अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे केंद्राने मदत करायला हवी असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी सुद्धा राज्यपालांनी लिहलेलं पत्र चुकीचं आहे आणि देशाचे गृहमंत्र्यांनी देखील राज्यपालांना फटकारलं आहे.
पण देशाचे गृहमंत्री अमित शहा हे राज्यपाल काम बरोबर करत नाही असे सूचित करत आहेत का?, म्हणून जर असे असेल तर केंद्राने राज्यपालांवर विचार करायला हवा. असे वक्तव्य नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
तसेच महाराष्ट्रात झालेल्या परतीच्या पावसामुळे जे काही नुकसान झाले आहे. त्याची केंद्रानेही दखल घ्यावी. आज महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्याकरीता महाराष्ट्र दौर्यावर गेले होते.
तसेच केंद्राने या संदर्भात विचार करून दखल घेऊन महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीसाठी केंद्राने मदत करावी.असं मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved