नियोजनाच्या अभावामुळे शहरात वाढली वाहतूककोंडी; नागरिक झाले त्रस्त

Published on -

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  शहरात बाजारदिवसाबरोबरच आता इतर दिवशीही वाहनांची मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

नियोजनाअभावी या समस्यां डोके वर काढू लागले आहे. मात्र याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो आहे. कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होते.

यामुळे येथील लहान मोठे व्यापारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूककोंडीचे मुख्य कारण म्हणजे बेशिस्त पार्किंग… बाजारसाठी आलेले नागरिक शहरामध्ये रस्त्याच्या कडेला दुचाकी व चारचाकी वाहने उभी करून निघून जातात. यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीची कोंडी होते.

शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी हि समस्या तीव्रतेने जाणवते. वाहतुकी कोंडीची दिवसेंदिवस वाढती समस्यां पाहता छत्रपती शिवाजी महाराज चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नियुक्त करावा अशी मागणी यापुर्वी अनेक वेळा करण्यात आली आहे.

मात्र याकडे पोलीस प्रशासन नेहमीच दुर्लक्ष करीत आहेत. येथे सतत होत असलेल्या वाहतूक कोंडी मुळे अनेक वेळा वाद होतात पण याकडे पोलीस प्रशासन लक्ष देत नाहीत ही मोठी शोकांतिका आहे. या समस्येमुळे येथील व्यापारी बांधवांना वाहनांचे कर्कश्श हॉर्न व धुळ यांचा सामना करावा लागत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News