अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात सध्या अवैध व्यवसायाचा सुळसुळाट झाला आहे. यांना रोख लावण्यासाठी पोलीस प्रशासन ऍक्टिव्ह मोड मध्ये आहे.
यामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पोलिसांचे धाड सत्र सुरूच आहे. अशीच एक कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला हाती निराशा लागली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी कि, राहुरी फॅक्टरी येथील बस स्टँड नजीक असलेल्या एक किराणा दुकानदारा मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री करत असल्याने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली होती.
याची तातडीने दखल घेत तहसीलदार फसीयोद्दीन शेख व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी सदर गुटखा व्यापाऱ्याच्या दुकानाची झाडाझडती केली.
परंतु त्या व्यापाऱ्याने गुटखा दुसऱ्या ठिकाणी लपून ठेवल्याने पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याची चर्चा नागरिकांत सुरू होती. त्यामुळे पोलीस व महसूल अधिकारी यांना हा व्यापारी भारी भरल्याचे जनतेतून बोलले जात आहे.
दरम्यान गेल्या चार दिवसापूर्वी राहुरी फॅक्टरी परिसरातील सामाजिक संघटनांनी खुले आम गुटखा विक्री करणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील व्यापाऱ्यावर त्वरित कारवाई केली नाहीतर पोलीस निरीक्षकांना गुटख्याचा हार घालून राहुरी पोलीस ठाण्यासमोर गुटखा व सुगंधी तंबाखूची होळी करू असा इशारा निवेदनाद्वारे दिला होता.
यानुसार पोलिसांनी हि कारवाई केली मात्र पोलिसांनी फौजफाट्यासह येऊन व्यापाऱ्या दुकानाची झाडाझडती घेतली. या झाडाझडतीत अधिकाऱ्यांना गुटखा मिळून न आल्याने खाली हात जावे लागले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved