87,000 कोटी रुपये जारी करण्यात आली आहेत, मिशन पोषण 2.0 चीही घोषणा
  • 11.32 AM :- जुन्या वाहनांना भंगारात काढण्यासाठी व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी लवकरच. : निर्मला सीतारामन जुन्या वाहनांना भंगारात काढण्यासाठी व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी लवकरच लागू करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
  • 11.26 AM : – नवीन आरोग्य योजनांवर ६४ हजार कोटींची तरतूद : निर्मला सीतारामन
  • 11.24 AM : –आत्मनिर्भर भारत पॅकेजेसमुळे जो आर्थिक सकारात्मक परिणाम झाला तो २७.१ लाख कोटी रुपयांचा म्हणजे जीडीपीच्या १३ टक्क्यांपेक्षा जास्त होता – निर्मला सीतारामन
  • 11.23 AM :- कोरोना संकटात सरकारने 5 मिनी बजेट सादर केले. आरबीआयनेही 27 लाख कोटी रुपयांचे पॅकेज दिले : अर्थमंत्री निर्मला सीतारामन
  • 11.19 AM :- अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ज्या प्रकारे अर्थसंकल्पीय भाषण सुरू केले आहे, त्यामध्ये दोन गोष्टी स्पष्ट आहेत – एक म्हणजे कोरोना विषाणूविरूद्ध लढाईसाठी सरकारचे कठोर परिश्रम आणि खर्च आणि दुसरे म्हणजे लोकांना होणार्‍या अडचणी. या दोन गोष्टी एकत्रित केल्यावर संकेत असे आहे की या अर्थसंकल्पात कोविडच्या नावाखाली सरकार काही खर्च वाढवणार आहे, तेथे कोरोनामुळे होणाऱ्या अडचणींपासून लोकांना दिलासा देण्यासाठी काही मोठ्या घोषणाही केल्या जात आहेत
  • 11.15 AM :- कोरोना महामारीचे सावट असल्यामुळे हे बजट अत्यंत महत्त्वाचे आहे. देशात लॉकडाऊनचा निर्णय घेतला नसता तर अडचणी वाढल्या असत्या : निर्मला सीतारमण
  • 11.03 AM :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरुवात

कोरोनाची लस मोफत मिळावी – राजेश टोपे कोरोनाची लस मोफत मिळावी अशी मागणी राज्य सरकारने आधीच केंद्र सरकारकडे केली आहे. अर्थसंकल्पात यासाठी विशेष तरतूद करावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. दरम्यान मोफत लसीसाठीची तयारी केंद्रात सुरू असून या संदर्भात उद्या बजेटमध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यावर बोलताना राजेश टोपे यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment