केडगाव परिसरातील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार…
याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, केडगाव मधील एका उपनगरातील १५ वर्षे वयाची अल्पवयीन मुलगी शाळेत व क्लासला जात येत असताना तिची ओळख शुभम रा. केडगाव या तरुणाशी झाली. त्याने मुलीचा विश्वास संपादन करून तिला चास येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला तसेच तिला शिवीगाळ दमदाटी करून तुझ्या आई वडिलांना सांगेल असा दम दिला.

कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याबाबत सदर मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात भादवि कलम ३७६/१/एन/५०४/५०६ पोक्सो कायदा कलम ३व४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास कोतवाली पोलिस करीत आहेत.