अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे. तुम्ही फक्त खुर्चीवर बसा व आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही आंदोलन करतो अशी भूमिका पुणे जिल्ह्यातील आदिवासी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
जुन्नर तालुक्यात आलेल्या इको सेन्सिटिव्ह झोनच्या संकटात आदिवासी उध्वस्त होणार असून, धनगर आरक्षण देताना आदिवासींच्या हक्काला बाधा आणू नये, खावटी अनुदान मिळावे,
तर आदिवासी धरणग्रस्तांच्या मुलांना नोकरीत प्राधान्य द्यावे आदी मागण्या या नेत्यांच्या असून त्या मागण्यांचे निवेदन माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना देण्यात आले.
राजूर येथे आदिवासी संघटना व कार्यकर्ते माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी माजी आमदार वैभव पिचड, जुन्नर तालुक्याचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ बगाड, गोविंद साबळे,
तुळशीराम भोईर, नारायण साबळे, बुवा शिंगाडे आदी उपस्थित होते. गेली आठ महिन्यापासून करोनाने थैमान घातले असून खावटी अनुदान नाही, जुन्नर तालुक्यात इको सेन्सिटिव्ह झोन मुळे आदिवासी उध्वस्त होत आहे.
याबाबत आमदार बेनके यांना भेटून निवेदन दिले. मंत्रिमंडळात प्रश्न मांडतो असे म्हणाले, ते आदिवासी समाजाच्या आरक्षणात धनगर आरक्षण देणार असेल तर
आम्ही ते होऊ देणार नाही प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्र घेऊ साहेब तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा, संपूर्ण महाराष्ट्र हलवून टाकू असे ज्येष्ठ नेते दादाभाऊ बगाड यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved