सोशल मीडियावरुन अफवा पसरवाल तर होईल ‘ही’ शिक्षा वाचा अत्यंत महत्वाची बातमी ….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :-  करोनाचं संकट असताना पोलिसांसमोर सोशल मीडियावरुन पसरणाऱ्या अफवांनाही रोखण्याचं आव्हान आहे. करोनासंबंधी येणारे अनेक मेसेज सोशल मीडियावर सर्रासपणे शेअर, फॉरवर्ड होत असताता.

तुम्हीदेखील असे मेसेज शेअर करत असाल तर सावधान होण्याची गरज आहे कारण सोशल मीडियावर चुकीची माहिती टाकल्यास जेलमध्ये जावं लागू शकतं. पोलिसांनी यासंबंधी पत्रक जारी केलं आहे.

काय केल्याने होऊ शकते शिक्षा –

१) व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेली माहिती खोटी किंवा तथ्याशी छेडछाड करणारी असल्यास कारवाई होऊ शकते.

२) एखाद्या समाजाविरोधात आक्षेपार्ह भाष्य केल्यास

३) सामान्यांमध्ये भीती तसंच गोंधळ निर्माण केल्यास

४) सरकारकडून करोनासंबंधित घेतलेल्या निर्णयांवर तसंच प्रशासनावर अविश्वास दाखवत जीवाला धोका निर्माण करणे तसंच गोंधळाचा परिस्थिती निर्माण करणे.

काय आहे शिक्षा ?

भारतीय दंड संहिता, 1860 कलम 295 (अ) अंतर्गत अशा व्यक्तीस 3 वर्षापर्यंतच्या कोणत्याही कारावासाची शिक्षा किंवा दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतील. भारतीय दंड संहिता, 1860 कलम 188 अंतर्गत अशा व्यक्तीस 6 महिन्यापर्यंत साध्या कारावासाची किंवा एक हजार रुपये किंवा दोन्ही शिक्षा होतील.

भारतीय दंड संहिता,1860 कलम 505अंतर्गत जर कोणी एखादे विधान, अफवा किंवा वृत्त प्रसिद्ध करेल व त्यामुळे एखाद्या भागामध्ये किंवा जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचा उद्देश असेल तर त्या व्यक्तीस तीन वर्षापर्यंत मुदतीच्या कारावासाची शिक्षा किंवा दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतील.

माहिती व तंत्रज्ञान कायदा, 2000 कलम 66 क अंतर्गत, एखाद्या व्यक्तीच्या इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी, पासवर्ड किंवा कोणत्याही वैशिष्ट्याचा गैरवापर केला, तर त्याला 3 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा किंवा एक लाख रुपये दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतील. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment